Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Think Tank Survey: देशातील तीन चतुर्थांश लोक गुंतवणुकीसाठी देतात बँकांना पसंती; पोस्टात करतात 'इतके' लोक गुंतवणूक

Think Tank Survey

Think Tank Survey: पीपल रिसर्च ऑन इंडियाज कंझ्यूमर इकॉनॉमी (PRICE) नामक थिंक टॅंक कंपनीने भारतातील लोकांच्या गुंतवणुकी संदर्भात एक सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणानुसार देशातील तीन चतुर्थांश लोक गुंतवणुकीसाठी बँकांना पसंती देतात. तर पोस्टात गुंतवणूक करण्याचे प्रमाण फारच कमी आहे. याशिवाय घेतलेले कर्ज कोणत्या गोष्टीसाठी खर्च केले जाते, याबाबत देखील माहिती देण्यात आली आहे.

पीपल रिसर्च ऑन इंडियाज कंझ्यूमर इकॉनॉमी (People Research on India's Consumer Economy) नामक थिंक टॅंक (Think Tank) कंपनीने भारतातील लोकांच्या गुंतवणुकी संदर्भात एक सर्वेक्षण केले आहे. हे सर्वेक्षण 25 राज्यात आणि 40,000 कुटुंबांसोबत मिळून करण्यात आले आहे. या सर्व्हेमध्ये शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांमधील लोकांचा समावेश केला आहे. कंपनीच्या या सर्व्हेतील माहितीनुसार देशातील तीन चतुर्थांश म्हणजेच 69 टक्के लोक गुंतवणुकीसाठी बँकेची निवड करतात. तसेच 4 टक्के लोक पोस्टातील गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. तर 14 टक्के लोक विमा पॉलिसीमध्ये बचत करण्याच्या उद्देशाने गुंतवणूक करत आहेत.

भारतीय लोक बचत का करतात?

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी बहुसंख्य लोक बचत करत असल्याचे सर्व्हेमध्ये आढळून आले आहे. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी देखील बचत केली जाते. PRICE च्या माहितीनुसार 2020-21 मध्ये 1.09 लाख ते 6.46 लाख उत्पन्न असणाऱ्या लोकांना मध्यम वर्गाच्या श्रेणीमध्ये गृहीत धरण्यात आले आहे. तसेच 5 लाख ते 30 लाख रुपये उत्पन्न असणारे लोक उच्च मध्यम वर्गीय गटामध्ये गणले गेले आहेत. तर 30 लाखाहून अधिक उत्पन्न असणारे लोक श्रीमंत या श्रेणीत गणण्यात आले आहेत. 2 कोटीहून अधिक उत्पन्न असणारे लोक सर्वाधिक श्रीमंत गटात मोडले जातात. तर वार्षिक 1.25 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणारे लोक गरीब या श्रेणीत पकडण्यात आले आहेत.

इतक्या लोकांकडे कर्ज नाही

सर्वेक्षणात सामील झालेल्या तीन चतुर्थांश कुटुंबांनी कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले नसल्याचे सांगितले आहे. सर्वात जास्त कर्जमुक्त कुटुंब ही सर्वाधिक उत्पन्न गटामध्ये येतात. महत्त्वाचं म्हणजे सर्वात कमी कर्जमुक्त  कुटुंबांची संख्या कमी उत्पन्न गटामध्ये आहे.

मालमत्तेच्या खरेदीसाठी 'या' उत्पन्न गटातील लोक कर्ज घेतात

सर्वेक्षणानुसार सुमारे 38 टक्के लोक शेती आणि जनावरांच्या खरेदीसाठी वित्तीय संस्थांकडून किंवा बँकांकडून कर्ज घेतात. श्रीमंतांनी वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जांपैकी सुमारे 40% कर्ज मालमत्ता खरेदीसाठी घेण्यात आलेले असतात, तर मध्यमवर्गीय कुटुंबांपैकी फक्त 11% कुटुंबे मालमत्तांसाठी बँका किंवा इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतात.

गरीब लोक उपचारासाठी सर्वाधिक खर्च करतात

जवळपास 10% भारतीय कुटुंब जमीन खरेदी करण्यासाठी जवळच्या व्यक्तींकडून कर्ज घेतात. वैद्यकीय खर्च आणि आरोग्याशी संबंधित गरजांसाठी ही कर्जे 25 टक्क्यांपर्यंत घेतली जातात.  तसेच सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी घेतलेल्या कर्जाचा आकडा 21 टक्के इतका आहे. कमी उत्पन्न गटातील लोक घेतलेल्या कर्जांपैकी 30% कर्ज हे वैद्यकीय गरजांसाठी वापरतात.

82 टक्के कुटुंबांची बँक खाती आधारशी जोडली

गरीब कुटुंबांमधील लोक बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणुक करत असल्याचे दिसून आले आहे. सोने आणि त्याच्याशी संबंधित उत्पादनांमध्ये गुंतवणुक करण्याकडे लोकांची अधिक पसंती आहे. ही गोष्ट सर्व उत्पन्न गटातील लोकांना लागू आहे. सर्वेक्षणानुसार, जवळपास सर्व कुटुंबांतील लोकांकडे बचत खाते आहे आणि 82 टक्के कुटुंबांची बँक खाती आधारशी जोडली असल्याचे सर्व्हेमधून दिसून आले आहे.

Source: hindi.moneycontrol.com