Business Ideas: अलीकडच्या काळात कमीत कमी गुंतवणुकीमध्ये व्यवसाय कसा सुरू करावा हे शोधणाऱ्या तरुणांच्या संख्येत भारतामध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे; भारतीय अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी तरूणांकडे इच्छाशक्ती व व्यवसायिक दृष्टीकोन आहे. तरीही, बहुतेक वेळा या तरुणांकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेसे भांडवल नसते. त्यामुळेच आज आपण या लेखात जाणून घेऊयात 10 अशा व्यवसायिक कल्पना ज्या तुम्ही मात्र 10 हजार रुपयांमध्ये सुरू करू शकता.
Table of contents [Show]
मोबाईल दुरुस्तीचे दुकान (Mobile Repair Shop)
भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रॉनिक श्रेणी मध्ये सर्वाधिक विकली जाणारी वस्तू मोबाईल फोन आहे; जर तुम्ही तंत्रज्ञानाचे जाणकार असाल आणि कमी बजेटमध्ये व्यवसाय सुरू करू इच्छित असाल, तर मोबाइल रिपेअरिंग सेवांचा विचार करा. काही प्रकारचे उपकरणे आणि साधनांसह 10,000 रुपयांच्या नाममात्र गुंतवणुकीमध्ये कोणीही घरबसल्या मोबाईल रिपेअरिंग हा व्यवसाय सुरू करू शकतो.
ब्लॉग सुरू करा (Start a Blog)
जगभरातील ब्लॉगर्स भारतात फार पैसे कमवत आहेत. ब्लॉगमधून पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत. Google AdSense सारखी अनेक जाहिरात नेटवर्क आहेत जी मान्यताप्राप्त ब्लॉगर्सना चांगले पैसे देतात. भारतात, तुम्ही फक्त 3000 रूपयांपेक्षाही कमी किमतीमध्ये वेबसाईटचे डोमेन विकत घेऊन स्वतः चा ब्लॉग सुरू करू शकता.
मेणबत्ती बनवणे (Candle Making)
5,000 रुपयांमध्ये तुम्ही मेणबत्त्या बनवण्यासाठी उपकरणे घेऊ शकता. जर तुम्ही घरगुती उत्पादनाचा व्यवसाय शोधत असाल, तर मेणबत्ती बनवणे हा एक फायदेशीर व्यवसाय असू शकतो.
मशरूम शेती (Mushroom Farming)
अगदी कमी गुंतवणुकीत तुम्ही तुमच्या घरामागील अंगणात मशरूमची शेती सुरू करू शकता. विशेष म्हणजे यास जास्त जागेची सुद्धा गरज नाही. व मशरूमची मागणी वर्षभर राहते.
कार वॉश सेवा (Car Wash Services)
अलीकडच्या काळात कार प्रेमींच्या संख्येत प्रचंड वाढ झालेली दिसून येत आहे. आणि तंत्रज्ञानाच्या वाढीमुळेही हा बिझनेस गेल्या 3-4 वर्षांपासून गुंतवणूकदारांना अधिक नफा मिळवून देत आहे. विशेष म्हणजे तुम्ही फक्त 10 हजार रूपयांची कार वॉशिंग मशिन घेऊन हा व्यवसाय सूरू करू शकता. जर तुमचा व्यवसाय यशस्वी झाला तर या व्यवसायात साधारणपणे 50-55 टक्के नफा तुम्ही कमावू शकता.
आम्हाला आशा आहे की 10 हजार रुपयांपेक्षा कमी खर्चात सुरू करता येणार्या बिझनेस आयडियांची ही यादी तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास प्रेरित करेल.