Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IPO Investment Tips: कष्टाने कमावलेले पैसे वाया घालवू नका; IPO साठी अप्लाय करण्यापूर्वी 'या' गोष्टी ध्यानात ठेवा

IPO Investment

Image Source : www.kfintech.com

सर्वसामान्य नागरिक कष्टाने कमावलेला पैसा IPO मध्ये गुंतवतात. मात्र, प्रत्येक IPO पैसे मिळवून देतो का? तर नक्कीच नाही. अनेक IPO मध्ये गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान झाल्याचे तुम्ही पाहिले असेल. IPO साठी अप्लाय करताना कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्यात ते पाहूया.

IPO Investment Tips: जगभरात मंदीसदृश्य परिस्थिती असतानाही भारतीय अर्थव्यवस्था तुलनेने सुस्थितीत आहे. कोरोनानंतर अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आली आहे. सहाजिकच नवनवीन सेवा, उत्पादने घेऊन स्टार्टअप बाजारात येत आहेत. तर काहींना व्यवसाय वृद्धिसाठी पैसा हवा आहे. मग IPO कडे कंपन्यांची नजर वळते. सर्वसामान्य गुंतवणूकदारांकडून पैसे घेऊन व्यवसाय उभा करायचा.

सर्वसामान्य नागरिक IPO मध्ये पैसे गुंतवतात. मात्र, प्रत्येक IPO पैसे मिळवून देतो का? तर नक्कीच नाही. अनेक IPO मध्ये गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. तर काही ठराविक IPO ने फायदा करून दिला. गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्यात ते पाहूया.

FOMO आणि पैशांच्या लालसेपासून दूर राहा

FOMO म्हणजेच ‘फियर ऑफ मिसिंग आऊट’, एखाद्या कंपनीचे शेअर्स सर्वांकडे असतील. सर्वजण IPO तून नफा कमावतील. मात्र, मला फायदा मिळणार नाही, अशी भीती बाळगू नका. तुमच्या जवळच्या मित्रांनी, नातेवाईकांनी एखाद्या IPO साठी अप्लाय केले असेल तर तुम्हीही केलेच पाहिजे असे नाही. 

एखाद्या IPO बद्दल लोकांमध्ये होणारी चर्चा बऱ्याच वेळा अफवा किंवा चुकीच्या माहितीवर आधारित असते. IPO लिस्ट झाल्यावर लगेच जास्त पैसे मिळतील, अशी हाव ठेवू नका. कंपनीचा अभ्यास केल्यानंतरच अप्लाय करा.

कंपनीबद्दल माहिती काढा

बऱ्याच वेळा एखाद्या कंपनीचा IPO येणार असेल तेव्हा गाजावाजा केला जातो. मार्केटिंग, ब्रँडिगमध्ये खऱ्या गोष्टी झोकाळून जातात. मात्र, तुम्ही कंपनीचा व्यवसाय काय आहे, दीर्घकालीन उद्दिष्ट, सेवा, प्रतिस्पर्धक, आर्थिक स्थिती, कंपनीच्या मालकांचा पूर्वेतिहास काय आहे, गुंतवणुकीत जोखीम किती आहे? याची सखोल माहिती काढा. 

कंपनीचे मूल्यांकन तपासा 

IPO आणताना बऱ्याच वेळा कंपनीचे मूल्य आहे त्यापेक्षा वाढवून दाखवले जाते. मामाअर्थ कंपनीचा IPO मूल्यांकनाच्या वादात सापडल्याने कंपनीने IPO रद्द केला. एखाद्या कंपनीत ज्यांनी सुरुवातीला गुंतवणूक केली असते ते गुंतवणूकदार IPO आल्यानंतर शेअर्स विकून बाहेर पडतात. वाढीव मुल्यांकन असलेल्या महागड्या IPO पासून दूर राहा. तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. 

कंपनीला पैसा कशासाठी हवाय?

एखाद्या कंपनीचे IPO द्वारे पैसे उभारण्याचे उद्दिष्ट नक्की काय आहे हे समजून घ्या. जी कंपनी व्यवसाय वाढीसाठी पैसे उभारते ती कंपनी चांगला परतावा देण्याची शक्यता वाढते. तर जी कंपनी कर्ज फेडण्यासाठी पैसे उभे करते ती चांगला परतावा देण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे पैशांचा वापर कंपनी कशासाठी करणार आहे ते पाहा. तसेच मोठी आणि नावाजलेली कंपनी प्रत्येक वेळी चांगला परतावा देईल, असे नाही.

सबस्क्रिप्शन डेटावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका

एखादा शेअर बाजारात लिस्ट होण्याआधी ग्रे मार्केटमध्ये शेअरची खरेदी विक्री होते. ग्रे मार्केटमध्ये अती श्रीमंत व्यक्ती आणि संस्थांनी कंपनीचे मोठ्या प्रमाणात शेअर खरेदी केले अशा अफवा पसरवल्या जातात. यातून कंपनीचा शेअर किती चांगला आहे हे दाखवण्यात येते. शेअरची किंमतही वाढवली जाते. मात्र, जेव्हा शेअर लिस्ट होतो तेव्हा काही दिवसात हा शेअर खाली येतो. त्यामुळे मार्केटिंग आणि जाहिरातबाजीपासून दूर राहा.