• 27 Sep, 2023 00:36

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Apple iPhone 14 : iPhone 14 वर मिळतोय भरघोस डिस्काउंट, जाणून घ्या डिटेल्स

iPhone 14

Image Source : www.tech.hindustantimes.com

तुम्ही नवीन स्मार्टफोन घ्यायच्या तयारीत आहात? मग आम्ही तुमच्यासाठी iPhone 14 ची ऑफर घेऊन आलो आहोत. तेही तुमच्या खिशाला परवडणाऱ्या बजेटमध्ये. होय. कारण, iPhone 14 तुम्हाला फ्लिपकार्टवर (Flipkart) भरघोस डिस्काउंटवर मिळत आहे. चला तर त्याच्या फिचर्स आणि किमतीविषयी जाणून घेऊया.

Apple iPhone 14: तुम्हाला अ‍ॅपल iPhone 14 घ्यायचा असेल तर तो तुम्हाला इतर ई-काॅमर्स वेबसाईटपेक्षा फ्लिपकार्टवर खूप स्वस्तात मिळणार आहे. सध्या फ्लिपकार्टवर विक्रीला असेलला iPhone 14 हा अ‍ॅपलचा करंट फ्लॅगशिप आहे आणि सप्टेंबर 2022 मध्ये तो लाँच करण्यात आला होता. 

iPhone 14 परफाॅर्मन्स चांगला असून डिस्प्ले देखील आकर्षक आहे. त्यामुळे लोकांचा iPhone 14 च्या खरेदीसाठी उत्तम प्रतिसाद दिसतो आहे. तुम्हाला iPhone 14 घ्यायचा असल्यास, जास्त विचार करायची गरज नाही. कारण, तो कोणत्याच बाबतीत तुम्हाला नाराज करणार नाही.

फोटोग्राफीसाठी आहे खास!

iPhone 14 च्या फिचर्सविषयी पाहायचे झाल्यास, तो तुम्हाला 6.1 इंचाच्या आकर्षक डिस्प्लेसह मिळणार आहे. तसेच फोनला A15 बायोनिक चिप आणि 6GB रॅम देण्यात आली आहे. त्यामुळे फोन ऑपरेट करताना तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही, एकदम स्मूथली तुम्ही तो वापरु शकणार आहात. 

तसेच, बॅक कॅमेऱ्याला दोन लेन्स देण्यात आल्या आहेत. त्यातली एक रेग्युलर पिक्चरसाठी कामी येणार आहे तर दुसरीने वाईड अ‍ॅन्गल कॅफ्चर करता येणार आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही कॅमरे आणि सेल्फी कॅमरा 12 मेगापिक्सलचा असणार आहे. त्यामुळे फोटोग्राफी करणाऱ्यांना फोटोग्राफीचा अद्भूत आनंद घेता येणार आहे.

14 टक्के मिळणार डिस्काउंट

iPhone 14 फ्लिपकार्टवरुन घ्यायचा विचार करत असल्यास, तुम्हाला तो खूप स्वस्तात मिळणार आहे. तुम्ही अ‍ॅपलचा रेग्युलर फोन घेणार असल्यास, म्हणजेच  128 GB चा त्याची मूळ किंमत 79990 रुपये आहे. मात्र, सध्याच्या डिस्काउंटनुसार हा फोन तुम्ही फक्त 67999 रुपयांमध्ये घेऊ शकणार आहात. यावर तुम्हाला 14 टक्के डिस्काउंट मिळणार आहे. पण, तुम्हाला याहून स्वस्त किमतीत घ्यायचा असल्यास, तुम्ही तुमचा जुना फोन फ्लिपकार्टवर विकू शकता आणि बॅंक कार्डची ऑफरही मिळवू शकता.

'या' ऑफर्सचा ही घेता येणार लाभ

तुम्हाला अजून कमी बजेटात iPhone 14 घेता यावा यासाठी फ्लिपकार्ट तुम्हाला तुमचा जुना फोन विकण्याची मुभा देत आहे. त्यावर तुम्हाला चांगला बोनस मिळू शकतो. पण, तो विकताना एक गोष्ट लक्षात ठेवा. कारण, त्या फोनवर मिळणारे पैसे त्याची सध्याची परिस्थिती पाहून देण्यात येणार आहे. तसेच, फोन विकण्याची ऑफर तुमच्या क्षेत्रात आहे की नाही ते आधी चेक करणे आवश्यक आहे. 

तुमच्यासाठी डिस्काउंटचा अजून एक पर्याय आहे. तो म्हणजे क्रेडिट कार्ड. तुमच्याकडे फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बॅंक क्रेडिट कार्ड असेल, तर तु्म्हाला त्यावर 5 टक्के सूट मिळणार आहे. तसेच, तुम्ही जर HDFC बॅंकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला त्यावर 4000 ची सूट मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही अगदी बजेटात हा महागडा फोन घेऊ शकता. त्यासाठी तो घ्यायच्या आधी या सगळ्या ऑफर चेक करुन, तुम्ही तो घेऊ शकता. तसे केल्यास, तुम्हाला खूप स्वस्तात iPhone 14 घेता येईल.