Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Document For Buying Property: भारतात प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी कोणती कागदपत्रे महत्वाची आहेत?

Real Estate

Document For Buying Property: मालमत्ता खरेदी करण्याच्या प्रक्रियेत काही कायदेशीर कागदपत्रे आवश्यक आहेत. त्याशिवाय तुम्हाला मालकी हक्क मिळत नाही. काही वेळ याबाबतीत फसवणूक सुद्धा केली जाते. माहित करून घ्या आवश्यक कागदपत्रे.

Property Document: मालमत्तेमध्ये गुंतवणूक करणे हा एक फायदेशीर निर्णय असू शकतो. कारण भविष्यात त्यातून चांगला परतावा मिळतो. परंतु, यात गुंतवणूक करण्याच्या आधी त्याबाबत संपूर्ण माहिती, कायदे, नियम आणि प्रक्रिया माहित करून घेणे महत्वाचे आहे. मालमत्ता खरेदी करण्याच्या प्रक्रियेत काही कायदेशीर कागदपत्रे आवश्यक आहेत. गृहकर्जाद्वारे मालमत्ता खरेदी केल्यास कागदपत्राचे काम वाढते. गृहकर्ज घेऊन खरेदी केलेल्या मालमत्तेचे कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतील, आणि कर्ज न घेता खरेदी करत असाल, तर तुम्हाला थेट तुमच्या नावावर कागदपत्रे मिळतील. भारतात मालमत्ता खरेदी करण्यासाठी खालील काही कायदेशीर कागदपत्रे आवश्यक आहेत. 

विक्री करार 

हा सर्वात महत्वाचा कायदेशीर कागद आहे जो तुम्हाला तुम्ही खरेदी करत असलेल्या मालमत्तेचा मालकी हक्क देतो. त्यामुळे, जेव्हा तुम्ही मालमत्तेची Formal registration करता, तेव्हा तुम्हाला या कागदाची अत्यंत आवश्यकता असते. नोंदणीच्या वेळी हा कागद जवळील सब-रजिस्ट्रार कार्यालयात जमा करणे आवश्यक असते. 

जनरल पावर ऑफ अटॉर्नी

हा कागद अधिकृत व्यक्तीने केलेल्या विक्री खरेदी कराराचा (Sale Purchase Agreement) पुरावा आहे. उदाहरणार्थ, मालकाच्या वतीने अधिकृत डीलर. तुम्ही कर्जासाठी अर्ज कराल तेव्हा हा कागद कायदेशीर पुरावा म्हणून मागवला जातो. 

NOC, ना हरकत प्रमाणपत्र

घराचे काम पूर्ण करताना विकासकाने विविध प्राधिकरणांकडून एनओसी मिळवणे आवश्यक आहे. म्हणून, तुम्ही तुमच्या विकसकाला किंवा डीलरला NOC ची प्रत मिळवून ती तुमच्याकडे सुरक्षित ठेवण्यास सांगणे आवश्यक आहे.

खाते प्रमाणपत्र

या प्रमाणपत्राला राज्यानुसार वेगवेगळी नावे आहेत. नवीन मालमत्तेची नोंदणी करताना, ते सर्वात महत्वाचे कागदपत्रांपैकी एक मानले जाते. तुम्ही भविष्यात तुमची मालमत्ता विकल्यास आणि मालकी दुसर्‍या नावावर हस्तांतरित केल्यास देखील तुम्हाला त्याची आवश्यकता असेल. हा कायदेशीर मालमत्तेचा पुरावा म्हणून काम करतो. स्थानिक महानगरपालिकेच्या रेकॉर्डमध्ये तुमची मालमत्ता सूचीबद्ध आहे आणि तुम्हाला इमारत बांधण्यापूर्वी मंजूरी मिळाली आहे असे त्यातुन निष्पन्न होते. कोणत्याही बँकेत गृहकर्जासाठी अर्ज करताना हा कागद आवश्यक असेल.

real-or-fake-land-registry-1.jpg

पेमेंट रिसीप्ट 

नवीन मालमत्ता खरेदी करताना, तुम्ही विकसकाकडून मूळ पेमेंट पावत्या गोळा केल्या पाहिजेत. जर ती पुनर्विक्रीची मालमत्ता असेल, तर तुम्ही बँकेत जमा करण्यासाठी विक्रेत्याच्या पावत्याची प्रत मागू शकता.

प्रॉपर्टी टॅक्स रिसीप्ट 

मालमत्ता कर भरणे अनिवार्य आहे, आणि तुम्हाला तो भरावा लागेल. मागील मालकाने मालमत्ता कर भरला आहे आणि कोणतीही रक्कम बाकी नाही याची खात्री करून घेणे महत्वाचे आहे. ही पावती भारतात मालमत्ता खरेदी करण्यासाठी कायदेशीर कागदपत्रांचा पुरावा आहे.

बोजा प्रमाणपत्र

हे प्रमाणपत्र सिद्ध करते की तुमच्या खरेदी केलेल्या मालमत्तेशी कोणतीही कायदेशीर देणी किंवा तारण जोडलेले नाही. बँक आपल्या कर्ज मंजुरी प्रक्रियेचा भाग म्हणून हे पत्र तुमच्याकडून मागवते. पेपरमध्ये मालमत्तेवर कालांतराने झालेल्या सर्व व्यवहारांचे डिटेल्स  दिले असावेत. जर तुम्ही खरेदी केलेल्या मालमत्तेवर काही बोजा असेल तर तुम्हाला फॉर्म 15 भरावा लागेल. कायदेशीर थकबाकी नसल्यास, तुम्हाला फॉर्म 16 मिळेल. 

पूर्णत्वाचे प्रमाणपत्र

मालमत्ता खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर कागदपत्रांपैकी हे एक आहे, जे तुम्हाला गृहकर्ज मिळत असल्यास बँकेकडे जमा करणे आवश्यक आहे. मंजूर आराखड्यानुसार इमारत पूर्ण झाल्याचा हा पुरावा आहे.