कोणतेही आर्थिक नियोजन करताना गुंतवणूक हा खूप आवश्यक भाग आहे. तुमच्या सेवानिवृत्ती नंतरचा काळ समृद्धपणे जगण्यासाठी गुंतवणूक गरजेची आहे. गुंतवणूकीची अनेक साधने आहे ज्यामुळे कर मूल्यात मोठ्या प्रमानात बचत होते. मात्र काही असे मार्ग आहेत जेथे गुंतवणूक न करूनही कर आपण वाचवू शकतो कसा ते जाणून घ्या.
Table of contents [Show]
घरभाडे भत्ता (House Rent Allowance)
गुंतवणूक न करता टॅक्स वाचवण्याचा HRA किंवा घरभाडे भत्ता हा एक सोपा मार्ग आहे. घरभाडे भत्ता हा कर्मचाऱ्याच्या पगाराचा एक भाग असतो. जर कर्मचारी भाड्याच्या घरात राहत असेल तर ती व्यक्ती 1961च्या इन्कम टॅक्स कायद्यानुसार HRA अंतर्गत मिळणाऱ्या सवलतीचा दावा करू शकतो.
शिक्षणासाठी घेतलेले कर्ज (Educational Loan)
शैक्षणिक कर्ज घेतल्यास कोणतीही गुंतवणूक न करता टॅक्स सवलत मिळते. शैक्षणिक कर्ज या सुविधे अंतर्गत संबंधित व्यक्तीला त्याच्या शैक्षणिक खर्चासाठी आणि त्याचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य देते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर या कर्जाची परतफेड केली जाऊ शकते. 1961च्या इन्कम टॅक्स कायद्याचे कलम 80E शैक्षणिक कर्जाची परतफेड करण्यासाठी भरलेल्या व्याजावर कर कपात होते.
गृहनिर्माण कर्ज (Housing loan)
जेव्हा तुम्ही गृहकर्ज घेता, तेव्हा तुम्हाला कर्ज देणाऱ्याला दिलेल्या मुदतीत मुख्य कर्जाची रक्कम परत करावी लागते. तुम्ही इन्कम टॅक्स कायद्याच्या 1961 च्या कलम 24(b) अंतर्गत गृहकर्जासह गुंतवणूक न करता टॅक्स वाचवू शकता. या अंतर्गत, कर्जदार त्याच्या मालमत्तेसाठी 2 लाख रुपयांपर्यंतच्या टॅक्स सवलतीसाठी पात्र असतो. या मार्गांनी गुंतवणूक करून तुम्ही टॅक्स वाचवू शकता.
त्याचबरोबर तुम्ही बांधकाम सुरू असलेली मालमत्ता खरेदी केली असल्यास, त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच कर कपातीचा दावा करू शकता. जर तुम्ही पूर्णपणे बिल्ट-अप मालमत्ता खरेदी करण्यासाठी होम लोन घेतले असेल, तर तुम्ही गृहकर्जावर भरलेल्या व्याजावर तात्काळ कर कपातीचा दावा करू शकता.
ज्येष्ठ नागरीकांवर होणारा वैद्यकीय खर्च (Medical Expenses of Seniors Citizens)
गुंतवणुकीशिवाय कर वाचवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या उपचारासाठी झालेल्या वैद्यकीय खर्चावर तुम्ही कर कपातीचा दावा करू शकता. यावेळी तुम्ही आरोग्य विमा प्रीमियमवर देखील कर कपातीचा दावा करू शकता. 1961 च्या आयकर कायद्याचे कलम 80D हे ज्येष्ठ नागरिक पालक, स्वत: किंवा कुटुंबातील इतर सदस्यांसाठी भरलेल्या आरोग्य विम्याच्या प्रीमियमनूसार कर कपात होते. या कलमांतर्गत, तुम्ही आरोग्य विमा प्रीमियमवर 25,000 रुपयांपर्यंतच्या कर कपातीचा दावा करू शकता. तसेच, जर तुम्ही तुमच्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरीकांचा आरोग्य विमा प्रीमियम भरला असेल, तर तुम्ही 25,000 आणि 50,000 रुपयांपर्यंत दावा करू शकता.
मुलांची शैक्षणिक फी (Children's Tuition Fee)
अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे भत्ते देतात. जसे की मुलांची शिकवणी फी, शिक्षण भत्ता, वसतिगृह भत्ता इत्यादी. या भत्त्यांद्वारे कायद्यातील कलम 10 अनुसार टॅक्समध्ये सवलत घेता येते.