Elon Musk: ट्विटर हे सोशल मिडीया प्लॅटफाॅर्म सातत्याने चर्चेत येत आहे. हे प्लॅटफाॅर्म आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी बिझनेसमॅन व सेलेब्रिटी मोठया प्रमाणात वापरतात. आता तर एलाॅन मस्क(Elon Musk) आल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणासाठी ट्विटर लक्ष वेधून घेत आहे. या ट्विटरचे नवीन नियम 1 फ्रेबुवारीपासून लागू होणार आहे. या नियमांअंतर्गत काय सुविधा मिळणार आहेत, हे पाहुयात.
अकाउंटवर बंदी (Account Ban)
ट्विटरवर 1 फ्रेबुवारीपासून काही नवीन नियम लागू होणार आहे. यामध्ये जर तुम्ही तुमच्या अकाउंटवरून गंभीर विषयाला धरून काही अपव्यय लिहिले गेले, तर तत्काळ तुमचे अकाउंट निलंबित केली जाईल. गंभीर विषयामध्ये बेकायदेशीर कंटेंट किंवा काही व्हिडोओ, एखादया व्यक्तीला धमकी देणे किंवा त्याला हानी पोहोचविणे, त्रास देणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.
एलॉन मस्कची घोषणा (Elon Musk's Announcement)
एलॉन मास्क सातत्याने ट्विटरवर नवनवीन बदल घडवून आणत आहे. जसे की, भविष्यात खाती निलंबीत केली जाणार नाही, तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा रिच कमी केला जाईल. अकाउंटचा उपयोग करण्यापूर्वी कंपनी त्या व्यक्तीस ट्विट काढण्यासदेखील सांगू शकते. अगदी सुरूवातीपासूनच एलॉन मास्क यांचा अकाउंट निलंबित करण्यास विरोध होता. जेव्हापासून ट्विटर हे मस्क यांच्याकडे आले आहे, तेव्हापासून अनेक निलंबित खाती पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावतचादेखील समावेश आहे. या अभिनेत्रीचे अकाउंट दोन वर्षोपूर्वीच बंद करण्यात आले होते.
टिक्सविषयी माहिती (Information about Ticks)
ट्विटरवरचे ब्लू टिक्स हे अकाउंट व्हेरिफिकेशनचे संकेत असते. ब्लू टिक्ससाठी सर्वच सेलेब्रिटी व बिझनेसमॅन प्रयत्नशील असतात. पण यामध्येदेखील आता तीन प्रकारचे व्हेरिफिकेशन टिक्स मिळणार आहे. जसे की, सरकारी संस्था, अधिकारी आणि मंत्री यांना ग्रे रंगाचे टिक्स, कंपन्यांना पिवळया रंगाचे टिक्स तर वैयक्तिक युजर्सला ब्लू टिक्स मिळणार आहेत. तसेच यासाठी युजर्सला पैसादेखील खर्च करावा लागणार आहे.