प्रसार माध्यम क्षेत्रातील दैनिक भास्कर (DB corp) या नामांकित कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूक दारांना आज मार्केट सुरु होताच 16% परतावा दिला आहे. तसेच या वाढीसह कंपनीचे शेअर्स 52 आठवड्यांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत. शुक्रवारी सुरुवातीच्या व्यापारात भास्कर ग्रुपच्या शेअर्सनी 16 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आणि 229 रुपयांची पातळी ओलांडली आहे. कंपनीने या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचा अहवाल जाहीर केला आहे.
माध्यम क्षेत्रातील मोठा उद्योग समूह-
DB Corp Ltd याला दैनिक भास्कर समूह म्हणूनही ओळखले जाते. हा एक भारतीय वृत्तपत्र समूह असून यांच्या चार भाषांमध्ये 66 आवृत्त्या प्रकाशित होतात. दैनिक भास्कर (हिंदी दैनिक), दिव्य भास्कर (गुजराती दैनिक), दैनिक दिव्य मराठी (मराठी दैनिक), सौराष्ट्र समाचार, डीबी पोस्ट (इंग्रजी दैनिक), आणि डीबी स्टार ही समूहाने प्रकाशित केलेली प्रमुख वृत्तपत्रे आहेत. गेल्या काही दिवसामध्ये माध्यम क्षेत्रातील या कंपनीने शेअर मार्केटमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून दिला आहे.
कंपनीच्या निव्वळ नफ्यात नफा 79 टक्क्यांनी वाढ
20 जुलै रोजी DB कॉर्पने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. डीबी कॉर्पच्या जून तिमाहीच्या निकालांनुसार, कंपनीची एकूण विक्री 12 टक्क्यांनी वाढून 554 कोटी रुपये झाली आहे. तर तिचा ऑपरेटिंग नफा 70 टक्क्यांनी वाढून 116 कोटी रुपये झाला आहे. तर पहिल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 154 टक्क्यांनी वाढला असून 79 कोटींवर पोहोचला आहे.
3 वर्षात चौपट फायदा
गेल्या 5 दिवसात डीबी कॉर्पच् (DB Corp)च्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना 23% परतावा मिळाला आहे. तर गेल्या 1 महिन्यात गुंतवणूकदारांना एकूण 63% तर गेल्या 6 महिन्यात, 76% बंपर परतावा मिळाला आहे. कंपनीच्या शेअर मार्केटमधील गेल्या 1 वर्षभरातील आकडेवारी पाहिली असता गुंतवणूक दारांना तब्बल 182% परतावा मिळाला आहे. तसेच 22 मे 2020 रोजी, DB Corp Ltd कंपनीचे शेअर्स 60 रुपयांच्या निच्चांकी पातळीवर त्यानंतर 3 वर्षामध्ये गुंतवणूकदारांचे भांडवल 300 टक्क्यांनी वाढले आहे.