नोकिया मोबाईल हा भारतात लोकप्रिय झालेला एक ब्रँड आहे. नोकिया कंपनीकडून वेळोवेळी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन बाजारात आणले जातात. त्याच बरोबर त्यांचे फिचर्सही एकदम तगडे असतात. दरम्यान, नोकिया कंपनीच्या Nokia C31 या फोन बद्दल तुम्ही ऐकले असेलच. या फोनमध्येही अनेक दमदार फिचर्स देण्यात आले आहेत. तुम्हाला हाच फोन आता Amazon वर स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तसेच या फोन खरेदीसाठी अॅमेझॉनकडून बँक ऑफर्सही देण्यात आल्या आहेत. चला तर मग नोकियाच्या या ऑफरमधील फोनबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.
Nokia C31 वर काय ऑफर आहे?
Amazon ने शनिवारी(8 जुलै) आपल्या ई कॉमर्स वेबसाईटवर Nokia C31 या 4G फोनसाठी 42% ची बंपर सूट दिली आहे. ऑफरनंतर या फोनची किंमत फक्त 6,699 रुपये ठेवण्यात आली आहे. एवढेच नाहीतर फोनच्या खरेदीवर काही बँक ऑफर्सही उपलब्ध आहेत, ज्याचा फायदा घेऊन तुम्ही ही किंमत आणखी कमी करू शकता. जर तुमच्याकडे HSBC चे कॅशबॅक क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला 250 रुपयांची सूट मिळवता येणार आहे. या फोनची अॅमेझॉनवर एमआरपी ही 11999 इतकी दर्शवण्यात आली आहे. (ऑफरमध्ये तुम्हाला हा फोन स्वस्तात खेरदी करता येणार आहे. मात्र, ही ऑफर ठराविक कालावधीसाठी मर्यादित असल्याचे अॅमेझॉनकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांनी फोन खरेदी करण्यापूर्वी ऑफरची खात्री करावी.)
Nokia C31 ची वैशिष्ट्ये
Nokia C31 मध्ये 6.74-इंचाचा HD+ (720x1,600 pixels) डिस्प्ले आहे. ज्यामध्ये वाटरड्रॉप स्टाइल नॉच आणि 2.5D ग्लास संरक्षण देण्यात आले आहे. दुसरीकडे, जर आपण प्रोसेसरबद्दल पाहिले तर, या फोनमध्ये एक ऑक्टा-कोर युनिसॉक प्रोसेसर आहे, ज्यामध्ये 3GB पर्यंत रॅम आणि 32GB ऑनबोर्ड स्टोरेज आहे. हे समर्पित मायक्रोएसडी कार्ड स्लॉटद्वारे 32GB पर्यंत वाढविले जाऊ शकते.
Nokia C31 कॅमेरा, बॅटरी
कॅमेरा वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, Nokia C31 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये ऑटोफोकससह 13-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर, 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर समाविष्ट आहे. दुसरीकडे, सेल्फी कॅमेर्याबद्दल बोलायचे झाले तर, तुमच्याकडे 5MP सेंसर आहे. Nokia C31 मध्ये 10W चार्जिंग सपोर्टसह 5050mAh बॅटरी देखील आहे. एका चार्जवर तीन दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ मिळते असा कंपनीचा दावा आहे. तसेच मोबाइलला AI face unlock आणि फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आले आहे.