Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Investment in Fixed Deposit: मुदत ठेव करण्यापूर्वी या महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या

fixed deposit

Investment in Fixed Deposit: गुंतवणुकीचा विचार केला तर मुदत ठेव हा सर्वात सुरक्षित आणि नियमित उत्पन्न देणारा पर्याय म्हणून ओळखला जातो. मात्र कोणत्याही बँकेत मुदत ठेव करण्यापूर्वी काही मुद्द्यांचा काळजीपूर्वक विचार करायला हवा.

बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असले तरी आजही कमी जोखमीचा आणि सुरक्षित पर्याय म्हणून मुदत ठेवींना (Fixed Deposit) पसंती दिली जाते.  या गुंतवणुकीत ठेवीदाराला मुद्दल रक्कम मिळण्याची खात्री असते.  तसेच मुदतपूर्वी वेळी व्याजातून अतिरिक्त उत्पन्न देखील मिळते. यावरुन मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करण्यात कोणतीच जोखीम नाही, असे तुम्ही समजत असाल तर तो तुमचा गैरसमज आहे. मुदत ठेव करण्यापूर्वी काही महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

ठेवींवर मिळणारे उत्पन्न (Earning on you Investment)

जेव्हा तुम्ही बँकेत मुदत ठेवीसाठी खाते सुरु करता तेव्हा तुम्हाला तुमच्या गुंतवणूक केलेली रक्कम खात्रीशीर मिळणार हे निश्चित असते. त्यामुळेच सर्वसाधारणपणे गुंतवणूकदार सहजपणे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतो. मात्र ठेवींमधून मिळणारे उत्पन्न या मुद्द्याकडे डोळसपणे पाहणे आवश्यक आहे.  बँकिंग क्षेत्रातील स्पर्धा पाहता मुदत ठेवींवर बँकांकडून आकर्षक व्याज दिले जात आहे. काही स्मॉल पेमेंट बँका देखील ठेवींवर जादा व्याज देतात.  त्यामुळे अशा बँकांबाबत विचार करायला हवा , जिथे तुमच्या डिपॉझिटवर जादा उत्पन्न तुम्हाला कमावता येईल. शिवाय ज्येष्ठ नागरिकांना बँकांकडून ठेवींवर 0.50% जादा व्याज दिले जाते.

किमान गुंतवणूक  (Minimum Investment)

मुदत ठेव करताना किमान गुंतवणूक हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. बँकांकडून गुंतवणूक स्लॅबनुसार व्याज दिले जाते. त्यामुळे कमीत कमी रकमेची गुंतवणूक आणि त्यावरील व्याज याबाबत चौकशी करायला हवी. एअरटेल पेमेंट बँक 500 रुपयांपासून ठेवींचा पर्याय देते. एअरटेल पेमेंट बँकेत तुम्ही 190000 रुपयांपर्यंत ठेव करु शकता ज्यात एक ते तीन वर्षांचा मुदतीचा पर्याय आहे.

एफडी रिडीम करण्याची पद्धत सोपी असावी 

मुदत ठेव करण्यापूर्वी ती रिडीम करताना किंवा त्यातून पैसे काढून घेण्याची पद्धत जाणून घेणे आवश्यक आहे. ज्यावेळी तुम्हाला पैशांची तातडीने गरज भासेल तेव्हा तुम्हाला मुदत ठेवीतून सहज पैसे काढता यायला हवेत. काही बँकांमध्ये अशी सुविधा आहे जिथे तुमचे खाते एफडीशी सलग्न असते आणि एफडी रिडीम केली की त्यातील पैसे मिनिटात खात्यात जमा होतात.