सर्व ब्रँड वेगवेगळ्या बजेट आणि कॅटेगरीमध्ये आपले स्मार्टफोन लॉन्च करत असतात परंतु काही फ्लॅगशिप स्मार्टफोनची वाट अनेक महिने आधीपासून पाहिली जाते. साल 2023 मध्ये देखील हायटेक टेक्नॉलॉजी असलेले काही स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत जे बाजारात आल्यावर चर्चेचा विषय बनतील, परंतु लाँच होण्याआधी देखील हे स्मार्टफोन्स टेक विश्वात चर्चेचा विषय बनत आहे.
2023 मधील शेवटच्या काही महिन्यांत लाँच होणाऱ्या बहुप्रतीक्षित फ्लॅगशिप स्मार्टफोनची माहिती दिली आहे जे आपल्या टेक्नॉलॉजीच्या जोरावर भारतात नवीन रेकॉर्ड बनवू शकतात.
Table of contents [Show]
2023 अखेरीस लॉन्च होऊ शकतात हे 6 स्मार्टफोन
OnePlus Ace 2 Pro:
या स्मार्टफोनची भारतामधील किंमत जवळपास 34,290 रुपये असु शकते. हा स्मार्टफोन 23 नोव्हेंबर, 2023 रोजी लॉन्च होण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोन चे 12 GB RAM / 256 GB अंतर्गत स्टोरेज बेस व्हेरिएंट आहे जे Aurora-Green, Titanium-Gray रंगात उपलब्ध होऊ शकतात.
Vivo Y78 Plus:
Vivo Y78 Plus ची किंमत भारतामध्ये जवळपास 19,090 असण्याची शक्यता आहे. तसेच हा स्मार्टफोन 03 ऑक्टोबर, 2023 रोजी लॉन्च होऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये 8 GB RAM / 128 GB अंतर्गत स्टोरेजचा बेस व्हेरिएंट आहे.
Realme GT Neo 5 SE:
या स्मार्टफोनची भारतातील अपेक्षित किंमत जवळपास 23,990 रुपये इतकी असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 28 सप्टेंबर, 2023 रोजी लॉन्च होईल असा अंदाज आहे. Realme GT Neo 5 SE चे 8 GB RAM / 256 GB अंतर्गत स्टोरेज बेस व्हेरिएंट आहे.
Honor 90 Pro:
Honor 90 Pro या स्मार्टफोनची भारतातील अपेक्षित किंमत जवळपास 38,990 रूपये असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन भारतामध्ये 19 ऑक्टोबर 2023 मध्ये लॉन्च होऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये 12 GB RAM / 256 GB अंतर्गत स्टोरेज बेस व्हेरिएंट आहे.
iQOO Neo 8:
या स्मार्टफोनची भारतीय अपेक्षित किंमत जवळपास 29,390 रुपये इतकी आहे. तसेच हा फोन 12 ऑक्टोबर 2023 रोजी लॉन्च होऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये, 12 GB RAM / 256 GB अंतर्गत स्टोरेज बेस व्हेरिएंट आहे; जो मॅच पॉईंट, सर्फ, नाईट रॉक कलरमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
OPPO K11:
भारतात OPPO K11 ची किंमत जवळपास 21,690 रुपये इतकी असण्याची अपेक्षा आहे. हा स्मार्टफोन 30 नोव्हेंबर 2023 रोजी लॉन्च होऊ शकतो. तसेच या स्मार्टफोनमध्ये 8 GB RAM / 256 GB अंतर्गत स्टोरेज बेस व्हेरिएंट आहे जे मून शॅडो ग्रे, ग्लेशियर ब्लू कलरमध्ये उपलब्ध होऊ शकतात.