शेअर मार्केटमध्ये आज सकाळपासून तेजी आणि मंदीचा खेळ सुरु आहे. सकाळच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 100 अंकांची वाढ झाली होती. यात बँका, एफएमसीजी, पॉवर या क्षेत्रात खरेदीचा ओघ दिसून आला. मात्र सेन्सेक्स आणि निफ्टीती तेजी फार काळ टिकली नाही. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स दुपारी 2.40 मिनिटांनी 28 अंकांनी घसरला असून तो 60663.45 अंकांवर ट्रेड करत आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 16.70 अंकांच्या घसरणीसह 17831.05 अंकांवर ट्रेड करत आहे.
rediffmoney.com या वेबसाईटनुसार दुपारच्या सत्रात शेअर बाजारात एव्हरेस्ट कांटो सिलिंड या कंपनीचा शेअर सर्वाधिक 13.40% वधारला आहे. डिशमन कार्बोगेन 11.58%, ईकेआय एनर्जी 10%, शिल्पा मेडिकेअर 9.84%, झेंसर टेक्नॉलॉजी 6.86%, लॉयड्स स्टील 6.05%, चॅलेट हॉटेल्स 5.74%, किर्लोस्कर ऑइल इंजिन 5.61%, अदानी पॉवर 5% आणि पीजी इलेक्ट्रॉनिक्स 4.94% हे ए ग्रुपमधील शेअर तेजीत आहे.
दुसऱ्या बाजुला आज बँक ऑफ इंडिया 5.95%, किरी इंडस्ट्रीज 5.84%, डाटा पॅटर्न्स 5.25%, टाटा टेलिसर्व्हिसेस 5.09%, अदानी टोटल गॅस 5%, अदानी ग्रीन एनर्जी 5%, डीबी रियल्टी 5% अदानी ट्रान्समिशन 4.99%, आदित्य बिर्ला 4.81%, मिंडा कॉर्पोरेशन 4.32% या ए ग्रुपमधील शेअर्समध्ये घसरण झाली आहे.
आज गुंतवणूकदारांनी ऊर्जा निर्मिती क्षेत्रात खरेदीवर भर दिला. आजच्या सत्रात अदानी पॉवर, एनटीपीसी, टाटा पॉवर, सीईएससी, जेएसडब्ल्यू एनर्जी, पॉवरग्रीड कॉर्पोरेशन, एनएचपीसी या शेअरमध्ये आज वाढ झाली आहे. आजच्या सत्रात अदानी समूहातील तीन शेअर्सनी 52 आठवड्यातील नीचांकी पातळी गाठली आहे. यात अदानी ट्रान्समिशन, अदानी गॅस आणि अदानी ग्रीन एनर्जी या शेअरने मागील वर्षभरातील नीचांकी स्तर गाठला आहे. त्याशिवाय अदानी पोर्ट्स अॅंड एसईझेड हा शेअर 1.73% ने वधारला. कंपनीने 10 बिलियन डॉलर्सचे कर्ज मुदतीपूर्वीच फेडल्याचा दावा केला आहे. त्यानंतर अदानी पोर्ट्सच्या शेअरमध्ये आज व्हॉल्यूम वाढला होता.
आज पॉवर इंडेक्समध्ये 0.86% वाढ झाली. सीपीएसई, बीएसई सीजी, इन्फ्रा, एफएमसीजी या इंडेक्समध्ये वाढ झाली आहे. बीएसई आयटी, बीएसई टेक, रियल्टी, एनर्जी आणि टेलिकॉम या शेअर निर्देशांकात घसरण झाली. निफ्टी बँकिंग इंडेक्समध्ये 29.65 अंकांची घसरण झाली असून तो 40672.05 अंकांवर आहे. निफ्टी 500 निर्देशांकात 15.65 अंकांची घसरण झाली आहे.