Bank Account: सद्यस्थितीमध्ये क्वचितच एखादा व्यक्ती आढळेल ज्याचे बँक खाते (bank account) नाही. सरकारच्या विविध योजनांच्या लाभासाठी बँक खाते असणे अत्यंत आवश्यक आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा जर अचानक मृत्यू (death) झाला तर त्याच्या बँक खात्याचे काय होते? किंवा काय करावे हे बहुतेकांना माहित नसते. काही लोक ते आहे तसे राहू देतात, काही लोक त्यातील पैसे काढून घेऊन त्यावर दुर्लक्ष करतात. कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूनंतरही अशा अनेक जबाबदाऱ्या असतात, ज्या कुटुंबातील इतर सदस्यांना पार पाडाव्या लागतात. बँकिंग, विम्याशी (Banking, Insurance) संबंधित अनेक कामे केली जातात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बँक खात्याचे काय करायचे? याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.
मृत्यूनंतर खात्याचे काय होते? What happens to the account after death?
मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना त्या खात्याबद्दल माहिती नसल्यास, 2 वर्षांपर्यंत कोणताही व्यवहार (transactions) न झाल्यास ते निष्क्रिय (inactive) केले जाते. यानंतर बँकेच्या ग्राहकाशी संपर्क साधून खाते सक्रिय करण्यास सांगितले जाते. जर हे 10 वर्षे राहिले, म्हणजे समजा 10 वर्षे निष्क्रिय खात्यात कोणताही व्यवहार झाला नाही, तर त्यात जमा केलेले पैसे आणि त्याचे व्याज शिक्षण आणि जागरूकता निधीमध्ये हस्तांतरित (Transferred to Education and Awareness Fund) केले जाते. मात्र, त्याची माहिती ग्राहकांच्या घरी दिली जाते.
खात्याचे काय करावे? What to do with the account?
तुम्ही ते सहज बंद करू शकता, पण ते बंद करण्याची घाई करू नये. कारण त्यात फॅमिली पेन्शन, डिव्हिडंड, व्याज (Family Pension, Dividend, Interest) इत्यादी काही उत्पन्न असेल जे कुटुंबासाठी उपयुक्त ठरेल. रिझव्र्ह बँकेने (Reserve Bank) संबंधितांसाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही. तुम्ही कधीही बँकेत खाते बंद करण्यासाठी अर्ज देऊ शकता. कुटुंबाची मानसिक तयारी असेल तेव्हा हे काम करता येते. आरबीआयच्या सूचनेनुसार, बँकेला पैसे काढण्यासाठीचा अर्ज १५ दिवसांत पूर्ण करावा लागेल.
खाते बंद करायचे असल्यास….. If you want to close the account…..
जर तुम्हाला खाते बंद करायचे असेल तर मृत व्यक्तीचे नोटराइज्ड मृत्यू प्रमाणपत्र (Notarized death certificate) द्यावे लागेल. जर नॉमिनी असेल तर नॉमिनीला सर्व पैसे मिळतील नंतर त्याला ते पैसे खऱ्या हक्काच्या व्यक्तीला सोपविता येतात. परंतु जर कोणी नॉमिनी नसेल, तर वारस असलेल्या कुटुंबातील सदस्याला मृत्यू प्रमाणपत्रासह स्वतःच्या आणि मृत व्यक्तीच्या नातेसंबंधाची कागदपत्रे बँकेत सादर करावी लागतील.