Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Telecommunication Industry: जगातील सर्वात स्वस्त दूरसंचार सेवा भारतात, केंद्रीय दूरसंचार मंत्री वैष्णव यांचा दावा

Telecommunication Industry

Indian Mobile Congress मध्ये मोबाईल आणि नेटवर्क क्षेत्रात भारताच्या संधीच्या शक्यता, शासकीय योजना, सरकारी धोरणे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, भारतातील दूरसंचार सेवा जगातील सर्वात स्वस्त राहावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. सध्या देशात पुरवली जाणारी दूरसंचार सेवा इतर देशांच्या तुलनेत अधिक स्वस्त असल्याचा दावा देखील करण्यात आलाय.

भारतात टेलिकॉम क्षेत्रात सध्या वेगवेगळे प्रयोग सुरु आहेत. 4 जी नेटवर्कच्या यशस्वी प्रयोगानंतर देशात सध्या 5 जी नेटवर्कचा प्रसार आणि 6 जी नेटवर्कच्या संशोधनाची जोरदार तयारी सुरु आहे. भारतात सध्या टेलिकॉम क्षेत्रात होत असलेली प्रगती भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी देखील महत्वाची ठरते आहे. देशातील ग्राहकसंख्या आणि मागणी यांचे गणित बघता देशोविदेशातील टेलिकॉम कंपन्या भारतात येण्यासाठी इच्छुक आहेत. या सर्व विषयांवर  इंडियन मोबाइल काँग्रेसमध्ये (Indian Mobile Congress) सविस्तर चर्चा झाली.

इंडियन मोबाइल काँग्रेसचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 27 ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. 27 ते 29 ऑक्टोबर 2023 दरम्यान झालेल्या या कार्यक्रमात मोबाईल आणि नेटवर्क क्षेत्रात भारताच्या संधीच्या शक्यता, शासकीय योजना, सरकारी धोरणे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, भारतातील दूरसंचार सेवा जगातील सर्वात स्वस्त राहावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. सध्या देशात पुरवली जाणारी दूरसंचार सेवा इतर देशांच्या तुलनेत अधिक स्वस्त असल्याचा दावा देखील मंत्री वैष्णव यांनी केला आहे. स्वस्त दूरसंचार सेवेमुळे सर्वसामान्य जनतेला याचा उपभोग घेता येतो आहे असेही ते म्हणाले.

5 जी सेवेचा विस्तार 

गेल्या काही वर्षापासून देशात 5 जी सेवेचा विस्तार गावखेड्यात विस्तार करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे वैष्णव यांनी म्हटले आहे. भारती एअरटेल (Bharati Airtel) आणि रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपली 5 जी सेवा भारताच्या कानाकोपऱ्यात, दुर्गम भागात नेण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत.

Digital India साठी प्रयत्न 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने ‘डिजिटल इंडिया’ योजना सुरु केली आहे. याद्वारे जास्तीत जास्त मोबाईल युजर्सला डिजिटल विश्वाचा वापर करता यावा, त्यांना माहितीचे दरवाजे खुले व्हावेत यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. युपीआय व्यवहार (UPI Payments) करण्यात भारतीय नागरिक सध्या आघाडीवर आहेत. दूरसंचार क्षेत्रात होत असलेल्या नवनवीन संशोधनांचा हा परिणाम असल्याचे देखील मंत्री वैष्णव यांनी म्हटले आहे.