Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cybersecurity Insurance: सायबर सुरक्षा विमा म्हणजे काय? तुमची इंटरनेटवरील माहिती सुरक्षित आहे का?

cybersecurity insurance

ऑनलाइन प्रणालीवर तसेच सेव्ह केलेल्या माहितीवर हॅकर्सने अनेक वेळा हल्ले केल्याचे उदाहरणे समोर आले आहेत. यामध्ये आर्थिक नुकसानीबरोबर महत्त्वाच्या माहितीचीही चोरी झाल्याची अनेक उदाहरणे घडली आहेत. त्यामुळे सायबर विमा क्षेत्र पुढे येत आहे. कंपन्या ऑनलाइन धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी सायबर विमा (cybersecurity insurance) काढतात. जर कंपनीचे काही आर्थिक नुकसान झालेच तर विमा कंपनीकडून ते भरून निघेल हा त्

२१ व्या शतकात इंटरेनटचा प्रसार झाल्याने सर्व काही ऑनलाइन झाले आहे. सर्व उद्योग व्यवसाय आपल्या सेवा आणि उत्पादने ऑनलाइन ग्राहकांना उपलब्ध करुन देतात. इंटरनेटनने संपूर्ण जग जवळ आले आहे. सायबर क्षेत्राचा जसा फायदा झाला तसे त्याचे काही तोटेही आहेत. ऑनलाइन प्रणालीवर तसेच सेव्ह केलेल्या माहितीवर हॅकर्सने अनेक वेळा हल्ले केल्याचे उदाहरणे समोर आले आहेत. यामध्ये आर्थिक नुकसानीबरोबर महत्त्वाच्या माहितीचीही चोरी झाल्याची अनेक उदाहरणे घडली आहेत. त्यामुळे सायबर विमा क्षेत्र पुढे येत आहे. कंपन्या ऑनलाइन धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी सायबर विमा (cybersecurity insurance) काढतात. जर कंपनीचे काही आर्थिक नुकसान झालेच तर विमा कंपनीकडून ते भरून निघेल हा त्यामागे हेतू आहे. 

लाखो ग्राहकांची माहिती सुरक्षित ठेवण्याचे आव्हान - 

सायबर सुरक्षा विमा क्षेत्राची वाढ अलिकडच्या काळात वाढत आहे. मात्र, याबाबतच्या तरतुदी अद्याप प्राथमिक अवस्थेत आहेत. जसे की, एखाद्या कंपनीकडे लाखो ग्राहकांचा डेटा असतो. मात्र, विमा कंपनी हा डेटा विमा कवचाच्या कक्षेत घेणार नाही. त्यासाठी कंपनीला अतिरिक्त विमा घ्यावा लागेल. काही कंपन्या त्रैमासिक, सहा महिन्यांचा किंवा वर्षाचा सायबर सुरक्षा विमा घेतात. कंपनीकडील डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी कंपन्याही लाखो रुपये खर्च करुन एथिकल हॅकर्स कामावर ठेवते. वेळोवेळी सुरक्षेचे सर्व उपाय लागू करते. मात्र, तरीही अमुक एका कंपनीवर सायबर हल्ला झाला याबाबत तुम्ही ऐकले असेल. 

सायबर इन्शुरन्सची सर्वाधिक गरज कोणाला?

आर्थिक क्षेत्रातील कंपन्या जसे की, बँक, शेअर मार्केट फर्म, ब्रोकर फर्म कंपन्यांच्या डेटावर सायबर हल्ला झाल्यास मोठे नुकसान होऊ शकते. ग्राहकांची वैयक्तिक माहिती, बँक खात्याची माहिती, फोन नंबर, आर्थिक माहिती ज्या कंपन्यांकडे सेव्ह असते त्या कंपन्यांना सायबर इन्शुरन्सची जास्त गरज असते. पारंपरिक विमा पॉलीसीमध्ये सायबर इन्शुरन्सचा समावेश नसतो. त्यामुळे हे क्षेत्र नव्याने पुढे येत आहे. या क्षेत्रामध्ये नव्याने येणाऱ्या कंपन्या फक्त फर्स्ट पार्टी संरक्षण पुरवत आहेत तर काही कंपन्या थर्ड पार्टी डेटाचाही विम्यात समावेश करत आहेत. हा विमा फक्त कंपन्या घेऊ शकतात. ग्राहकांसाठी हा विमा नाही.  

सोनी प्ले स्टेशनवर सायबर हल्ला

२०११ साली सोनी कंपनीच्या प्ले स्टेशन प्रणालीवर सायबर हल्ला झाला होता. हॅकर्सनी साडेसात कोटी ग्राहकांच्या माहितीवर डल्ला मारला होता. २३ दिवस प्ले स्टेशनच्या ग्राहकांना गेमिंग कंसोलवर लॉगइन होता येत नव्हते. या सायबर हल्ल्यामुळे सोनी कंपनीला १७१ मिलियन डॉलरचे नुकसान झाले. हा सर्व तोटा कंपनीने स्वत: भरून काढला. कारण कंपनीकडे कोणताही सायबर सुरक्षा विमा कवच नव्हते. फक्त कंपनीची मालमत्तेच्या नुकसानीचा विमा होता. मात्र, सायबर सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नव्हती, असे न्यायालयानेही म्हटले. हा सायबर हल्ला इतर कंपन्यांसाठी धडा शिकवून गेला.