भारतातील पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग (PSU) बॅंकेच्या शेअर्समध्ये गेल्या 5 महिन्यांपासून सतत तेजी असल्याचे दिसून येते. पण तरीही गुतववणूकदारांचे एका खाजगी बॅंकेवर विशेष लक्ष असल्याचे दिसत आहे. ती बॅंक आहे येस बॅंक (Yes Bank). येस बॅंकेच्या शेअर्समध्ये मंगळवारी (दि.13 डिसेंबर) वाढ झाली आहे. आजच्या सकाळच्या सत्रात येस बॅंकेच्या एका शेअरचा भाव 22 रुपयांवर ट्रेडिंग करत होता. तो दुपारी मार्केट बंद झाले तेव्हा 23.95 वर ट्रेडिंग करत होता.
52 आठवड्यातील सर्वोच्च स्थानावर!
येस बॅंकेचा शेअरमध्ये सुरूवातीच्या काळात 5 टक्क्यांपेक्षा जास्ती तेजीत असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर दुपारी या शेअरमध्ये 12 टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली. त्यानंतर त्याने 23.60 रुपयांचा टप्पा पार करत शेवटी मार्केट बंद होताना 23.95 रुपयांवर पोहोचला. हा गेल्या 52 आठवड्यातील उच्चांक मानला जातो.
मागील 3 दिवसांतील येस बॅंकेच्या शेअरचा कारभार पाहिला तर या 3 ते 4 दिवसांत या शेअरमध्ये 35 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले. 8 डिसेंबरला याच्या एका शेअरची किंमत 17.75 रुपये होती. म्हणजेच महिन्याभरापूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल त्यांना 27.78 टक्के फायदा झाला असेल. बिझनेस टुडेच्या एका रिपोर्ट अनुसार, येस बॅंकेचा शेअर येत्या काही दिवसांत 24 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली आहे.
येस बॅंकेच्या शेअर्समधील तेजीचे कारण काय?
काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बॅंकेने एक निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर CA Basque Investmetns आणि Verventa Holdingsच्या प्रस्तावित गुंतवणूकदारांना काही नियमांना धरून मान्यता मिळाली असल्याची बातमी बाहेर आल्याने येस बॅंकेच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. येस बॅंकेच्या शेअर्सचा 52 आठवड्याचा सर्वाधिक लो 12.11 रुपये आहे.
(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)