• 26 Sep, 2023 23:51

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Term Insurance: टर्म इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Term Insurance

Term Insurance: टर्म इन्शुरन्स असणे हे आजच्या घडीला तुमच्या कुटुंबाचे भवितव्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्याचा एक खात्रीशीर उपाय आहे. तुमच्यावर काही आकस्मित संकट कोसळले तर तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबियांची चिंता दूर करण्यास टर्म इन्शुरन्स खूप फायदेशीर ठरतो.

आजच्या धकाधकीच्या जीवनात रिस्क वाढली आहे. त्यात तुम्ही नोकरदार असाल आणि नोकरीनिमित्त दररोज घर ते ऑफिस अशी धावपळ करत असाल तर मग तुम्ही पुरेशे विमा कवच घेणे आवश्यक आहे. आयुर्विमा घेतानाच हल्ली टर्म इन्शुरन्स घेण्याबाबत आर्थिक सल्लागार शिफारस करतात. मात्र सरळधोपटपणे टर्म इन्शुरन्स घेऊन नंतर पश्चाताप करण्यापेक्षा काही मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे.

टर्म इन्शुरन्स असणे हे आजच्या घडीला तुमच्या कुटुंबाचे भवितव्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्याचा एक खात्रीशीर उपाय आहे. तुमच्यावर काही आकस्मित संकट कोसळले तर तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबियांची चिंता दूर करण्यास टर्म इन्शुरन्स खूप फायदेशीर ठरतो. नोकरदारांनी टर्म इन्शुरन्स घ्यावा,असा सल्ला दिला जातो.

टर्म प्लानमध्ये किती कव्हरेज आहे याची खात्री करा

टर्म इन्शुरन्स घेताना त्याच तुमच्या गरजेनुसार विमा कव्हरेज आहे की नाही याची खात्री करायला हवी. सध्या विमा बाजारपेठेत टर्म इन्शुरन्सचे अनेक प्लान्स उपलब्ध आहेत. मात्र यात तुमच्या गरजेनुसार कोणता प्लान योग्य आहे तोच प्लान निवडा. टर्म इन्शुरन्समध्ये एकूण विमा रक्कम ठरवताना तुमचे उत्पन्न, तुमच्यावर अवलंबून असलेले कुटुंबातील सदस्य आणि त्याचे उत्पन्न, तुमची संपत्ती, कर्ज हे सर्व घटक तुम्हाला टर्म इन्शुरन्समध्ये पुरेशी विमा सुरक्षा मिळाली आहे की नाही हे ठरवतात. त्यामुळे किती रकमेचे कव्हर घेणार याचा नीट विचार करणे आवश्यक आहे.

कंपन्यांचा क्लेम सेटल रेशो तपासून घ्या

टर्म इन्शुरन्स असो किंवा कोणतीही विमा पॉलिसी असो ग्राहकाने संबधित कंपनीचा क्लेम सेटल रेशो तपासून घेणे आवश्यक आहे. अनेक कंपन्या इन्शुरन्स पॉलिसी इश्यू करताना ग्राहकाला ऑफर्स देतात मात्र प्रत्यक्षात जेव्हा दाव्याची भरपाई देण्याची वेळ येते तेव्हा अंडररायटिंगमध्ये दावा नाकारण्याचे प्रकार सर्रास घडतात. त्यामुळे ग्राहकाने क्लेम सेटलमेंट रेशो पाहणे आवश्यक आहे. किमान 95% क्लेम सेटल रेशो असणाऱ्या कंपन्यांची कामगिरी चांगली मानली जाते. काही कंपन्यांचे हे प्रमाण 90 ते 95% या दरम्यान असते.

विमा आणि गुंतवणूक या गैरसमज करु नका

टर्म इन्शुरन्स हे एन्डॉवमेंट आणि युनिट लिंक्ड पॉलिसीजपेक्षा वेगळा प्रकार आहे. टर्म इन्शुरन्स ही केवळ विमा सुरक्षा आहे. यात मुदतपूर्तीवेळी इतर पारंपारिक विमा योजनांप्रमाणे बोनस आणि जमा झालेली रक्कम मिळत नाही. त्यामुळे टर्म इन्शुरन्स घेताना गुंतवणूक आहे मुदतपूर्तीवेळी पैसे मिळतील, असा विचार करणे चुकीचे ठरेल. टर्म इन्शुरन्स हा किमान प्रीमियममध्ये कमाल विमा सुरक्षा देणारा प्लान आहे.

टर्म इन्शुरन्सला देखील मिळतो कर लाभ

इतर विमा इन्शुरन्सप्रमाणे टर्म प्लानला देखील कर वजावट मिळते. आयकर कलम 80 सी अंतर्गत टर्म इन्शुरन्सचा प्रीमियमची वजावट मिळते. याशिवाय टर्म प्लान घेताना त्यात अतिरिक्त रायडर घेतले तर त्यावरही कर सवलत मिळते.