भारतात प्रामुख्याने तीन ठिकाणी सोन्याच्या खाणी आहेत. एक कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील कोलार गोल्डफिल्ड. दुसरी कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील हट गोल्डफिल्ड आणि आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील रामगिरी गोल्डफिल्ड.
कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील कोलार गोल्डफिल्ड (KGF)
कोलार गोल्डफिल्ड (KGF) हे कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात आहे. कोलारही कर्नाटकची राजधानी आहे. कोलार गोल्डफिल्ड चे हेडक्वार्टर रॉबर्टसनपेट येथे आहे. रॉबर्टसनपेट हे जिल्हा मुख्यालयापासून 30 किमी अंतरावर वसलेला एक तालुका आहे. आणि याच ठिकाणी सोन्याची खाण आहे. कोलार हे कोलार हे बंगळुरूपासून 100 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. कोलार गोल्ड फील्ड ही जगातील दुसरी सर्वात खोल सोन्याची खाण आहे. या खानीचा एक भला मोठा इतिहास आहे. 2001 मध्ये केजीएफ बंद झाले. 2016 मध्ये मोदी सरकारने KGF मध्ये पुन्हा काम सुरू करण्याचे संकेत दिले होते. 2016 मध्ये केजीएफसाठी लिलाव प्रक्रिया सुरू करण्यासाठी निविदा मागवण्यात आली होती. मात्र अद्यापही येथे कुठलेही काम सुरु झालेले नाही. सोन्याच्या वापरात चीननंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोलारमध्ये आजही भरपूर सोने शिल्लक आहे. जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या मते, 2021 मध्ये भारताने 1067.72 टन सोने आयात केले. सोन्याच्या आयातीमुळे भारताच्या खिशावर बोजा पडतो. अशा परिस्थितीत कोलार खाण पुन्हा सुरू झाल्यास काही प्रमाणात भार हलका होऊ शकतो.
कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील हट गोल्डफिल्ड (HGML)
हट गोल्डफिल्ड (HGML) ही कर्नाटकातील सोन्याचे उत्पादन करणारी कंपनी आहे. कोलार गोल्ड फील्ड्स कंपनीने 2001 मध्ये सोन्याचे उत्खनन बंद केल्यावर. ही भारतातील दोन कंपन्यांपैकी एक कंपनी आहे, जी सोन्याच्या धातूचे उत्खनन आणि प्रक्रिया करून सोन्याचे उत्पादन करते. अद्यापही या खाणीत सुमारे ३१.०२ दशलक्ष टन सोन्याच्या धातूचा साठा असल्याचा अंदाज आहे.
आंध्र प्रदेश अनंतपूर जिल्ह्यातील रामगिरी गोल्डफिल्ड (RGF)
रामगिरी आरपी ब्लॉकमध्ये सुप्रसिद्ध 13 किमी लांबीचा रामगिरी गोल्ड फील्ड (RGF) समाविष्ट आहे. या 13 किमी च्या पट्टयात अनेक समृध्द खाणी होत्या. 2004 पर्यंत या खाणीमधून अनेक टन सोन्याचे उत्पन्न घेतल्या गेले.