Urban Enviro Waste Management IPO: या आठवड्यातील दोन आयपीओनंतर पुढील आठवड्यात आणखी एका आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी गुंतवणूकदारांना मिळणार आहे. Urban Enviro Waste Management या कंपनीचा 12 जून रोजी आयपीओ गुंतवणुकीसाठी ओपन होणार आहे.
अर्बन एनवायरो वेस्ट मॅनेजमेंट कंपनी या आयपीओच्या माध्यमातून 11.42 कोटी रुपये उभारणार आहे. गुंतवणूकदारांना 12 जून ते 14 जून यादरम्यान यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे. या कंपनीचे शेअर्स हे एनएसई इमर्ज प्लॅटफॉर्मवर लिस्टिंग होणार आहेत. यासाठी कंपनीने प्रति शेअरची किंमत 100 रुपये निश्चित केली आहे.
What is SME IPO?
100 कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या ज्या कंपन्या बाजारातून भांडवल उभे करण्यासाठी आयपीओ आणतात. या कंपन्यांच्या आयपीओला SME IPO असे म्हटले जाते. या कंपन्यांसाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange-NSE) आणि बीएसई (Bombay Stock Exchange-BSE)वर 2012 मध्ये दोन एक्सचेंज सुरू करण्यात आली आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर BSE SME आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर NSE EMERGE असे प्लॅटफॉर्म आहेत. या प्लॅटफॉर्मवर SME IPOचे लिस्टिंग होते.
SME IPO मध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतात. पण या कंपन्यांबद्दल अधिक माहिती उपलब्ध नसल्यामुळे याची संपूर्ण माहिती घेऊनच गुंतवणूक करणे योग्य ठरू शकते. तसेच यामध्ये योग्य माहितीच्या गुंतवणूक केली असता गुंतवणूकदारांना चांगला परतावादेखील मिळू शकतो.
Urban Enviro Waste Management कंपनी आयपीओच्या माध्यमातून 10 रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या 9,20,000 फ्रेश इक्विटी शेअर्स इश्यू करणार आहे. याची एकूण किंमत 9.2 कोटी रुपये इतकी असणार आहे. त्याचबरोबर कंपनीतील सेलिंग शेअरहोल्डर विकास शर्मा हे ऑफर फॉर सेल (Offer for Sale-OFS) अंतर्गत 2,22,400 इक्विटी शेअर्सची विक्री करणार आहे. ज्याची किंमत 2.24 कोटी रुपये आहे.
अर्बन एनवायरो कंपनी आयपीओच्या माध्यमातून कर्जाची परतफेड करण्यावर भर देणार आहे. याशिवाय कंपनीच्या बेसिक गरजा पूर्ण करण्यासाठी याचा वापर करणार आहे. अर्बन एनवायरो वेस्ट मॅनेजमेंट कंपनी ही वेस्ट मॅनेजमेंट सॉल्यूशन आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटची सुविधा पुरवते. मागील 12 वर्षांपासून कंपनी इंडस्ट्री, रिसर्च इन्स्टिट्यूट, पॉवर स्टेशन, सरकारी हॉस्पिटल आणि निवासी सोसायट्यांमध्ये सेवा पुरवते.
सध्या Urban Enviro Waste Management कंपनी महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, छत्तीगड या राज्यांमध्ये कार्यरत आहे. भविष्यात उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये काम करण्यासाठी प्रयत्नशील आहे.