Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SONY Party Speaker : पार्टीसाठी डॉल्बीवर खर्च करूच नका; खास भारतीयांसाठी Sony ने आणलाय पॉवरफुल पार्टी स्पीकर

SONY Party Speaker : पार्टीसाठी डॉल्बीवर खर्च करूच नका; खास भारतीयांसाठी Sony ने आणलाय पॉवरफुल पार्टी स्पीकर

Image Source : www.aninews.in

Sony India कंपनीने शुक्रवारी नवीन SRS-XV800 पार्टी स्पीकर लॉन्च केला आहे. या स्पीकर खास पार्टी, समारंभ, सार्वजनिक ठिकाणचे कार्यक्रम यामध्ये वापरण्याच्या दृष्टीकोनातून ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. या स्पीकरच्या माध्यमातून तुम्ही घरामध्ये चित्रपट पाहात असाल तर थिएटरमध्ये असल्याचा अनुभव घेऊ शकणार आहात.

आपल्याकडे लहान-लहान कार्यक्रमांचे नेहमीच आयोजन केले जाते. त्यासाठी सजावट, लाऊड स्पीकर किंवा काही वेळेला डॉल्बी यावर खर्च केला जातोच. विशेषत: तरुणाईमध्ये पार्टी आणि नाचगाणे यासाठीचा उत्साह जरा जास्तीच दिसून येतो. एखादी चांगली गोष्ट घडली की पार्टी तर झालीच पाहिचे हे शब्द ठरलेलेच असतात. भारतीयांची हीच खासियत ओळखून सोनी कंपनीने आता खास भारतीयांसाठी एक खास पार्टी स्पीकर लॉन्च केला आहे. जाणून घेऊयात स्पीकरची त्याची किंमत किती आहे आणि त्याची खास वैशिष्ट्ये काय आहेत.

SRS-XV800 पार्टी स्पीकर 


Sony India कंपनीने शुक्रवारी नवीन SRS-XV800 पार्टी स्पीकर लॉन्च केला आहे. या स्पीकर खास पार्टी, समारंभ, सार्वजनिक ठिकाणचे कार्यक्रम यामध्ये वापरण्याच्या दृष्टीकोनातून  ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. या स्पीकरच्या माध्यमातून तुम्ही घरामध्ये चित्रपट पाहात असाल तर थिएरमध्ये असल्याचा अनुभव घेऊ शकणार आहात.  सोनी कंपनीच्या या स्पीकरला पॉवरफुल बास आणि कडक आवाजाचा अनुभव तुम्हाला घेता येणार आहे. जर तुम्हाला पार्टीसाठी अपेक्षित असा कडक आवाजाचा स्पीकर उपलब्ध होत असेल तर मार्केटमधून साऊंड सिस्टम भाड्याने आणण्याची गरजच पडणार नाही.

काय आहेत वैशिष्ट्ये

खास पार्टीसाठी तयार करण्यात आलेल्या या स्पीकर दिसायला आकर्षक तर आहेच. मात्र याचा आवाज डॉल्बी लावल्याचा फिल निर्माण करतो.  SRS-XV800 या स्पीकरमध्ये ओम्नी-डायरेक्शनल पार्टी साउंडचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे तुम्हाला पार्टीसाठी पॉवरफुल्ल आवाजाचा आनंद घेता येतो. स्पीकरच्या पुढील आणि मागील बाजूस पाच ट्वीटर देण्यात आले आहेत. तसेच SRS-XV800 या स्पीकरला गिटार इनपुट, टच पॅनेल, IPX4 ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोनीचा हा स्पीकर पोर्टेबल असून तुम्ही याला सहज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवू शकता, यासाठी त्याला चाकेही देण्यात आली आहेत.

10 मिनिटात चार्ज-

सोनी SRS-XV800 हा पार्टी स्पीकर चार्ज करता येत असून एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 25 तास तुम्हाला त्याच्या दमदार आवाजाचा आनंद घेता येणार आहे. याशिवाय समजा चार्जिंग कमी झाली तरी फक्त 10 मिनिटांत तुम्ही तो चार्ज करू शकता जो तुम्हाला पुढील 3 तासांसाठी तुमच्या नाच गाण्यात व्यत्यय निर्माण करणार नाही.

किंमत किती आहे?

सोनीच्या स्पीकरच्या किमती संदर्भात सांगायचे झाल्यास हा स्पीकर ग्राहकांना 49990  रुपयांना उपलब्ध होणार आहे. भारतातील सोनी रिटेल स्टोअर्स (सोनी सेंटर आणि सोनी एक्सक्लुझिव्ह), www.ShopatSC.com पोर्टल, आणि इतर प्रमुख इलेक्ट्रॉनिक स्टोअर्स आणि इतर ई-कॉमर्स वेबसाइटवर उपलब्ध असेल.