Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Online Loans: फोन अ‍ॅपवरून ऑनलाईन कर्ज घेण्याआधी 'या' गोष्टी जाणून घ्या, फायद्यात राहाल!

Online Loans: फोन अ‍ॅपवरून ऑनलाईन कर्ज घेण्याआधी 'या' गोष्टी जाणून घ्या, फायद्यात राहाल!

Image Source : www.terrislittlehaven.com

Online Loans: मार्केटमध्ये UPI पेमेंटमुळे खूप बदल झाले आहेत. त्यामुळे जो-तो डिजिटल पेमेंटकडे वळलेला असताना, त्यात आता लोनने सुद्धा एंट्री घेतली आहे. त्यामुळे बॅंकेत किंवा वित्तीय संस्थेत न जाता तुम्ही घरबसल्या फोनवरून लोन मिळवू शकता. पण, त्यात काय रिस्क आहे, कशी काळजी घ्यायची? हे आपण जाणून घेणार आहोत.

पैशांची गरज पडल्यास, लोक आता कोणाला मदत न मागता. थेट फोनवरून लोन घ्यायला प्राधान्य देत आहे. कारण, काहीच मिनिटांत फोनवरून लोन उपलब्ध होत आहे. यासाठी बॅंका, फिनटेक आणि रेग्युलेटर्स यांनी महत्वाचा पाया भरला आहे. मात्र, जशी या लोनच्या लोकप्रियतेत वाढ झाली, तशीच रिस्कमध्येही वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. बऱ्याचदा त्याचे कारण, अनरेग्युलेटेड लेंडर असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे लोन घेताना काय काळजी घेणे आवश्यक आहे? हे आपण पाहूया.

रेग्युलेटेड लेंडरकडून घ्या लोन

लोन घेताना रेग्युलेटेड एंटिटीकडून (RE) घेणे कधीही चांगले. कारण त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नियम पाळण्यास बांधील आहेत. मात्र, बऱ्याच लोन अ‍ॅप्सकडे परवाना नसतो, तरीही ते लोन देतात आणि जादा शुल्क आकारतात. तसेच, त्यांची वसुली करण्याची पद्धतही अनैतिक आहे आणि ग्राहकांच्या डेटाचा चुकीचा वापर ही ते करू शकतात. त्यामुळे लोन घेताना रेग्युलेटेड एंटिटी किंवा नाॅन-बॅंकिंग फायनान्शिअल कंपनीकडून (NBFC) घेण्याला प्राधान्य द्या. नाहीतर तुम्हाला आर्थिक भूर्दंड बसू शकतो.

तुमची पात्रता तपासा

तुम्हाला लोन घ्यायचे असल्यास, तुमचे उत्पन्न आणि क्रेडिट स्कोअर महत्वाचा आहे. तुमचे उत्पन्न स्थिर आणि चांगला स्कोअर असल्यास, बॅंकेकडून लोन घ्या. मात्र, पात्रता कमी असल्यास, तुम्ही NBFC कडून लोन घेऊ शकता. जर तुमचा क्रेडिट स्कोअर खूप चांगला असल्यास, तुम्हाला कमी व्याजदर द्यावा लागेल. तसेच, तुमच्या लोन की फॅक्ट स्टेटमेंटमध्ये (Key Fact Statement) सर्व चार्जेसची माहिती असणे आवश्यक आहे. त्यामध्ये लोन प्रोसेसिंग, विलंब शुल्क आणि प्रीपेमेंट्सचाही समावेश असू शकतो. ही सर्व माहिती तुम्ही नजरे खालून घातल्यास, तुम्हाला व्याजदर आणि इतरही गोष्टींची माहिती मिळू शकते.

डेटा सुरक्षितता आहे गरजेची

आरबीआयनुसार RE ला ग्राहकांचा डेटा सुरक्षित ठेवणं बंधनकारक आहे. लेंडर्स लोन देताना, ग्राहकांच्या संमतीनेच पेपर्स कलेक्ट करतात. त्यामुळे त्याचा चुकीचा वापर होण्याची शक्यता नाहीच्या बरोबर आहे. तसेच, तिसऱ्या पार्टीला (लोन सेवा देणारे किंवा वसूली एजन्सी) डेटा दिला गेल्यास, तो नियमाला अनुसरूनच असतो. तुम्ही रेग्युलेटेड लेंडरकडून न घेता इतर अनरेगेयुलेटेडकडून घेत असल्यास, तुमच्या डेटाचा चुकीचा वापर होऊ शकतो. त्यामुळे जे लेंडर नियमांना बांधील आहेत, त्यांच्याचकडून लोन घ्या.

चार्जेसची करा तुलना

ऑनलाईन लोन घेताना रिसर्च करणे आवश्यक आहे. कारण, असे केल्यास, तुम्हाला व्याजदर, चार्जेस, रिपेमेंट अटी व शर्ती जाणून घेता येईल. त्यामुळे इतर ठिकाणी देण्यात येणाऱ्या चार्जेसपेक्षा कमी चार्सेस जिथे वाटतील, तेथूनच तुम्ही लोन घ्या. जर लेंडर्स तुम्हाला अनोळखी वाटत असल्यास, त्याची ऑनलाईन माहिती काढा.  

स्कोअरवर लक्ष ठेवा

रेग्युलेटेड लेंडर्स तुमच्या लोनचा रिपोर्ट एक्सपेरियन (Experian) आणि CIBIL सारख्या क्रेडिट ब्युरोकडे जमा करतात. त्यामुळे लोन घेतलेले असताना, मासिक स्कोअर चेक करत राहा. जर तुम्हाला तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये काही चुका आढळल्यास, लगेच लेंडर्सला त्याची माहिती द्या.