Who Pays Credit Card Bill After Death in India: क्रेडिट कार्ड वापरण्याच्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. कारण क्रेडिट कार्डमुळे आर्थिक प्रश्न थोडा का होईना, तो तेवढयापुरता मिटून जातो. कारण ती गरज आपण क्रेडिट कार्डव्दारे पूर्ण करतो. त्यानंतर ते पैसे बॅंकेला पगार झाला की पुन्हा देतो. मात्र क्रेडिट घेणाऱ्या म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे म्हटले तर कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर ती रक्कम कोण फेडते, याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ.
कर्ज कोण फेडते (Who Should Pay the Debt)
क्रेडिट कार्डसाठी तुम्हाला कोणतीही जमीन, संपत्ती किंवा एफडी गहाण ठेवावी लागत नाही. तर क्रेडीट घेणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न, क्रेडिट स्कोअर, कर्ज व कर्ज परत फेडी सारख्या गोष्टींवर त्या व्यक्तीची क्रेडिट मर्यादा निश्चित केले जाते. म्हणजेच यानुसार त्याला कर्जाची रक्कम दिली जाते. हे कार्ड असुरक्षित कर्जाच्या श्रेणीत ठेवली जाते. त्यामुळे क्रेडीट भरण्याची जबाबदारी ही क्रेडीट घेणाऱ्या व्यक्तीचीच असते. जर कर्ज भरण्यापूर्वीच क्रेडीट धारकांचा मृत्यू झाला तर बॅंक कर्जाची थकबाकी ही राइट ऑफ करते. म्हणजेच हे कर्ज भरण्यासाठी कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला भाग पाडले जात नाही. थोडक्यात कर्ज ते बुडित होतं.
वैयक्तिक कर्जाबाबत (Regarding Personal Loans)
वैयक्तिक कर्जाचा समावेशदेखील असुरक्षित कर्जाच्या श्रेणीत असतो. त्यामुळे या परिस्थितीतदेखील क्रेडिट कार्डप्रमाणे वैयक्तिक कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी देखील कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचीच असते. जर कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा कोणत्या कारणाने मृत्यू झाल्यास बँक त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कर्जाची परतफेड करण्यास जबरदस्ती करू शकत नाही. अशा परिस्थितीत हे कर्ज बुडित म्हणून जाहीर केले जाते.