Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Risky Instant Loan App : सावधान..! झटपट कर्ज देणाऱ्या बेकायदेशीर ॲप पासून दूर रहा

Risky Instant Loan App : सावधान..! झटपट कर्ज देणाऱ्या बेकायदेशीर ॲप पासून दूर रहा

झटपट कर्ज देणारे ॲप (loan apps) कर्जदारांना आकर्षित करण्यासाठी बल्क एसएमएस, डिजिटल जाहिराती, चॅट मेसेंजर आणि मोबाइल ॲप स्टोअर्स यांसारख्या विविध चॅनेलचा वापर करतात. या कर्ज ॲप्सवर कारवाई करण्यासाठी सरकारने पावले उचलली असली तरी, ते हजाराच्या संख्येने गुगल प्ले स्टोअर उपलब्ध आहेत.

सध्या कर्ज पुरवठा करणाऱ्या अनेक वित्तीय संस्था बाजारात उपलब्ध आहेत. त्यापैकी काही बँकिंग क्षेत्राशी निगडीत आहेत तर काही नॉन बँकिंग क्षेत्रातील आणि काही बेकायदेशीर आहेत. त्याच बरोबर झटपट लोन देणाऱ्या अनेक ॲपचेही (loan apps) मोठ्या प्रमाणात जाळे पसरले आहे. मात्र, काही झटपट लोन देणारे ॲप बेकायदेशीर आणि नियमबाह्यपणे प्रसंगी अश्लील शिवीगाळ करत कर्जदारांकडून कर्ज वसुली करत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. तसेच या ॲपच्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्यात आल्याने काही जणांनी आत्महत्या केल्याचे प्रकार समोर आले आहते. आज आपण अशाच झटपट लोन ॲपमुळे होणाऱ्या फसवणुकीबाबत जाणून घेणार आहोत.

लोन ॲपच्या जाचाला कंटाळून आत्महत्या-

नुकतीच बंगळुरू येथे एका 22 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याने स्लाइस अँड किस या चिनी लोन ॲपच्या माध्यमातून कर्ज घेतले होते. मात्र तो विद्यार्थी परतफेड करण्यास असमर्थ ठरल्यानंतर ॲपच्या लोन रिकव्हरी टीमकडून त्याच्या मोबाईलमधील फोटो मॉर्फ करून शेअर करण्याची धमकी  देण्यात आली. त्यामुळे त्याने आत्महत्या केली.  तशाच प्रकारे मध्यप्रदेशातील इंदौर येथील एका लोन ॲपवरुन कर्ज घेतलेल्या कर्जदाराला अश्लील शिवीगाळ, फोटो मॉर्फची धमकी, नातेवाईकांना धमक्या दिल्याचे प्रकार घडल्याने त्याने पत्नी आणि आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

बेकायदेशीर ॲप्सचे जाळे

वरील आत्महत्येच्या घटना या कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्यामुळे घडल्या असल्याचे दिसून येते. मात्र, या ॲप कंपन्यांकडून कर्जदाराची वैयक्तिक माहिती वापरून समाजात बदनामी करण्याची धमकी देण्याचा प्रकार घातक ठरत आहे. सध्या बाजारात लहान-लहान आणि झटपट कर्ज देणाऱ्या ॲप्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सुरुवातीला किमान कागदपत्रांसह झटपट कर्ज देण्याचे आश्वासन या कंपन्यांकडून दिले जाते. यामध्ये काही चिनी ॲपचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.  हे कर्ज ॲप्स कर्जदारांना आकर्षित करण्यासाठी बल्क एसएमएस, डिजिटल जाहिराती, चॅट मेसेंजर आणि मोबाइल ॲप स्टोअर्स यांसारख्या विविध चॅनेलचा वापर करतात. या कर्ज ॲप्सवर कारवाई करण्यासाठी सरकारने पावले उचलली असली तरी, ते हजाराच्या संख्येने गुगल प्ले स्टोअर उपलब्ध आहेत.


