शेअर बाजारातील ट्रेडर्स स्टॉक मार्केटमध्ये व्यवहार करुन नफा कमावताना आपल्याला दिसुन येतात. पण यासाठी बाजारात तेजी चालू आहे का मंदी हे ट्रेडर्सला सर्वात आधी समजून घ्यावे लागते. त्यासाठी स्टॉक मार्केट ट्रेडर्सला टिव्ही चँनल्स व ग्लोबल मार्केटवर लक्ष ठेवावे लागते. ग्लोबल मार्केट म्हटलं तर अमेरिकन मार्केट तसेच SGX NIFTY सारख्या जगातील महत्वाच्या स्टॉक मार्केटवर ट्रेडर्सला लक्ष ठेवणे फार गरजेचे असते. म्हणूनच आजच्या लेखात SGX Nifty बद्दल सविस्तर माहीती जाणुन घ्या.
"SGX NIFTY" म्हणजे नेमकं काय?
SGX निफ्टी, ज्याला सिंगापूर निफ्टी असेही म्हणतात हा भारताच्या NSE वरील निफ्टी-50 निर्देशांकावर आधारित फ्युचर्स करार आहे. SGX NIFTY सिंगापूर एक्सचेंज वर लिस्टेड असुन, भारताबाहेरील गुंतवणूकदारांना भारतीय बाजार बंद असतानाही निफ्टी-50 मध्ये ट्रेडिंग करण्याची परवानगी देतो.
SGX म्हणजेच "Singapore Stock Exchange" आणि NIFTY म्हणजे "National Stock Exchange Fifty" जेंव्हा हे दोन शब्द एकत्र बोलले जाते तेंव्हा यांना SGX NIFTY असे म्हणतात. भारतामध्ये ज्या पदधतीने दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग होते त्याचप्रमाणे जगभरातील गुंतवणूकदार SGX NIFTY मध्ये ट्रेडिंग करतात. SGX NIFTY चे ट्रेडिंग भारतीय बाजारांपूर्वी सुरु होते. यामुळे सिंगापुर निफ्टीचा अंदाज घेऊन भारतीय ट्रेडर्स सेन्सेक्स-निफ्टीचा कल काय असेल याचे भाकीत करतात. जेव्हा SGX NIFTY गँप अप किंवा गँप डाऊन ओपन होते तेव्हा भारतीय स्टॉक मार्केटमधील ट्रेडर्सला बीएसई आणि एनएसईबाबत थोडाफार अंदाज येतो.
"SGX NIFTY"चा सर्वात जास्त फायदा यांना होतो
SGX NIFTY चा सर्वात जास्त फायदा परदेशी गुंतवणूकदारांना होतो. कारण SGX NIFTY द्वारे त्यांना भारतातील निफ्टी-50 मध्ये गुंतवणूक करता येते व सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ही गुंतवणूक आणि ट्रेडिंग त्यांना फार सहजपणे करता येते.