बॅंकेच्या अकाऊंटिंग सिस्टिममध्ये बॅंकेचे व्यवहार दोन वेगवेगळ्याप्रकारे मांडले किंवा दर्शवले जातात. एक क्रेडिट आणि दुसरा डेबिट. हे आपण बॅंकेच्या पासबुकमध्ये ही पाहू शकतो. पासबुकमध्ये दोन प्रकारच्या नोंदी असतात. एक पैसे जमा झाल्याची आणि दुसरी पैसे कट केल्याची नोंद. ज्यावेळी खात्यात पैसे जमा होतात. त्याला क्रेडिट (Credit) म्हटले जाते आणि जेव्हा पैसे कट होतात, त्याला डेबिट (Debit) म्हटले जाते. तर पासबुकमध्ये डाव्या बाजूला नोंदवलेली रक्कम ही डेबिट रक्कम असते. ही नेहमी आपल्या खात्यातून जमा झालेली राशी दाखवत असते.
Table of contents [Show]
डेबिट म्हणजे काय? What is Debit?
बॅंकिंग किंवा अकाऊंटिंगच्या भाषेत डेबिटची व्याख्या सांगायची झाली तर, डेबिट हा लायब्लिटीमध्ये घट आणि अॅसेटमध्ये वाढ झाल्याचे दर्शवते. तसेच बॅंकेत ही नोंद दोन वेगवेगळ्या प्रकारे नोंदवली जाते. एक डेबिट आणि दुसरी क्रेडिट. डेबिटची नोंद ही नेहमी क्रेडिटच्या नोंदींना बॅलन्स करत असते. बॅंकिंग फिल्डमध्ये डेबिट ही ‘dr’ या संक्षिप्त नावाने ओळखली जाते. तर क्रेडिट ही ‘cr’ या संक्षिप्त नावाने ओळखली जाते. डेबिट ही नेहमी अकाऊंट्सच्या डाव्या बाजूस दर्शवली जाते. तसेच डेबिट हा लायब्लिटीमध्ये घट आणि अॅसेटमध्ये वाढ झाल्याचे दर्शवत असतो.
डेबिट कसे कार्य करते? How Debit works in Account?
अकाऊंटींगमध्ये जिथे दोन प्रकारची नोंद केली जाते; विशेषत: बुककिपिंगमध्ये डेबिटच्या नोंदी क्रेडिट्सच्या वर नोंदवल्या जातात आणि अकाऊंटिंगमध्ये डेबिटच्या नोंदी या नेहमी डाव्या बाजूला दर्शवल्या जातात.
अकाऊंटमधील 3 गोल्डन रूल्स | 3 Golden Rules in Account
- वैयक्तिक बॅंक खात्यात डेबिट हा रिसिव्हर आणि क्रेडिट हा गिव्हर असतो.
- रिअल अकाऊंटमध्ये जे काही जमा होते ते डेबिट आणि जे काही बाहेर जाते ते क्रेडिटेड म्हणून नोंद होत असते.
- तर नॉमिनल खात्यात सर्व खर्च आणि वजा रक्कम डेबिटमध्ये जमा होते तर खात्यात जमा झालेली रक्कम ही क्रेडिटमध्ये जमा होती.
डेबिट नोट म्हणजे काय? What is Debit Note?
फायनान्स आणि बॅंकिंगच्या भाषेत डेबिट नोट (Debit Note) ही संज्ञा पुरावा म्हणून वापरली जाते. जसे की, एखाद्या व्यवसायिक दुसऱ्या व्यवसायिकाशी व्यवहार करताना डेबिट नोटचा वापर करतात. डेबिट नोटचा वापर हा खासकरून खरेदीची परतफेड करण्यासाठी आणि परतफेड करण्यासाठी ठरवलेली रक्कम व्हॅलिडेट करण्यासाठी केला जातो.