कशी केली जाते फसवणूक?

झटपट लोन देणाऱ्या ॲप्सकडून पैशाची अधिक गरज असणाऱ्या आणि असुरक्षित व्यक्तींना लक्ष्य केले जाते. ज्यात कमी उत्पन्न मिळवणारे आणि तरुण व्यावसायिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.  या ॲप्समध्ये झटपट लोन, कमी कागदपत्रे यासारख्या सुविधांची माहिती दिलेली असते. या सुविधांच्या मोहात पडून एखादी व्यक्ती त्यांच्या जाळ्यात सापडते. तेव्हा त्याला झटपट कर्ज क्रेडिट केले जाते.  या ॲप्समधून कर्ज मिळवणे सोपे असले तरी जास्त व्याजदरामुळे परतफेड जवळजवळ अशक्य केली जाते. शिवाय, या ॲप्समध्ये नियमांचा अभाव असल्याने, व्याजदर अनकॅप्ड राहतात आणि छुपे शुल्क लागू होऊ शकतात. त्यामुळे कर्जदार त्यांच्या जाळ्यात अडकतो. 

तुमच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर-

कर्ज घेण्यासाठी ज्यावेळी तुम्ही कर्ज देणारे  ॲप डाऊनलोड करता,  त्यावेळी तुमच्याकडून ॲपचे तपशील तपासले जात नाहीत. तसेच  ॲप ज्या परवानग्या मागत आहेत, त्याही न वाचता दिल्या जातात. त्यामुळे हे ॲप्स तुमच्या फोनमधील संपर्क आणि फोटोंसह इतर सर्व तपशीलांमध्ये प्रवेश करतात. त्यानंतर ॲप वापरकर्त्याचा फोन हॅक करणे आणि बँक तपशील,  ईमेल आणि छायाचित्रांसह त्यांचा डेटा चोरला जातो.  

याच वैयक्तिक माहितीचा शस्त्र म्हणून वापर केला जातो. जर एखादा कर्जदार कर्जाची रक्कम फेडण्यास असमर्थ ठरल्यास, (जास्त व्याज दर आणि छुपे शुल्क आकारणीमुळे) कर्जदाराची वैयक्तिक माहिती वापरून ब्लॅकमेल केले जाते. यासाठी आणि वापरकर्त्याचे मॉर्फ केलेले चित्र त्यांचे मित्र, सहकारी आणि नातेवाईक यांना पाठवून त्रास देणे सुरू करणे.  मानसिक छळ,नातेवाईंकांना फोन करून बदनामी करणे असे प्रकार केले जातात. त्यामुळे नागरिकांनी अशा बेकायदेशीर आणि झटपट लोनच्या मोहापासून दूर राहावे.

कसे ओळखायचे फसवे ॲप ?

बेकायदेशीर कर्ज ॲप ओळखण्यासाठी काही मूलभूत गोष्टी जाणून घेणे महत्वाचे आहे. त्यामध्ये ते भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांचे पालन करतात का नाही, हे पाहणे. तसेच अधिकृत कर्ज प्लॅटफॉर्मना त्यांच्या भागीदार बँका किंवा NBFCs उघड करणे आवश्यक आहे. वित्तीय भागीदारांच्या वेबसाइट्ससह माहितीचे क्रॉस-व्हेरिफाय करणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, बनावट कर्ज अॅप्समध्ये अनेकदा त्यांच्या कार्यालयाचा पत्ता नसतो. तसेच कायदेशीर कर्ज देणारे प्लॅटफॉर्म कधीही संपर्क, फोटो किंवा व्हिडिओ यांसारख्या वैयक्तिक डेटाची मागणी करत नाहीत. अधिकृत वित्तिय संस्थाकडून केवळ KYC करण्यसाठी आधार किंवा पॅन कार्डची माहिती मागितली जाते.