Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Digital Loan: डिजिटल लोनसाठी अर्ज करायचा आहे? पात्रता आणि व्याजदर जाणून घ्या

Who Get Digital Loan

Digital Loan: डिजिटल लोन प्रक्रियेमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर होत असल्याने त्याला डिजिटल लोन म्हटले जाते. पण प्रत्यक्षात बँकेतून लोन देताना जे नियम आणि निकष लावले जातात. त्या नियमा आणि निकषाव्यतिरिक्त डिजिटल लोनसाठी काय पात्रता लागते, हे आपण जाणून घेणार आहेत.

Digital Loan: बँकेच्या नियमानुसार जो कोण पात्र ठरतो. त्या व्यक्तीला बँक लोन देते. अर्थात बँकेचे नियम म्हणजे बँकेने काही निकष ठरवले आहेत. त्या निकषांची पूर्तता करणाऱ्या व्यक्तीला बँक लोन देते. त्याच निकषांच्या आधारे ज्या व्यक्तीला बँकेद्वारे नियमित पर्सनल लोन दिले जाते. ती व्यक्ती ऑनलाईन म्हणजेच डिजिटल लोनसाठी सुद्धा पात्र ठरते.

सध्या अनेक बँकांची स्वत:ची अ‍ॅप आहेत. या अ‍ॅपच्या माध्यमातून बँका ग्राहकांना कर्ज देत आहेत. त्यामुळे एखादी बँक ग्राहकाला त्यांच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून किंवा अ‍ॅपद्वारे पर्सनल लोन (Personal Loan) देत असेल तर त्याला डिजिटल लोन म्हटले जाते. त्यालाच आपण ऑनलाईन पर्सनल लोन देखील म्हणून शकतो. या प्रक्रियेत कर्ज मान्य करण्याची प्रक्रिया जलद होते. यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर केला जात असल्याने ही प्रक्रिया लवकर होते आणि ग्राहकाला लगेच कर्ज मिळते.  

डिजिटल लोनसाठी कोण पात्र आहे?

डिजिटल लोन प्रक्रियेमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर होत असल्याने त्याला डिजिटल लोन म्हटले जाते. पण प्रत्यक्षात बँकेतून लोन देताना जे नियम आणि निकष लावले जातात. तेच नियम आणि निकष डिजिटल लोन देताना पाहिले जातात. त्यामुळे ज्याला बँकेतून लोन मिळू शकते. तो डिजिटल लोनसाठी पात्र आहे.

पण तरीही डिजिटल लोनसाठी पात्रता जाणून घ्यायची असेल तर बहुतांश बँका या कर्ज देताना अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर चेक करतात. जर त्याचा क्रेडिट स्कोअर उपलब्ध नसेल तर वेगवेगळ्या प्रकारची माहिती गोळा करून तो कर्ज घेण्यासाठी पात्र आहे का? हे तपासले जाते. यामध्ये त्या व्यक्तीचे वय, त्याच्या कामाचे स्वरूप म्हणजे तो कुठे काम करतो. त्यातून त्याला पैसे किती आणि नियमित मिळतात का? हे पाहिले जाते.

डिजिटल कागदपत्रांची उपलब्धता

कर्जासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे उपलब्ध असतील तर कर्जाची प्रोसेस लवकर होऊ शकते. डिजिटल लोनमध्ये कागदपत्रांची तपासणी ऑनलाईन पद्धतीने होते असल्याने ही प्रक्रिया लवकर पूर्ण होते. परिणामी कागदपत्रे व्यवस्थित असतील तर लोन लगेच मंजूर होते आणि नियमांची पूर्तता होत नसेल तर लगेच लोन नाकारले जाते.

एकूणच डिजिटल प्रोसेसमध्ये सर्व प्रक्रिया जलद होतात. तसेच यामध्ये एक सिस्टिम कार्यरत असते. त्या सिस्टिमला धरून सर्व गोष्टींची पूर्तता केली की कोणतेही अडथळे येत नाहीत. त्यामुळे काहीवेळेस आपल्याकडे सर्व कागदपत्रे असतात. पण त्या सिस्टिमला ज्या फॉरमॅटमध्ये हवी असतात. त्याची माहिती आपल्याला नसल्यामुळे काहीवेळेस कर्ज नाकारले जाऊ शकते.

डिजिटल लोनसाठी पारंपरिक कर्ज प्रक्रियेप्रमाणे खालील कागदपत्रे लागतात.

ओळखपत्र (Identity Proof)

कर्जासाठी अर्ज करताना कर्ज देणाऱ्या बँकेला आपली योग्य ओळख पटवून देणारे ओळखपत्र सादर करणे आवश्यक असते. तसेच हे ओळखपत्र सरकारमान्य असणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ पॅनकार्ड, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन इत्यादी.

पत्ता (Address Proof)

ओळखपत्रासोबत अर्जदाराचा सध्याचा राहण्याचा आणि कायमचा पत्ता देणे आवश्यक असते. यासाठी योग्य पुरावा देणे गरजेचे आहे. वास्तव्याचा किंवा राहण्याचा पुरावा म्हणून अर्जदार आधारकार्ड. पासपोर्स, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन सादर करू शकतो.

उत्पन्नाचा पुरावा (Income Proof)

कोणतेही कर्ज घेताना उत्पन्नाचा पुरावा हा सर्वांत महत्त्वाचा असतो. यासाठी अर्जदार पगाराची स्लिप, बँकेचे स्टेटमेंट, इन्कम टॅक्स रिटर्न भरल्याची रिसिप्ट, किंवा इतर डॉक्युमेंट दाखवू शकतो. कर्ज देणाऱ्या बँकेला अर्जदाराची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी हा पुरावा खूप महत्त्वाचा असतो.

डिजिटल सिग्नेचर (Signature Proof)

डिजिटल लोन प्रोसेसमध्ये डिजिटल सिग्नेचर हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये अर्जदाराची डिजिटल सही द्यावे लागते. ज्याद्वारे बँक आणि अर्जदारामध्ये कर्जासंबंधित करार केला जातो.

अशाप्रकारे डिजिटल पद्धतीने कोणीही डिजिटल लोन घेऊ शकतो. पण डिजिटल लोन घेताना कर्ज देणारी बँक किंवा संस्था किंवा NBFC ही अधिकृत आहे का? हे तपासणे गरजेचे आहे. डिजिटल पद्धतीने लोन जेवढ्या जलद प्रक्रियेने होते. पण यातून लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक देखील होते.