Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Saving Account Vs Current Account: बचत व चालू खात्यात फरक काय? या खात्यांमधील किमान रकमेचा नियम काय?

Saving account vs Current account

Saving Account Vs Current Account: बँक खाते ही आर्थिक व्यवहाराची मूलभूत गरज आहे. बँकेत बचत आणि चालू (Saving & Current) अशा दोन्हीही प्रकारची खाती उघडली जातात. ही खाती वेगवेगळ्या व्यवहारांसाठी वापरण्यात येतात. या दोन्ही खात्यात नेमका काय फरक असतो, हे जाणून घेऊया.

पैशांची बचत व्हावी या हेतुने बँकेत खाते उघडले जाते. या बचत खात्याव्यतिरिक्त बँकेत सॅलरी अकाउंट, झिरो बॅलन्स खाते, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष प्रकारची खाती असतात. यासाठी व्याजदर ही वेगवेगळे असतात. चालू खाते हे प्रामुख्याने नियमितपणे पैशांचा मोठा व्यवहार करणाऱ्या व्यवसायिकांसाठी असते. तसेच, या खात्यातील रकमेवर बँकेकडून कुठलेही व्याज दिले जात नाही.

किमान शिल्लक रक्कम ठेवणे आवश्यक (Minimum Balance Required)

झिरो बॅलन्स अकाउंट आणि सॅलरी अकाउंट शिवाय इतर सर्व बचत खात्यांमध्ये (Saving Account) किमान शिल्लक रक्कम ठेवणे आवश्यक आहे. या खात्यांमध्ये किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यास खातेधारकाला दंड भरावा लागू शकतो . पण चालू खात्यात (Current Account) असे होत नाही. यामध्ये तुम्हाला उपलब्ध शिल्लक रकमेपेक्षा जास्त रक्कम काढण्याची मुभा मिळते.

कमाल व्यवहाराची मर्यादा (Maximum Transaction limit)

सेव्हिंग अकाउंटमधून व्यवहार करताना बॅंकेकडून एका महिन्यात किती व्यवहार केले जावेत, यावर मर्यादा घातली जाते. पण करंट अकाउंटमध्ये अशी कुठलीही मर्यादा नाही. याशिवाय, बचत खात्यात जास्तीत जास्त रक्कम ठेवण्याचीही मर्यादा आहे; तर चालू खात्यात अशी कोणतीही मर्यादा नाही.

बचत खात्यांना बँकेची सुविधा (Bank Facilities to Savings Accounts) 

अनेक बँका बचत खात्यांवर जीवन आणि सामान्य विम्याची (Life & General Insurance) सुविधा देतात. तसेच, बँकेत बचत खाते असलेल्या खातेधारकांना लॉकर फीमध्ये 15 ते 30 टक्के सूट मिळते. बचत बँक खात्यातून तुम्ही रिचार्ज किंवा वीज बिल तात्काळ भरू शकता. तुलनेने चालू खात्यात पैसे जमा करणे व ट्रान्सफर करणे अतिशय सोपे असते. त्याचप्रमाणे खातेधारकांना चालू खात्यावर अतिशय सहजरित्या कर्ज मिळू शकते. 

Source: www.zeebiz.com