Successful Women Entrepreneurs: भारतातील महिला उद्योजकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महिला उद्योजकांच्या वाढत्या संख्येमुळे जगभरात भारताचा तिसरा क्रमांक लागतो. काही यशस्वी महिलांनी स्वत:च्या पायावर व्यवसाय उभा करत भारतातील सामाजिक स्थिती बदलण्यात मोलाची भर घातली आहे. यामुळे रोजगारवाढीतही भर पडली आहे; त्याचबरोबर भारतातील महिलांच्या शिक्षणाची संधीदेखील वाढली आहे.
गेल्या दोन दशकात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांच्या संख्येत पाचपट वाढ झाली आहे. सध्याच्या घडीला महिला उद्योजक या भारताच्या अर्थव्यवस्थेत मोलाची भूमिक बजावत आहेत. भारतातही आजही काही ठिकाणी महिलांकडे पारंपरिक दृष्टिकोनातून जसे की, घरातील कामे करणारी स्त्री, नवऱ्याची पत्नी आणि सासू किंवा सून या भूमिकेमध्येच पाहिले जाते. पण गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहिला असता महिलांनी या पारंपरिक विचाराला छेद देत मोठी झेप मारली आहे. त्यांनी चूल-मूल आणि फक्त घरापुरती मर्यादित राहणारी स्त्री, या संकल्पनेला फाटा देत त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपले नाव मोठे केले आहे. त्या उद्योजक बनल्या आहेत. अशा महिला उद्योजकांची संख्या भारतात मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे.
Table of contents [Show]
भारतातील यशस्वी महिला उद्योजिका
फाल्गुनी नायर
फाल्गुनी नायर यांनी 2012 मध्ये नायका (Nykaa) या ब्रॅण्डने उद्योग सुरू केला होता. त्या नायकाच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. नायका ब्रॅण्डची सौंदर्य उत्पादने आणि कॉस्मेटिक प्रोडक्टस आहेत. फाल्गुनी नायर यांची एकूण नेटवर्थ 38,700 कोटी इतकी आहे. 2017 मध्ये त्यांना ETSA द्वारे पुरस्कार मिळाला होता. तर 2019 मध्ये बेस्ट बिझनेस वुमेनचा किताब त्यांना मिळाला होता.
कंपनीची वेबसाईट: www.nykaa.com
किरण मझुमदार-शॉ
किरण मझुमदार-शॉ या 70 वर्षांच्या असून त्यांनी 1978 मध्ये बायोकॉन (Biocon) उद्योगाची सुरूवात केली होती. त्या कंपनीच्या एक्झिक्युटीव्ह चेअरपर्सन आहेत. त्यांना 1989 मध्ये पद्मश्री तर 2005 मध्ये केंद्र सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. याचबरोबर त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांची एकूण संपत्ती 29,030 कोटी रुपये आहे.
कंपनीची वेबसाईट: www.biocon.com
वंदना लुथ्रा
वंदना लुथ्रा यांचे वय 64 वर्ष असून त्यांनी महिलांना आकर्षित करणाऱ्या VLCC Health Care Limited या कंपनीची सुरूवात केली होती. 1989 मध्ये त्यांनी याची स्थापना केली होती. वंदना या VLCC च्या एमडी आणि सीईओ आहेत. त्यांना 2013 मध्ये सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले होते. VLCC ने गेल्या दशकभरात मार्केटमध्ये स्वत:ची एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. महिलांना सुंदर आणि सडपातळ करण्याचा जणू काही विडाचा उचलला होता. वंदना लुथ्रा यांची एकूण संपत्ती 1300 कोटी रुपये इतकी आहे.
कंपनीची वेबसाईट: WWW.vlccwellness.com
नमिता थापर
नमिता थापर या 46 वर्षांच्या असून त्यांनी 1981 मध्ये Emcure या व्यावसायाची सुरूवात केली होती. त्या Emcure च्या एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर आहेत. मागच्याच वर्षी त्यांनी The Dolphin and the Shark: Stories on Entrepreneurship हे पुस्तक लिहिले आहे. नमिता थापर यांची नेटवर्थ 700 कोटी रुपये आहे.
कंपनीची वेबसाईट: www.thaparacademy.com
विनिता सिंग
विनिता सिंग या 39 वर्षांच्या असून त्यांनी 2012 मध्ये सुगर कॉस्मेटिक (Sugar Cosmetic) ही कंपनी सुरू केली होती. सुगर कॉस्मेटिकच्या त्या संस्थापक आणि सीईओ आहेत. 2019 मध्ये त्यांना स्टार्टअप ऑफ द इअर या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. तर 2021 मध्ये त्यांच्यावर फोर्बच्या अंकात Most Powerful Women म्हणून स्टोरी करण्यात आली होती.त्यांची एकूण संपत्ती 300 कोटी रुपये इतकी आहे.
कंपनीची वेबसाईट: www.sugarcosmetics.com