Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Stock Market Holiday: बुधवारी शेअर मार्केट सुरू असणार; बकरी ईदची सुट्टी 29 जूनला

Stock Market Holiday

Stock Market Holiday: एनएसई आणि बीएसईने उद्याची सुट्टी रिशेड्युल्ड केली असून, बुधवारी (दि.28 जून) शेअर मार्केट सुरू असणार आहे.

Stock Market Holiday: एनएसई आणि बीएसईने उद्याची सुट्टी रिशेड्युल्ड केली असून, बुधवारी (दि.28 जून) शेअर मार्केट सुरू असणार आहे. NSE आणि BSE च्या नियोजित कॅलेंडरनुसार बकरी ईदची 28 जूनला म्हणजे बुधवारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. पण बकरी ईद गुरूवारी (दि.29 जून) असल्यामुळे ती सुट्टी आता गुरूवारी जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकारनेही याबाबत नोटिफिकेशन काढून सुट्टीमध्ये बदल केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबत 26 जून रोजी अधिसूचना काढून सुट्टीतील बदल जाहीर केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या या अधिसूचनेच्या अधीन राहून एनएसई आणि बीएसईनेही 28 जूनची सुट्टी रद्द करून 29 जूनला शेअर मार्केट बंद असेल, असे नोटिफिकेशन प्रसिद्ध केले आहे. त्याचबरोबर एनएससीची फ्युचर आणि ऑप्शन्स (Futures & Options-F&O) यांची मंथली एक्सपायरी जी गुरूवारी होते. ती एनएसईने नोटीफिकेशन काढून शुक्रवारी केली होती. ती आता एनएसईने पुन्हा गुरूवारी केली आहे. 

Maharashtra Govt. Eid Holiday Notification

फ्युचर आणि ऑप्शनसोबतच निफ्टी, बँक निफ्टी यांची विकली एक्सपायरी ही गुरूवारऐवजी बुधवारी होईल. इक्विटी बाजाराप्रमाणेच करन्सी मार्केट (Currency Market) देखील गुरूवारी (दि.29 जून) बंद असेल आणि बुधवारी (दि. 28 जून) सुरू असेल. कमॉडिटी मार्केटसुद्धा गुरूवारी बंद असणार आहे; पण सायंकाळी 5 नंतर ट्रेडिंग सेशन सुरू होणार आहे.

बीएसईने इक्विटी मार्केटसाठी 2023 मधील 15 सुट्ट्यांची यादी यापूर्वीच प्रसिद्ध केलेली आहे. आता शेअर मार्केटला पुढील सुट्टी ही स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट, 2023 रोजी असणार आहे.