UpGrad विद्यार्थी निवास सुविधा उभारण्याची योजना आखत आहे. हा भारतातील आतापर्यंतचा विद्यार्थी निवास या हेतूने घेतलेला सर्वात मोठा करार आहे. BKC जंक्शनवरील ब्रूकफील्ड ग्रुपच्या इक्विनॉक्स कॉम्प्लेक्सच्या शेजारी 200,000 चौरस फूट इतके या जागेचे क्षेत्रफळ आहे. सनटेक या व्यावसायिक टॉवरचा वापर आता विद्यार्थी निवास आणि UpGrad च्या ऑफलाइन प्रशिक्षण केंद्रासाठी केला जाईल.
रॉनी स्क्रूवाला, मयंक कुमार आणि फाल्गुन कोमपल्ली यांनी सुरू केलेली ही कंपनी 121,000 चौरस फुटांपेक्षा जास्त कार्पेट क्षेत्रासाठी 3.5 कोटी रुपये मासिक भाडे देणार आहे. UpGrad महिना रु. ३०० प्रति चौरस फूट इतके भाडे देणार आहे. या करारामध्ये प्रतिवर्ष 4% भाडे वाढवण्याचा एक नियम समाविष्ट आहे. कंपनीने 18 कोटी रुपयांची डीपॉजीट रक्कम भरली आहे.
सनटेक रियल्टीच्या अध्यक्षांनी करारानंतर दिली प्रतिक्रिया
“या कराराद्वारे दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या उच्च एडटेक कंपन्यांपैकी एकाशी संबंध जोडताना आम्हाला आनंद होत आहे,” असे सनटेक रियल्टीचे अध्यक्ष कमल खेतान यांनी सांगितले. आम्ही सनटेक कंपनी अंतर्गत आमच्या क्लायंटना सर्वोत्तम रिअल इस्टेट सोल्यूशन्स प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत. भावी पिढीच्या मुलांच्या गरजांसाठी योग्य, सुरक्षित व सर्व सुविधांनी जागा या एडटेक कंपनीला मिळणार आहे. मालमत्ता सल्लागार जेएलएल इंडियाने या करारासाठी विशेष सल्लागार म्हणून काम केले.
अंतराष्ट्रीय स्तरावर कंपनीचे काम
2015 मध्ये सुरू झालेली, UpGrad ही आशियातील सर्वात मोठ्या एकात्मिक शिक्षण, कौशल्य, कार्यबल विकास आणि प्लेसमेंट कंपन्यांपैकी एक आहे. भारतातील अनेक शहरांमध्ये 25 हून अधिक ऑफलाइन कार्यालये आहेत आणि सॅन फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन डीसी, लंडन, सिंगापूर, दुबई, व्हिएतनाम, सिडनी आणि मेलबर्न येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर कंपनी काम करते. आतापर्यंत, 100 हून अधिक देशांमध्ये ते 7 दशलक्ष विद्यार्थ्यांपर्यंत ही संस्था थेट पोहोचली आहे.
सनटेक रियल्टीच्या या व्यावसायिक टॉवरकडे जागतिक बँक समूहाचे सदस्य असलेल्या Edge-IFC कडून ग्रीन बिल्डिंग प्री-सर्टिफिकेशन आहे. जून 2023 ताबा विषयक प्रक्रिया पूर्ण होईल पर्यंत पूर्ण केले जाणार आहे आणि यानंतर UpGrad लवकरच येथून कार्य सुरू करेल
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            