बहुतांश कंपन्यांमध्ये नव्याने जॉईन होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सॅलरी अकाउंटची सुविधा दिली जाते. सॅलरी अकाउंट हे झिरो बॅलन्स श्रेणीतील अकाउंट असल्याने खातेदाराला वेतनाची पूर्ण रक्कम वापरता येते. याशिवाय सॅलरी अकाउंटवर इतर सुविधा देखील मिळतात. मात्र नोकरी बदलल्यानंतर सॅलरी अकाउंटमध्ये वेतन जमा होत नाही. सलग तीन महिने सॅलर अकाउंटमध्ये वेतनाची रक्कम जमा झाली नाही तर बँक या खात्याबद्दल परस्पर निर्णय घेऊ शकते.
सॅलरी अकाउंटधारकांना खासगी आणि सरकारी बँकांकडून काही खास सवलती दिल्या जातात. सॅलरी अकाउंट हे मूळात वेतनाची रक्कम कर्मचाऱ्याला अदा करण्यासाठी सुरु केलेले असते. मात्र कर्मचाऱ्याने नोकरी बदलली तर सॅलरी अकाउंटमध्ये दरमहा जमा होणारी वेतनाची प्रक्रिया ठप्प होते. सलग तीन महिने सॅलरी खात्यात जमा झाली नाही तर ते खातेत परस्पर बचत खात्यात परावर्तीत होते. असे झाल्यास खातेदाराला बचत खात्यानुसार नियमांचे पालन करावे लागते. जसे की किमान शिल्लक ठेवावी लागते अन्यथा दंड भरावा लागतो.
नोकरी बदल्याने सॅलरी अकाउंट वापराविना पडून असल्यास खातेधारकाने काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही विद्यमान सॅलरी अकाउंट नव्या कंपनीत सादर करुन त्याचा वापर करु शकता. तसे शक्य नसेल तर बँकेत जाऊन सॅलर अकाउंट बंद करण्याची प्रोसेस करु शकता. आणखी एक पर्याय म्हणजे सॅलरी अकाउंट ज्या बँकेत आहे त्या बँकेत जाऊन ते सर्वसाधारण बचत खाते करावे यासाठी लेखी अर्ज करु शकता.
बँकेकडून सॅलरी अकाउंटबाबत काय निर्णय घेतला जातो
-सॅलरी क्रेडीट होणे बंद झाले की तीन महिन्यानंतर बँकेकडून सॅलरी अकाउंट गोठवले जाते. त्याशिवाय बँकेकडून हे खाते निष्क्रिय खात्यांमध्ये वर्ग केले जाते.
-खातेदाराला निष्क्रिय खाते पुन्हा सुरु करण्यासाठी दंडात्मक रक्कम भरणे आवश्यक आहे. प्रत्येक बँकेसाठी दंडाची रक्कम वेगवेगळी असते.
-सॅलरी खात्याचे बचत खाते झाल्यानंतर ग्राहकाला वार्षिक शुल्क, डेबिट कार्ड-क्रेडीट कार्ड शुल्क, एसएमएस अलर्ट चार्जेस, चेक बुक चार्जेस भरावे लागतात.
-बचत खात्याच्या नियमानुसार ग्राहकाला दर महिन्याला किंवा तिमाही स्तरावर किमान शिल्लक ठेवणे बंधनकारक आहे. ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी किमान शिलकीची अट वेगवेगळी आहे.