HDFC Merger Effect On Customers: खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँका एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेड (एचडीएफसी) यांचे विलीनीकरण होणार आहे. या विलिनीकरणातून अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. त्याचबरोबर त्याचा परिणाम ग्राहकांवरही होणार आहे. या दोन्ही कंपन्या एचडीएफसी समूहाच्या आहेत. मात्र, त्याचा थेट परिणाम एचडीएफसीच्या ग्राहकांवर होऊ शकतो. HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी कोणतेही मोठे बदल होणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. हे विलीनीकरण १ जुलैपासून लागू होणार आहे. ज्यांनी कर्ज घेतले आहे, त्यांच्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. या विलीनीकरणातून काही बदल पाहायला मिळणार आहेत. त्याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
Table of contents [Show]
एफडी व्याजदरावर होणारा परिणाम
जर तुम्ही एचडीएफसीमधील एफडीमध्ये गुंतवणूक केली असेल, तर त्याच्या व्याजदरांमध्ये तुम्हाला फरक जाणवू शकतो. एचडीएफसी बँकेतील एफडीवरील व्याजदर एचडीएफसी हाउसिंग फायनान्सच्या तुलनेत कमी आहेत. त्यामुळे तुम्हाला दोघांच्या व्याजदरात तफावत जाणवू शकते.
विमा मिळेल
एचडीएफसी लिमिटेडच्या ग्राहकांना त्यांच्या एफडी ठेवी काढण्याचा किंवा एचडीएफसी बँकेत त्यांच्या ठेवींचे एका ठराविक व्याजदराने नूतनीकरण करण्याचा पर्याय दिला जात आहे, असे केल्याने तुमचे पैसे अधिक सुरक्षित होतील. सोबतच क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन आणि डिपॉझिट इन्शुरन्स अंतर्गत कमाल 5 लाख रुपयांचा विमा उतरवला जाईल.
गृहकर्जाचे नवीन नियम
बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांसाठी गृहकर्ज नियमांमध्ये फरक आहे. आरबीआयच्या नियमांनुसार, बँकांची सर्व कर्जे बाह्य बेंचमार्क दराच्या आधारावर निश्चित केली जातात. दुसरीकडे, बिगर बँकिंग वित्तीय संस्थांसाठी अशी कोणतीही जबरदस्ती नाही. विलीनीकरणानंतर हा नियम HDFC लिमिटेडलाही लागू होईल. अशा परिस्थितीत व्याजदर कमी केल्यास त्याचा फायदा एचडीएफसीच्या विद्यमान ग्राहकांना मिळू शकतो.
नोकरीचे आश्वासन
कर्मचाऱ्यांना आश्वासन देण्यात आले आहे की, ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा कमी आहे त्यांना बँकेत समाविष्ट केले जाईल. कर्मचाऱ्यांच्या पगारात कोणतीही कपात होणार नाही.
शेअर्स मिळतील
अहवालानुसार, 13 जुलै रोजी, एचडीएफसी शेअर्स स्टॉक एक्स्चेंजमधून डीलिस्ट केले जातील आणि त्याचे शेअर्स एचडीएफसी बँकेच्या शेअर्सच्या रूपात ट्रेडिंग केले जातील. एखाद्या भागधारकाकडे HDFC लिमिटेडचे 25 शेअर्स असतील तर त्याला HDFC बँकेचे 42 शेअर्स मिळतील.