Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Compensation for crop Damage : 3 लाख शेतकऱ्यांसाठी 210 कोटी 30 लाख रुपयांचा निधी वितरित; तुम्हाला मिळाला का निधी?

Compensation for crop Damage :  3 लाख शेतकऱ्यांसाठी 210 कोटी 30 लाख रुपयांचा निधी वितरित; तुम्हाला मिळाला का निधी?

2022 मध्ये अतिवृष्टीमुळे राज्यात सुमारे 15,57,971 हेक्टरवरील पीक बाधित झाले होते. त्यानंतर राज्य सरकारच्या महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार एकूण 26 लाख 50 हजार 951 शेतकरी नुकसान भरपाईस पात्र ठरले होते. यावर राज्यशासनाकडनू या अतिवृष्टीमुळे पीक बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 1500 कोटी रुपये देण्यासंदर्भात 13 जून 2023 च्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला होता.

अवकाळी पावसामुळे पीकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून नुकसान भरपाई निधी वितरित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे. सुरुवातीला ज्या शेतकऱ्यांची ई केवासी पूर्ण झाली आहे. अशा तब्बल 3 लाख शेतकऱ्यांना निधी वितरित करण्यात सुरवात करण्यात आली आहे.

1500 कोटी निधी मंजूर

गेल्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे राज्यात सुमारे 15,57,971 हेक्टरवरील पीक बाधित झाले होते. त्यानंतर राज्य सरकारच्या महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार एकूण 26 लाख 50 हजार 951 शेतकरी नुकसान भरपाईस पात्र ठरले होते. यावर राज्य शासनाकडनू या अतिवृष्टीमुळे पीक बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 1500 कोटी रुपये देण्यासंदर्भात 13 जून 2023 च्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला होता. त्या निर्णयानुसार राज्याच्या मदत व पुनर्वसन मंत्रालयाकडून टप्प्याटप्प्याने निधी वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ही नुकसान भरपाई राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून वितरीत केली जात आहे.

ई केवायसी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना निधीचे वितरण

महसूल विभागाकडून नुकसान भरपाईस पात्र ठरलेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण केली आहे. अशा शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईचे (Compensation for crop Damage) वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. त्या पहिल्या टप्प्यात केवायसी केलेल्या 3 लाख  शेतकऱ्यांना 210 कोटी 30  लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत आहे. हा निधी DBT  प्रणालीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या खात्याची ई केवायसी (E-KYC) पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले सरकार या ई सेवा केंद्रामध्ये जाऊन आपल्या खात्याची KYC पूर्ण करून घ्यावी. ज्यामुळे पात्र शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाईचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करून घेता येतील.

आणखी 2.5 लाख शेतकऱ्यांचा निधी होणार वितरित

या पहिल्या टप्प्यात निधी खात्यात जमा केल्यानंतर आता शुक्रवारपर्यंत आणखी 2,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 178.25 कोटी रुपये निधी जमा केला जाणार आहे. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई (Compensation) तातडीने मिळावी यासाठी आपली केवायसी पूर्ण करून घ्यावे असे आवाहन मदत व पुनर्वनस विभागाकडून करण्यात आले आहे.या संदर्भात पात्र शेतकऱ्यांच्या केवायसी तत्काळ करून घेण्याच्या सूचना सर्व तहसील महसूल यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.