Vishnu Prakash R Punglia IPO: विष्णु प्रकाश आर पुंगलिया कंपनीच्या आयपीओची तारीख फिक्स झाली असून, 24 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे. कंपनीने या आयपीओच्या माध्यमातून 309 कोटी रुपये जमा करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
विष्णु प्रकाश आर पुंगलिया कंपनी पूर्णपणे नवीन इश्यू विक्रीसाठी आणत आहे. कंपनीने 3 कोटी 12 शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी यामध्ये 35 टक्के, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB) 50 टक्के आणि हाय नेटवर्थ गुंतवणूकदारांसाठी (HNI) 15 टक्के आरक्षण असणार आहे.
विष्णू प्रकाश आर पुंगलिया कंपनी
विष्णू प्रकाश आर पुंगलिया कंपनीचे मुख्यालय राजस्थानमध्ये असून ही कंपनी इंजिनिअरिंग, प्रोक्युरमेंट आणि कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये कार्यरत आहे. कंपनीने केंद्र सरकारसह आणि विविध 9 राज्य सरकारबरोबर, स्थानिक पातळीवरील कंपन्यांसाठीही काम केले आहे. कंपनी 4 वेगवेगळ्या प्रकारच्या सेक्टरमध्ये प्रामुख्याने कार्यरत आहे. यामध्ये वॉटर सप्लाय प्रोजेक्ट, रेल्वे प्रोजेक्ट, रोड प्रोजेक्ट आणि इरिगेशन नेटवर्क प्रोजेक्टचा समावेश आहे.
आयपीओ प्राईस ब्रॅण्ड
कंपनीने आयपीओसाठी प्रति शेअर्सची किंमत 94-99 रुपये अशी निश्चित केली आहे. याच्या एका लॉटमध्ये 150 शेअर्स असणार आहेत. कंपनीने पूर्णपणे नवीन शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्याने आयपीओच्या माध्यमातून जमा होणारा सर्व निधी हा कंपनीच्या खात्यात जमा होणार आहे. तसेच कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सुमारे 3 लाख शेअर राखीव ठेवले आहेत. तसेच हे शेअर्स कर्मचाऱ्यांना 9 रुपयांच्या सवलतीने मिळणार आहेत.
कंपनीचे फ्यूचर प्लॅन
आयपीओच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीतून कंपनी 62.18 कोटी रुपयांचा उपयोग मशीनरी आणि नवीन साधने विकत घेण्यासाठी करणार आहे.तर जवळपास 150 कोटी रुपये नेहमी लागणाऱ्या गोष्टींसाठी खर्च करणार आहे. कंपनीच्या ताफ्यात 400 हून अधिक साधन-सामुग्री आहे. यामध्ये मोठमोठ्या वाहनांचादेखील समावेश आहे. कंपनीने आतापर्यंत 75 हून अधिक प्रोजेक्ट पूर्ण केले आहेत. तर अजून 38 प्रोजेक्ट पाईपलाईनमध्ये आहेत.