Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Consumer Durable Loans: कन्झ्युमर ड्युरेबल लोन म्हणजे काय? वाचा सविस्तर

Consumer Durable Loans: कन्झ्युमर ड्युरेबल लोन म्हणजे काय? वाचा सविस्तर

Image Source : www.herofincorp.com

मार्केटमध्ये सध्याच्या घडीला लोनचे खूप पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी एक कन्झ्युमर ड्युरेबल लोन आहे. जे पर्सनल लोनच्या अंतर्गत येते. ज्या लोकांना घरात सर्व सुखसोयी हव्या आहेत. ते लोक कन्झ्युमर ड्युरेबल लोनचा पर्याय निवडू शकतात. हे लोन जास्त करुन 0 टक्के व्याजदर किंवा नो कॉस्ट EMI वर मिळू शकते.

Consumer Durable Loans: आता सणासुदीचा सिझन असल्यामुळे सर्वच ठिकणी ऑफर मिळत आहे. यामध्ये घरगुती लागणाऱ्या वस्तूवर मोठ्या प्रमाणात ऑफर असतात. कारण, घरात काही महत्वाच्या गोष्टी असणे खूप गरजेचे असते. यामध्ये इलेक्ट्राॅनिक गॅजेट, स्मार्टफोन, टीव्ही, होम थेटर, वाॅशिंग मशिन आणि किचनचे साहित्य ही लिस्ट न संपणारी आहे. त्यामुळे ज्या कोणाला या गोष्टी खरेदी करायच्या आहेत, ते कन्झ्युमर ड्युरेबल लोनचा पर्याय निवडू शकतात. यामध्ये 10000 रुपयांपासून 15 लाखापर्यंत लोन मिळू शकते.

कन्झ्युमर ड्युरेबल लोन म्हणजे काय?

ज्या लोकांना घरात सर्व सुखसोयी हव्या आहेत. ते लोक कन्झ्युमर ड्युरेबल लोनचा पर्याय निवडू शकतात. यामध्ये घरगुती उपकरणांपासून इलेक्टाॅनिक वस्तू आणि अन्य महत्वाच्या वस्तूंचा समावेश होतो. हे लोन जास्त करुन  0 टक्के व्याजदर किंवा नो कॉस्ट EMI वर मिळू शकते. पण, काही ठिकाणी यावर जास्त व्याजदरही आकारला जाऊ शकतो. त्यामुळे कन्झ्युमर ड्युरेबल लोन घ्यायच्या आधी काही गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे.

कन्झ्युमर ड्युरेबल लोन घेण्याआधी या गोष्टी पाहाच

  • व्याजदर जाणून घ्या

काही ठिकाणी इतर लोन घेण्याच्या पर्यायांपैकी कन्झ्युमर ड्युरेबल लोनवर जास्त व्याजदर आकारला जातो. त्यामुळे वस्तू घेण्याआधी दर चेक करणे आवश्यक आहे. कारण, असे न केल्यास कर्ज वाढून तुम्ही घेत असलेली वस्तू तुम्हाला महागात पडू शकते.

  • छुपे शुल्क तपासा

काही वेळा ड्युरेबल लोनवर छुपे शुल्क आकारले जातात, जे लोकांच्या लक्षात येत नाही. यामध्ये सामान्यत प्रोसेसिंग शुल्क, प्री-पेमेंट पेनल्टी आणि इन्शुरन्सच्या किमतींचा समावेश असू शकतो. त्यामुळे या गोष्टी लोन घेण्याआधी पाहणे फायद्याचे ठरु शकते.

  • क्रेडिट स्कोअरवर होतो परिणाम

एखाद्या व्यक्तीने कमी अवधीत एकापेक्षा जास्त ठिकाणी ड्युरेबल लोनसाठी अर्ज केला असल्यास त्याचा क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे भविष्यात तुम्हाला लोन मिळणे कठीण होऊ शकते. तसेच, ड्युरेबल लोन हे घरगुती वस्तू घेण्यासाठी असल्याने, लेंडर क्रेडिट स्कोअर चेक करायला जास्त प्राधान्य देतात.

  • हवी ती वस्तू घेण्याची संधी

या लोनमुळे पाहिजे तेवढे पैसे नसले तरी तुम्ही जीवनावश्यक वस्तू मिळवू शकता. कारण, या लोनमुळे त्यांना नवीन तांत्रिक गोष्टींशी जुळवून घेता येणार आहे. त्यामुळे त्यांचे आयुष्य सुधारण्यास मदत होणार आहे. याशिवाय पाहिजे ती वस्तू घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

  • सुलभ रिपेमेंटचा पर्याय

बऱ्याच ठिकाणी लेंडर्स लोन घेणाऱ्यांना ते फेडण्यासाठी नो काॅस्ट EMI आणि 0 डाउन पेमेंटचा पर्याय उपलब्ध करुन देतात. यामुळे त्यांना त्यांची आर्थिक बाजू मॅनेज करायला वेळ मिळते. तसेच, पेमेंट करण्याची ही सर्वात योग्य पद्धत असल्याने ग्राहकांना पैसे फेडण्याचे टेन्शन राहत नाही.

  • क्रेडिट स्कोअऱ सुधारण्यास वाव

जर ग्राहकांनी दिलेल्या मुदतीत ड्युरेबल लोन फेडेले, तर त्यांची सकारात्मक क्रेडिट हिस्ट्री बनू शकते. यामुळे भविष्यात तुम्हाला कर्जाची गरज भासल्यास, तुम्हाला तातडीने कर्ज मिळू शकते. त्यामुळे एकही हप्ता न चुकू देणे ग्राहकांच्या हिताचे ठरणार आहे.

  • ऑफर्सचा होतो फायदा

काही लेंडर्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बऱ्याच सुविधा प्रदान करतात, यामध्ये वाॅरंटी, इन्शुरन्स कव्हरेज आणि कॅशबॅकचा समावेश असतो. त्यामुळे या सुविधांचा लाभ घेतल्यास वस्तूच्या खरेदी रकमेवर बचत करता येऊ शकते. तसेच सणासुदीच्या काळात घरगुती वस्तूंवर मोठ्या प्रमाणात ऑफर मिळतात, त्यामुळे तेव्हा देखील तुम्ही कन्झ्युमर ड्युरेबल लोनचा वापर करुन हवी ती वस्तू घेऊ शकता.