Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Upcoming SME IPO: आठवड्याभरात 3 आयपीओ येणार; गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या संपूर्ण माहिती

3 SME IPO COMING IN THIS WEEK

Upcoming IPO: आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पुढील हा आठवडा खूपच महत्त्वाचा असणार आहे. कारण या आठवड्यातील 3 आयपीओ ओपन होणार आहेत. चला तर जाणून घेऊयात कोणत्या कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत.

Upcoming IPO: आयपीओ गुंतवणूकदारांना पुढील 10 दिवसांत एक नाही तर 3 कंपन्यांच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्याची संधी मिळणार आहे. 2023 या वर्षातील सर्वांत मोठा आयपीओ म्हणून मॅनकाईंड फार्मासीचे चांगले लिस्टिंग झाले. या आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला. त्यामुळे आगामी आयपीओबाबत गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

या आठवड्यातील पहिला आयपीओ मंगळवारी (दि. 16 मे) ओपन होणार आहे; तर दुसरा बुधवारी (दि. 17 मे) आणि तिसरा आयपीओ पुढील सोमवारी (दि. 22 मे) ओपन होणार आहे. पण यातील Krishca Strapping, Remus Pharma आणि Crayons Advertising चे इश्यू हे एनएसई किंवा बीएसईवर ओपन होणार नाहीत. त्याचे लिस्टिंग एनएसई-एसएमई (NSE-SME) होणार आहे. एसएमई-आयपीओ (SME IPO) प्रमाणे नियमित आयपीओसारखाच प्रकार आहे.

या 3 इश्यूपैकी दोन कंपन्यांचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 65 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहेत. शेअर मार्केटमधील तज्ज्ञांच्या मते, आयपीओमध्ये गुंतवणूक करताना त्या कंपनीच्या शेअर्सला ग्रे मार्केटमध्ये कसा रिस्पॉन्स मिळत आहे. तसेच कंपनीची आर्थिक स्थिती आणि कंपनीचे भविष्यातील प्लॅन काय आहेत. हे तपासूनच यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे.

Krischca Strapping Solutions

Krishca Strapping
Image Source: www.krishcastrapping.com

स्ट्रेपिंग टूल्स आणि स्ट्रेपिंग सील बनवून त्याची थेट विक्री करणारी कंपनी क्रिष्का स्ट्रॅपिंग सोल्युशन कंपनीचा 18 कोटी रुपयांचा आयपीओ मंगळवारी (दि. 16 मे) ओपन होत आहे. कंपनीने शेअर्सची किंमत 51-54 रुपये या रेंजमध्ये ठेवली असून यासाठी 2000 शेअर्सचा एक लॉट असणार आहे. गुंतवणूकदार 19 मे पर्यंत यामध्ये गुंतवणूक करू शकतात. 
क्रिष्का कंपनी या आयपोओच्या माध्यमातून एकूण 33.20 लाख नवीन शेअर्स इश्यू करणार आहे. शेअर्सचे अलॉटमेंट 24 मे तर त्याचे लिस्टिंग 29 मे ला होणार आहे. ग्रे मार्केटमध्ये क्रिष्का 89 रुपयांवर ट्रेंड करत आहे.

Remus Pharmaceuticals Ltd

Remus Pharma

रिमस फार्मास्युटिकल्स ही कंपनी औषधांचे मार्केटिंग आणि वितरण करते. या कंपनीने एकूण 48 कोटी रुपयांचा आयपीओ आणला आहे. तो 17 ते 19 मे या दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असणार  आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून 3.88 लाख नवीन शेअर्स इश्यू करणार आहे. यासाठी कंपनीने 1150 - 1229 रुपये प्राईस बॅण्ड निश्चित केला आहे. याचा लॉट साईज 100 शेअर्सचा असणार आहे.

रिमस फार्मास्युटिकल्स कंपनीच्या शेअर्सचे अलॉटमेंट 24 मे तर लिस्टिंग 29 मे रोजी होणार आहे. ग्रे मार्केटमध्ये रिमसच्या शेअर्सची किंमत 1339 रुपयांवर ट्रेंड करत आहे. म्हणजे प्राईस बॅण्डमधील अप्पर किमतीपेक्षा 9 टक्क्यांनी जास्त आहे.

Crayons Advertising IPO

Crayons Advertising
Image Source:  www.sharemarketexpress.com

क्रेयान्स अॉव्हरटायझिंग कंपनी इंटीग्रेटेड मार्केटिंग आणि कम्युनिकेशन या फिल्डमध्ये काम करते. या कंपनीचा आयपीओ 22 ते 25 मे यादरम्यान खुला होणार आहे. कंपनी आपीओच्या माध्यमातून 64.30 लाख नवीन इक्विटी शेअर्स इश्यू करणार आहे. याच्या शेअर्सचे अलॉटमेंट 30 मे रोजी होणार असून त्याचे लिस्टिंग 2 जून रोजी होणार आहे. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचा शेअर अजून दिसत नाही.