Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

टॉप अप लोन म्हणजे काय? Top Up Loan

टॉप अप लोन म्हणजे काय? Top Up Loan

कोणाला मिळते टॉप अप लोन (top up loan eligibility), त्याचा व्याज दर काय याबद्दल जाणून घ्या अधिक माहिती.

एकदा कर्ज घेतल्यानंतर त्याचे हप्ते भरतानाच अनेकदा दमछाक होते. पण काही वेळा अडचणीच अशा येतात की कर्जाची पुन्हा गरज भासते. अशा वेळी काय करायचे असा प्रश्न पडतो. तुम्ही नियमित कर्जाचे हप्ते फेडणारे कर्जदार असाल तर अशा प्रसंगी टॉप अप लोनचा पर्याय वापरता येईल.

पर्सनल लोन, बिझनेस लोन, प्रॉपर्टी लोन, एज्युकेशन लोन अशा कोणत्याही कर्जावरही टॉप अपची सुविधा मिळते. पण सर्वधाधारणपणे गृहकर्जावरील टॉप अप लोन फायदेशीर ठरते.

टॉप अप लोनचा वापर मुलांची फी, शॉपिंग, दुकान किंवा घर खरेदी, मुलांचे लग्न, घराचे नुतनीकरण, वैद्यकीय खर्च अशा कोणत्याही कारणासाठी करता येतो. याबाबतची स्पष्ट कल्पना बँकेला देणे गरजेचे असते.

या कर्जाची परतफेड जुन्या कर्जाच्या कालावधीपर्यंत करु शकता. उदाहरणार्थ, आपण 20 वर्षांसाठी गृहकर्ज घेतले असेल आणि पाच वर्षांनी टॉप अप लोन घेत असाल तर त्याचा कालावधी 10 ते 15 वर्षाचा ठेवू शकता.

यावरील व्याजदर हा गृहकर्जावरील व्याजाप्रमाणेच आकारला जातो. त्यामुळे पर्सनल लोनपेक्षाही कमी व्याजदरात आपल्याला कर्ज उपलब्ध होते. कर्जाचा कालावधी जेवढा कमी राहील, तेवढे व्याज कमी जाईल. 

बँक अधिकार्‍यांशी चांगल्या वाटाघाटी केल्यास टॉप अप कर्ज सहजपणे मिळू शकते. टॉप अप लोन हे मूळ कर्जापेक्षा अधिक घेता येत नाही.

या लोनचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे यासाठी आपल्याला फारशी कागदपत्रांची प्रक्रिया पार पाडावी लागत नाही. कारण मूळ कर्ज घेताना आपण सर्व प्रक्रिया पार पाडलेल्या असतात. तसेच त्यावेळच्या उत्पन्नापेक्षा उत्पन्नही वाढलेले असते. त्यामुळे उत्पन्नाची माहिती, आयकर रिटर्नस, अन्य कोणते कर्ज नाही ना याची माहिती व अन्य काही प्राथमिक कागदपत्रे दिल्यानंतर काही दिवसांतच हे कर्ज मंजूर होते. आपल्या होम लोनच्या EMI बरोबरच याचाही EMI आपल्या बँक खात्यातून कट केला जातो.