Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cheque वर रक्कम भरल्यानंतर Only लिहिणे का गरजेचे आहे? जाणून घ्या नियम

Cheque Payment

Cheque Payment: चेकने कोणताही आर्थिक व्यवहार करताना त्यावरील माहिती नीट भरणे आणि ती तपासणे गरजेचे असते. बऱ्याच वेळा तुम्ही पाहिले असेल, की चेकवर अक्षरात रक्कम भरल्यानंतर त्यापुढे Only असे लिहिले जाते किंवा रक्कम लिहिल्यानंतर (/-) अशा दोन रेषा ओढल्या जातात. त्याचा अर्थ काय जाणून घेऊयात.

हल्ली काळानुरूप तंत्रज्ञान विकसित झाले आहे. सध्या बँकिंग सेक्टरमध्ये सुद्धा अनेक मोठ-मोठे बदल झाले आहेत. पूर्वी छोट्यातील छोट्या कामासाठी सुद्धा बँकेमध्ये जायला लागायचे. मात्र आता घरबसल्या अनेक छोटी किंवा मोठी कामे काही सेकंदात ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करता येतात. आर्थिक व्यवहार करण्यासाठी सर्वजण ऑनलाईन पद्धतीचा वापर करतात. UPI, NEFT, RTGS, Bank Applicationच्या मदतीने हे आर्थिक व्यवहार चुटकीसरशी पूर्ण होतात. मात्र आजही अनेक संस्था किंवा कंपन्या आर्थिक व्यवहारांसाठी चेकचा (Cheque) वापर करतात.

या चेकवर बेसिक डिटेल्स भरले आणि तो बँकेत जमा केला की, ठराविक दिवसात बँकेत पैसे जमा होतात. या चेकवर अनेक गोष्टी लिहिलेल्या असतात. जसे की, नाव, खाते क्रमांक, सही, बँकेचे नाव, IFSC कोड, बँक शाखेचा कोड आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रक्कम. हे सर्व तपशील भरल्यानंतरच बँकेमध्ये हा चेक जमा करून घेण्यात येतो. तुम्हीही आर्थिक व्यवहारांसाठी चेक वापरता का? जर वापरत असाल, तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? चेकवर रक्कम लिहिल्यानंतर Only असे लिहले जाते. ते का लिहिले जाते, तुम्हाला माहित आहे का? 

रकमेपुढे Only का लिहायचे?

कोणत्याही चेकवर समोरच्या व्यक्तीला किंवा संस्थेला जितकी रक्कम द्यायची आहे, ती भरल्यानंतर त्यापुढे आपण Only असं लिहितो किंवा दोन रेषा अशा (/-) ओढतो. असे केल्याने तुमचा आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित होतो. आता तुम्ही म्हणाल ते कसं? तर सोप्पं आहे.

ज्यावेळी तुम्ही समोरच्या व्यक्तीला किंवा संस्थेला चेक देता. त्यावेळी रकमेसमोर Only किंवा दोन रेषा (/-)ओढल्या नसतील, तर समोरची व्यक्ती त्या चेकवर वाढीव रक्कम भरू शकते. याचा फटका तुम्हाला बसू शकतो. उदा. तुम्ही एखाद्या व्यक्तीला 25,000 रुपयांचा चेक दिला आणि त्यापुढे only किंवा दोन रेषा (/-) ओढल्या नाहीत, तर समोरील व्यक्ती किंवा संस्था 25 हजारापुढे एक अंक वाढवून त्या रकमेला 25 हजार 900 वगैरे करू शकते. याचा फटका तुम्हाला बसू शकतो.

चेकवरील बाजूस डाव्या कोपऱ्यात दोन रेषा का ओढतात?

कोणत्याही व्यक्तीला चेक देण्यापूर्वी त्याचे डिटेल्स भरले जातात. त्याच वेळी चेक भरणारा डाव्या बाजूला वरील कोपऱ्यात 2 रेषा मारतो. या दोन रेषांचा अर्थ 'Account Pay Only' असा होतो. याचा अर्थ ज्याच्या नावाने डिटेल्स भरले आहेत; त्यालाच हे पैसे मिळावेत. बऱ्याच वेळा लोक चेकच्या डाव्या कोपऱ्यात दोन रेषा ओढल्यानंतर देखील त्या दोन्ही रेषेच्यामध्ये A/C Payee असे लिहितात.

Source: hindi.moneycontrol.com