Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Action on Privet Travels : नियमबाह्यपणे तिकीट आकारणाऱ्या खासगी प्रवासी वाहतूक बसेसवर कारवाई; 1 कोटी 83 लाख दंड वसूल

Action on Privet Travels : नियमबाह्यपणे तिकीट आकारणाऱ्या खासगी प्रवासी वाहतूक बसेसवर कारवाई; 1 कोटी 83 लाख दंड वसूल

Image Source : www.mid-day.com

संपूर्ण राज्यात 14 हजार 161 खासगी बसची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 4277 बसेस नियमांचे उल्लंघन करत असल्याच्या आढळून आल्या आहेत. संबंधित बस चालक मालकांवर दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत विविध गुन्ह्या अंतर्गत 1 कोटी 83 लाख दंड वसूल करण्यात आला आहे.

सण समारंभ, सणासुदीचे दिवस असले की नेहमीच खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस तिकीटाचे दर भरमसाठ वाढवतात. काही वेळा गर्दी जास्त दिसून आली की आयत्यावेळी तिकीट दरामध्ये मोठी वाढ करत असल्याचे प्रकार घडतात. अपेक्षित भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारल्याने प्रवाशांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. खासगी बसच्या या मनमानी कारभारासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यानुसार  प्रादेशिक परिवहन विभागाच्या वायूवेग पथकाकडून अशा एकूण 4277 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

14 हजार 161 खासगी बसेसची तपासणी

खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेससाठी प्रवासी वाहतुकीचे दर हे राज्य शासनाकडून निश्चित करून देण्यात आले आहेत. या संदर्भात राज्य शासनाने एप्रिल 2018 मध्ये शासन निर्णय जारी केला होता. त्यानुसार खासगी बस चालक-मालकांनी प्रवाशांकडून प्रति किलोमीटरसाठी एसटीच्या भाडेदरापेक्षा 50 टक्क्यांहून अधिक भाडेदर आकारू नये, असे निर्देशीत करण्यात आले आहे. मात्र, प्रवासी सेवा देणाऱ्या परवानाधारक खासगी बसेसकडून मनमानीपणे भाडे आकारले जात होते. या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर राज्य परिवहन मंडळाचे आयुक्त विवेक भिमनवार यांनी या बसेसची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 16 मे ते 30 जून 2023 या कालावधीत राज्यातील सर्व परिवहन विभागाकडून एकूण 14161 खासगी बसेसची तपासणी करण्यात आली होती.

4277 बसेस कडून 1 कोटी 83 लाख दंड वसूल

राज्य परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार वायूवेग पथकाकडून खासगी बसेसची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आकारण्यात येणारे प्रवासी भाडे, टप्पा वाहतूक करणे, अवैधरित्या मालवाहतूक करणे, प्रथम उपचार कीट, अग्निशामक सुविधा, आपत्कालीन खिडकी नसणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक बसचे सर्व परवाने, विमा यासह वाहतूक नियमांशी निगडीत इतर सर्व घटकांची  तपासणी करण्यात आली. यावेळी संपूर्ण राज्यात 14 हजार 161 खासगी बसची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 4277 बसेस नियमांचे उल्लंघन करत असल्याच्या आढळून आल्या आहेत. संबंधित बस चालक मालकांवर दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत विविध गुन्ह्या अंतर्गत 1 कोटी 83 लाख दंड वसूल करण्यात आला आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बसची आकडेवारी

  • 1702 बस - रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाइट, वायपर नसणे
  • 890 बस -  विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग 
  • 570 बस - अवैध योग्यता प्रमाणपत्र 
  • 514  बसमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसणे
  • 485 बस -  मोटार वाहन कर न भरता चालवणे
  • 293 बस- आपत्कालिन दरवाजा कार्यरत स्थितीत नसणाऱ्या बसेस
  • 227 बस-  अवैधरित्या व्यावसायिक पद्धतीने माल वाहतूक करणे
  • 147 बस-  आसन क्षमतापेक्षा जादा प्रवासी वाहतूक
  • 72 बस - वेग नियंत्रक नसणारी वाहने