What is Listing Of Shares: रिलायन्स इंडस्ट्रीजमधून विभक्त झालेल्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचा शेअर सोमवारी (दि. 21 ऑगस्ट) लिस्ट झाला. पण लिस्टिंग म्हणजे नेमके काय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर आज आपण लिस्टिंग ऑफ शेअर्स म्हणजे काय हे समजून घेणार आहोत.
लिस्टिंग या शब्दाचा अर्थ एखाद्या कंपनीचे शेअर्स स्टॉक एक्सचेंजच्या यादीत समावेश होणे. कंपनी अॅक्ट 2013/1956 अंतर्गत शेअर्सचे लिस्टिंग करणे काय अनिवार्य नाही. पण जर एखाद्या पब्लिक लिमिटेड कंपनीला शेअर्स आणि डिबेन्चर्स इश्यू करायचे असतील तर स्टॉक एक्सचेंजवर लिस्टिंग करणे गरजेचे आहे.
कंपन्यांचे शेअर्स स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टिंग झाले की, त्या कंपन्यांना प्राधान्य मिळते आणि लिस्टिंग झालेल्या शेअर्सचीच खरेदी-विक्री केली जाते. कंपनीचे शेअर्स स्टॉक एक्सचेंजवर लिस्टिंग झाले की, त्याच्या व्यवहारांमध्ये आपोआप पारदर्शकपणा येतो. कारण या लिस्टिंग झालेल्या कंपन्यांवर सेबीची बारीक नजर असते. कंपन्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती सेबीला द्यावी लागते. त्यामुळे स्टॉक एक्सचेंजवर लिस्टिंग होणे, हे कंपनी, गुंतवणूकदार आणि किरकोळ गुंतवणूकदार असे सर्वांच्याच फायद्याचे ठरते.
Table of contents [Show]
शेअर्स म्हणजे काय? What is Shares?
शेअर्स किंवा सिक्युरिटीज म्हणजे एखादी कंपनी पैसे उभे करण्यासाठी किंवा कंपनीतील गुंतवणूक वाढवण्यासाठी कंपनीतील काही समभाग सार्वजनिकरीत्या विक्रीसाठी उपलब्ध करते. त्याला शेअर्स म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, जेव्हा आपण एखाद्या कंपनीचे शेअर्स म्हणजेच समभाग विकत घेतो. तेव्हा आपण त्या कंपनीच्या मालकीचे काही भाग विकत घेतो. शेअर्स विकत घेणाऱ्याला त्या कंपनीत शेअर्सच्या टक्क्यांप्रमाणे मालकी हक्क मिळतो. त्याला इंग्रजीमध्ये शेअरहोल्डर (भागधारक) म्हणतात.
लिस्टेट सिक्युरिटीज म्हणजे काय? What is Listing of Securities?
शेअर्सप्रमाणेच कंपन्या वेगवेगळ्या फॉर्ममध्ये निधी गोळा करण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामध्ये बॉण्ड्स, म्युच्युअल फंड, एनएफओ, ईटीएफ, ऑप्शन्स, फ्युचर्स अशा वेगवेगळ्या प्रकारांचा समावेश असतो. या सर्वांना फायनान्सच्या भाषेत लिस्टेड सिक्युरिटीज म्हणतात. लिस्टिड सिक्युरिटीजला स्टॉक एक्सचेंजकडून अधिकृत मान्यता मिळवण्यासाटी काही कायद्यात्मक गोष्टींची पूर्तता करावी लागते.
शेअर मार्केटमध्ये कंपन्यांच्या समभागांची म्हणजेच शेअर्सची खरेदी-विक्री होते. भारतात सर्व कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी-विक्री शेअर मार्केटमधूनच केली जाते. भारतात दोन प्रमुख स्टॉक एक्सचेंज आहेत; बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange-BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange-NSE).
शेअर लिस्टिंगची उद्दिष्ट्ये
- कंपनीच्या आर्थिक विकासासाठी पैशांची जुळवाजुळवा करणे.
- कंपनीच्या कामामध्ये सूसूत्रता आणण्यासाठी नियंत्रण आणि पर्यवेक्षण यंत्रणा निर्माण करणे.
- कंपनीसाठी भांडवल उभे करण्यासाठी.
- गुंतवणूकदारांना स्वत:च्या मर्जीने शेअर्सची खरेदी-विक्री करण्यासाठी.
शेअर लिस्टिंगसाठी नियम व अटी काय आहेत?
- आयपीओसाठी आणण्यासाठी आणि फॉलो-अप पब्लिक ऑफर आणताना संबधित कंपनीकडे अनुक्रमे 10 कोटी आणि 3 कोटी रुपये भांडवल असणे आवश्यक आहे.
- सार्वजनिक ऑफर देताना त्याचा व्हॉल्यूम किमान 10 कोटी रुपये असणे गरजेचे आहे.
- कंपनीचे मार्केटमधील भांडवल किमान 25 कोटी रुपये असणे आवश्यक आहे.
- आयपीओ आणणारी कंपनी, पार्टनर, गुंतवणूकदार हे सेबीच्या परवानगीशिवाय कोणताही निर्णय परस्पर घेऊ शकत नाही.
- शेअर्सचे लिस्टिंग झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत शेअर्सचे वाटप झाले पाहिजे.