Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Supplement Insurance Policy म्हणजे काय? जाणून घ्या का आहे गरज

supplement insurance

supplement insurance (पूरक आरोग्य विमा) एक अतिरिक्त विमा योजना जी एखाद्या व्यक्तीच्या नियमित आरोग्य विमा योजनेत समाविष्ट नसलेल्या आरोग्याविषय उपचार खर्चासाठी मदत करते. यामध्ये अतिरिक्त-पेमेंट्सच्या वजावटीचा समावेश होतो. कर्करोग, पॅरालिसिस किंवा मूत्रपिंड निकामी यासारख्या विशिष्ट परिस्थितींसाठी पूरक आरोग्य विमा योजना उपलब्ध आहेत.

आजार कधीच सांगून येत नसतो आणि आलाच तर काहीवेळा आपणास उपचारासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो. यावर मात करण्यासाठी आरोग्य विमा काढणे ते आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरते. मात्र, आरोग्य विम्याचे फायदे काही बाबतीत मर्यादित असतात, अशावेळी सप्लिमेंट विमा पॉलिसी उपयोगी पडतात. आता तुम्ही म्हणाल की ही सप्लिमेंट विमा पॉलिसी (supplement insurance) काय आहे आणि ती कशी उपयोगी ठरते? आज आपण सप्लिमेंट पॉलिसी संदर्भात जाणून घेऊया.

सप्लिमेंट विमा पॉलिसी म्हणजे काय? What is supplement insurance?

supplement insurance (पूरक आरोग्य विमा)  एक अतिरिक्त विमा योजना जी एखाद्या व्यक्तीच्या नियमित आरोग्य विमा योजनेत समाविष्ट नसलेल्या आरोग्याविषय उपचार खर्चासाठी मदत करते. यामध्ये अतिरिक्त-पेमेंट्सच्या वजावटीचा समावेश होतो. कर्करोग, पॅरालिसिस किंवा मूत्रपिंड निकामी यासारख्या विशिष्ट परिस्थितीसाठी पूरक आरोग्य विमा योजना उपलब्ध आहेत. काही प्रकारचे पूरक आरोग्य विम्याचा वापर हा अन्न, औषध, दैनदिन प्रवास या सारख्या आजार किंवा दुखापतींशी संबंधित इतर खर्चाच्या भरपाईसाठी देखील पुरक विमात्यातून संरक्षण मिळते.

अनेक विमा कंपन्या आता आरोग्य विमा पॉलिसींसोबत सप्लिमेंट पॉलिसीही देऊ करत आहेत. ही पॉलिसी खास आहे आणि त्यासाठी वेगळा प्रिमियम भरावा लागतो. ही सप्लिमेंट विमा पॉलिसी पूर्णपणे ऐच्छिक असते. जर तुम्हाला याची गरज असेलच तेव्हाच पॉलिसीधारक त्याचा वापरू शकतात. वैयक्तिक आणि कौटुंबिक पॉलिसी होल्डर या अॅड-ऑन कव्हरेजचा लाभ घेऊ शकतात.भारतीय विमा नियामक विकास प्राधिकरणाच्या (IRDAI) नियमांनुसार, सप्लिमेंट पॉलिसीसाठी आकारला जाणारा प्रिमियम (Cost of supplement insurance) स्टँडर्ड पॉलिसीच्या 30 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा.

सप्लिमेंट विमा पॉलिसी कधी वापरली जाऊ शकते


गंभीर आजार असल्यास-

गंभीर आजाराच्या वेळी या प्रसंगी सप्लिमेंट पॉलिसीचा वापर करता येऊ शकतो. सर्वसाधारणपणे, आरोग्य विमा पॉलिसीमध्ये सर्व प्रकारच्या उपचारांचा समावेश होतो. परंतु गंभीर आजाराच्या वेळी सप्लिमेंट पॉलिसीचा उपयोग होतो. कारण स्टॅडर्ड पॉलिसीमध्ये फक्त वैद्यकीय खर्च कव्हर केला जातो. या पॉलिसीमध्ये गंभीर अथवा मोठ्या आजारावरील उपचारावेळी एकरकमी पैसे उपलब्ध होत नाहीत. दुसरीकडे जर तुम्ही पूरक पॉलिसी अंतर्गत गंभीर आजार कव्हर योजना घेतली असेल, तर कंपनी पॉलिसी मूल्याच्या मर्यादेपर्यंत तुम्हाला भरपाई देईल. मात्र, त्यासाठी पॉलिसीमध्ये आजाराचा उल्लेख असणे आवश्यक आहे.

वैयक्तिक अपघात विमा-

आरोग्य विमा अपघातांवेळी विनाविलंब नुकसान कव्हर केले जाते. मात्र त्यावेळी फक्त रुग्णालयाचा खर्च कव्हर केला जातो. त्या अपघातात तुम्ही अपंग झाल्यास विमा कंपनी कोणतेही आर्थिक संरक्षण देत नाही.अशा परिस्थितीत पूरक विमा पॉलिसी उपयोगी पडते. समजा अपघातामध्ये आरोग्यविमा पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला तरी पूरक विमा पॉलिसीमुळे नॉमिनीला पॉलिसी मूल्यानुसार नुकसान भरपाई प्राप्त होते.

दैनंदिन खर्चासाठी-

पॉलिसीधारक हॉस्पिटलायझेशनच्या दिवसापासून खर्चासाठी रोख पेमेंट करण्यासाठी हॉस्पिटल कॅश कव्हर पॉलिसी घेऊ शकतो. या पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी, विमाधारकाला किमान 24 तास रुग्णालयात राहावे लागते. हॉस्पिटलायझेशनच्या तारखेपासून सलग 14 दिवस प्रतिदिन 1,000 रुपये भरपाई मिळवता येते. एका वर्षात तुम्ही  जास्तीत जास्त 30 दिवस दैनदिन खर्च मिळवू शकता..

महिलेच्या प्रसुतीवेळी-
 
काही आरोग्य विमा कंपन्या फॅमिली फ्लोटर मेडिक्लेम पॉलिसी अंतर्गत मातृत्व खर्च कव्हर करतात. या पॉलिसीमध्ये नवजात बाळाचा जन्म आणि वैद्यकीय उपचारांशी संबंधित सर्व खर्च समाविष्ट असतो. मात्र काही वेळा प्रसुति दरम्यान आई अथवा नवजात अर्भकास काही इतर समस्या उद्भवल्यास डॉक्टरांची अपॉइंटमेंट फी, मेडिकल चेकअप आणि नंतर औषधांचा खर्च वाढतो. अशा परिस्थितीत हे खर्च कमी करण्यासाठी सप्लिमेंट पॉलिसी उपयुक्त ठरु शकते.