तुम्ही ऑनलाईन बँकिंगचा वापर करत असाल तर आयएफएससी कोड IFSC Code हा शब्द परिचयाचा असेल. इंटरनेट बँकिंग (Internet Banking)च्या माध्यमातून एखाद्याच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करण्यासाठी किंवा आपल्या बँक खात्यात पैसे भरण्यास सांगताना आयएफएससी कोड द्यावा लागतो. काय असतो हा आयएफएसी कोड?
सोप्या शब्दांत सांगायचे तर आपल्या भागाचा पिनकोड क्रमांक असतो. तसा आयएफएससी कोड हा बँकांच्या शाखेचा पिनकोड नंबर असतो. त्यामुळे अकाउंट नंबर इतकाच तोही अचूक नमूद करणे गरजेचे असते.
- आयएफएससी कोड हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रत्येक बँकेला दिलेला, अक्षर आणि संख्या यांचा मिळून बनलेला 11 क्रमांकाचा कोड आहे.
- अक्षरे आणि अंक दोन्ही मिळून हा कोड तयार होतो.
- बँकांच्या शाखांची ओळख म्हणून प्रत्येक बँकेच्या शाखेला दिलेला हा एकमेव स्वतंत्र कोड आहे.
- या कोडमधील पहिली चार अक्षरे असतात जे बँकेचे नाव दर्शवतात. पाचवा क्रमांक हा शून्य असतो ज्यामुळे किती शाखा आहेत हे समजते. तर शेवटचे सहा अंक हे बँकेचे स्थान सांगतात.
- आयएफएससी कोड हा प्रत्येक बँकेच्या चेकबुकवरही आणि पासबुकवरही लिहिलेला असतो. आपण बँकेत बचत खाते उघडतो तेव्हाही हा कोड आपल्याला देण्यात येतो.
- प्रत्येक बँक आणि तिची शाखा यांचा आयएफएससी कोड हा एकमेव असतो.
- कोणत्याही बँकेचा किंवा शाखेचा कोड अशा प्रकारचे बदल किंवा रद्द करण्याची वेळ येत नाही. मात्र त्यात बदल करण्याचे संपूर्ण अधिकार हे केंद्रीय बँकेकडे असतात. एखाद्या बँकेचा किंवा शाखेचा आयएफएससी कोड बदलला तर नवा कोड छापलेल्या चेकबुकची मागणी आपल्या बँकेकडे करता येते.
- हल्ली बँकांचे विलीनीकरण केले जात आहे. अशा वेळी आपली बँक जर एखाद्या बँकेत विलीन झाली असेल तर आयएफएससी कोडही बदलतो हे लक्षात ठेवा.