Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Home Loan Pre Payment: गृहकर्ज प्री-पेमेंट काय आहे? जाणून घ्या डिटेल्स

Home Loan Pre Payment: गृहकर्ज प्री-पेमेंट काय आहे? जाणून घ्या डिटेल्स

Home Loan Pre Payment: घर गृहकर्ज काढून घेतल्यावर, ते लवकरात लवकर सेटल व्हावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. यासाठी दोन पर्याय उपलब्ध असतात. यातला पहिला म्हणजे, EMI भरणे आणि दुसरा प्री-पेमेंट (Pre-Payment ) करणे. तर प्री-पेमेटचे फायदे-तोटे आपण आज जाणून घेणार आहोत.

गृहकर्ज घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उपयोगी आहे. त्याचा वापर प्रत्येक जण करतो. कारण, सध्या वाढत्या महागाईच्या काळात, घर घ्यायचे म्हटल्यावर, कर्ज काढल्याशिवाय पर्याय नाही. मात्र, कर्जाचे व्याजदर खूप जास्त असतात. त्यामुळे ते लवकर फेडून मोकळे व्हावे, ही सर्वांचीच इच्छा असते. 

यासाठी आपण प्री-पेमेंट हा पर्याय वापरू शकतो. मात्र, त्याचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत. आता फायदा म्हणजे, तुमच्या कर्जाची रक्कम कमी होऊ शकते आणि कर्ज ही कमी होते. तोटा पाहायला गेल्यास, कर्जदार व्यक्तीला टॅक्स बेनिफिटचा लाभ मिळणार नाही. अशाच अन्यही गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.

गृहकर्ज प्री-पेमेंट म्हणजे काय?

गृहकर्ज प्री-पेमेंट म्हणजे कर्जाची मुदत संपण्यापूर्वी तुमच्याजवळची उरलेली रक्कम कर्ज फेडण्यासाठी तुम्ही वापरु शकता. यामुळे कर्जाचा भार कमी होऊ शकतो आणि जास्त पैसे गुंतवल्यामुळे कर्जाची मुदत कमी व्हायला मदत होऊ शकते. यामुळे ज्यांच्याकडे बऱ्यापैकी पैसे आहेत, असे कर्जदार प्री-पेमेंटचा पर्याय निवडतात.

गृहकर्जासाठी प्री-पेमेंट करण्याचे फायदे

तुम्ही गृहकर्जासाठी प्री-पेमेंट करण्याचे ठरवले असल्यास यामुळे तुमची कर्जाची मुदत कमी होईल. तसेच, दीर्घ काळासाठी कर्ज भरावे लागणार नाही. याशिवाय प्री-पेमेंट केल्यामुळे ते मूळ रकमेत जमा होतील. यामुळे तु्म्हाला येणाऱ्या महिन्यात व्याजाची कमी रक्कम भरावी लागेल. तसेच, बॅंकेचा व्याजदर अधिक असतो, त्यामुळे प्री-पेमेंट करणे चांगले. यामुळे कर्जाचा भार कमी होण्यास मदत होते.

उरलेली रक्कम गुंतवताय?

तुम्ही तुमची उरलेली किंवा जमा करुन ठेवलेली रक्कम देऊन प्री-पेमेंट करणार आहात. त्यामुळे तुम्हाला आर्थिक अडचणींना सामोर जावे लागू शकते. कारण, प्री-पेमेंटसाठी तुमच्या जवळच्या सर्व सेव्हिंग्ज तुम्ही देणार आहात. याचमुळे तुमच्याजवळची उपलब्ध असलेली रक्कम ही कमी होऊ शकते. जर तुम्ही कुठे गुंतवणूक करणार असल्यास, ती तुम्हाला करता येणार नाही. त्यामुळे या गोष्टीचा विचारही तुम्हाला करावा लागणार आहे.

गृहकर्जासाठी प्री-पेमेंट करण्याचे तोटे

तुम्ही प्री-पेमेंट करत असल्यास, तुम्हाला कर्जासाठी मिळणाऱ्या टॅक्स बेनिफिटवर पाणी सोडावे लागणार आहे. कारण, प्री-पेमेंट केल्यावर तुम्हाला सेक्शन 80C अतंर्गत टॅक्स कपातीचा लाभ घेता येणार नाही. तसेच, गृहकर्जावरील व्याजावर मिळणाऱ्या 2 लाखापर्यंतच्या सवलतीचा लाभ घेता येणार नाही.

प्री-पेमेंट योग्य की अयोग्य?

गृहकर्जाच्या प्री-पेमेंटचे बरेच फायदे आहेत. मात्र, प्री-पेमेंट करण्याची अचूक वेळ तुम्हाला हेरता आली पाहिजे. तसेच, कर्जदार जर गृहकर्जासाठी टॅक्स बेनिफिट सोडणार असेल, तर प्री-पेमेंट चांगला पर्याय ठरु शकतो. मात्र, त्याआधी त्यांना त्यांच्या आर्थिक गरजा आणि ध्येयांचा विचार करणे गरजेचे आहे.