Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Home Renovation Loan : होम रिनोव्हेशन लोन घ्यायचं आहे? मग या गोष्टी माहिती असणे आवश्यक

Home Renovation Loan

Image Source : www.housing.com

घराला बरीच वर्ष झाली आहे? आता तुम्हाला घर पहिल्यासारखं टकाटक करायचे आहे? म्हणजे, त्याची दुरूस्ती करायची आहे. मात्र, तुम्हाला पैशांची कमतरता असल्यास टेन्शन घ्यायचे काम नाही. कारण, बऱ्याच बॅंका तुम्हाला घराच्या नूतनीकरणासाठी आणि दुरूस्तीसाठी लोन देतात. त्यालाच आपण होम रिनोव्हेशन लोन म्हणतो. ते घ्यायच्याआधी तुम्हाला काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे.

Home Renovation Loan : घर घेऊन बरीच वर्ष झाली असल्यास त्यात काही दुरूस्ती करणे गरजेचे असते. त्यामुळे तुमचा पैशांचा बजेट कमी असेल तर बॅंक तुम्हाला घराचे रिनोव्हेशन करण्यासाठी होम रिनोव्हेशन लोन देते. विशेष म्हणजे  हे लोन घराची दुरुस्ती, रिनोव्हेटिंगचा खर्च कव्हर करण्यासाठी डिझाईन केलेली असतात. तुमची पात्रता आणि प्राॅपर्टीनुसार तुमच्या लोनची रक्कम कमी जास्त होऊ शकते. त्यामुळे लोन घेण्याआधी काही गोष्टी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

होम इम्प्रुव्हमेंट लोन

तुम्ही या लोनसाठी फक्त घराच्या दुरुस्तीसाठी आणि घराला रिनोव्हेट करण्यासाठी अप्लाय करु शकता. होम लोनच्या तुलनेत याचा अवधी कमी आणि लोनची रक्कमही कमीच असते. जर तुमच्यावर आधीच होम लोन असेल तर तुम्ही टॉप-अप लोनचा पर्याय निवडू शकता. यामुळे तुम्ही सध्या तुमच्यावर असलेल्या लोनशिवाय आणखी रक्कम लोन म्हणून घेऊ शकता. 

बॅंकबाझारचे सीईओ अधिल शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार, होम रिनोव्हेशन लोनसाठी अप्लाय करण्यापूर्वी, तुमच्या रिनोव्हेशनच्या गरजा आणि बजेटचे काळजीपूर्वक मूल्यांकन करा. जेणेकरून, तुम्ही घेतलेले लोन तुम्हाला सहज फेडता येईल. तसेच, लोनच्या करारातील अटी व शर्ती काळजीपूर्वक पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे होम रिनोव्हेशन लोन घेण्याआधी तुमच्याजवळ बजेट तयार असायला पाहिजे.

पात्रता निकष काय आहे?

होम रिनोव्हेशन लोनसाठी पात्रता पाहायला गेल्यास ती लेंडर्सनुसार बदलू शकते. मात्र, प्रामुख्याने तुमची कमाई, क्रेडिट स्कोअर, आणि प्राॅपर्टीचे मूल्य या घटकांचा विचार केला जातो. तसेच, तुम्ही जी वास्तू रिनोव्हेट करणार आहात, त्याचा पुरावा द्यावा लागू शकतो. म्हणजे तुमच्या रिनोव्हेशनला किती खर्च येणार आहे याचे इस्टिमेट एखाद्या काॅन्ट्रॅक्टर किंवा इंजिनियरकडून घ्यावे लागणार आहे.

किती मिळते लोन?

तुमच्या घराच्या रिनोव्हेशनला जेवढी रक्कम लागणार आहे. तेवढीच रक्कम काढणे गरजेचे आहे. याशिवाय तुमची कमाई आणि प्राॅपर्टीचा विचार केल्यास तुम्हाला जास्त रक्कमही मिळू शकते. त्यामुळे तुम्हाला फेडताना अडचण जाणार नाही, तसेच लोन सहज फेडता येईल अशीच रक्कम घ्या. तुम्ही लोन घेणार असलेली रक्कम आणि पात्रता पाहूनच लेंडर्स तुम्हाला लोन देतात. म्हणजे, तुमच्या प्राॅपर्टीची सध्याची मार्केट व्हॅल्यू पाहून त्यानुसार तुम्हाला लोन देण्यात येते.

व्याजदर करा चेक

तुम्ही होन रिनोव्हेशन लोन घेत असल्यामुळे ते फिक्स किंवा फ्लोटिंग असू शकते. तसेच, लेंडर्सनुसार ते वेगवेगळे देखील असू शकते. त्यामुळे लोन घ्यायच्याआधी लेंडर्सच्या दरांची तुलना केल्यास तुमचा फायदा होऊ शकतो.

परतफेडीचा अवधी किती?

होम रिनोव्हेशनचा अवधी काही महिने ते काही वर्षांपर्यंत असतो. त्यामुळे तुम्हाला फेडताना अडचण येणार नाही. तसेच, कोणताही ताण पडणार नाही असाच अवधी निवडा. जे तुमची परतफेड सोपी करु शकते.

महत्वाचे पेपर्स ठेवा सोबत

तुम्हाला सहज आणि विना टेन्शन लोन प्रोसेस पूर्ण करायची असल्यास महत्वाचे पेपर्स लेंडर्सला द्यावे लागणार आहेत. तसेच, त्याची यादी तुम्ही लेंडर्सकडूनही घेऊ शकता. यामध्ये मुख्यता ओळखपत्र, घराचा पत्ता, कमाईचा आणि प्राॅपर्टीचा पुरावा या पेपर्सची गरज लागू शकते. तसेच, रिनोव्हेट करणाऱ्या घराचे पेपर्सही द्यावे लागू शकतात.

कधी मिळेल लोन?

एकदा तुम्ही तुमच्या लोनची फाईल बॅंकेत जमा केल्यावर त्याचे व्हेरिफिकेशन केले जाते. त्यानंतर बॅंक तुम्हाला लोनची रक्कम देते. काही प्रकरणामध्ये लेंडर्स लोन घेणाऱ्याला पैसे न देता थेट काॅन्ट्रॅक्टरला देतात.

टॅक्स बेनिफिट्सचा मिळतो लाभ

तुम्ही होम रिनोव्हेशन लोन घेत असल्यास तुम्ही आयकर कायद्याच्या सेक्शन 24(b) अंतर्गत टॅक्स बेनिफिट्ससाठी पात्र ठरु शकता. मात्र, त्याचा लाभ घेण्याआधी त्याच्या काही अटी असल्यास त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागू शकतात. त्यामुळे टॅक्स बेनिफिट्सचा लाभ घेण्याआधी टॅक्स सूचना समजून घेणे आवश्यक आहे.

तुम्ही देखील घर रिनोव्हेट करायचा प्लॅन करत असल्यास या गोष्टी तुम्हाला नक्कीच फायद्याच्या ठरणार आहेत. त्यामुळे होम रिनोव्हेशन लोन घेण्यआधी या गोष्टी एकदा नजरे खालून घालणे आवश्यक आहे.