Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Instagram Fraud Alert : झटपट पैसे कमावण्याची इंस्टाग्रामवर जाहिरात पाहिली आणि एका चुकीने गमावले 10.5 लाख रुपये…

Instagram Fraud Alert

इंस्टाग्रामवर झटपट कमाई करण्याची जाहिरात बघून कर्नाटकातील मंगळुरू येथील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने 10.5 लाख रुपये गमावले आहेत. होय, तब्बल 10.5 लाख रुपये! मेहनत न करता झटपट पैसे कमावणे या व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे.

मोबाईल आणि तंत्रज्ञानाचा वापर जेवढा वाढलाय, तितकाच त्याचा गैरफायदा देखील वाढलेला पाहायला मिळतो आहे. सोशल मिडीयाच्या जमान्यात जवळपास सगळेच लोक वेगवेगळे सोशल मिडिया ॲप वापरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडिया ॲपवर आर्थिक घोटाळे होताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे स्वतः आयटी क्षेत्रात काम करणारे काही कर्मचारी देखील या आर्थिक फसवणुकीला बळी पडलेले दिसत आहेत.

इंस्टाग्रामवर झटपट कमाई करण्याची जाहिरात बघून कर्नाटकातील मंगळुरू येथील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने 10.5 लाख रुपये गमावले आहेत. होय, तब्बल 10.5 लाख रुपये! मेहनत न करता झटपट पैसे कमावणे या व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे.

मित्रांनो, तुम्हांला देखील अशी आमिषे कुणी दाखवत असेल तर वेळीच सावध व्हा, मेहनतीला पर्याय नाही हे लक्षात असू द्या.

पार्ट टाईम जॉबचे आमिष 

हे संपूर्ण प्रकरण आहे कर्नाटकातील मंगुलुरू येथील. इथल्या एका महिला  सॉफ्टवेअर इंजिनीअरने तिच्या इंस्टाग्राम खात्यावर एक जाहिरात पाहिली. त्यात पार्ट टाईम जॉबबद्दल (Part Time Job) माहिती देण्यात आली होती. घरबसल्या मोबाईलवर कधीही, कुठेही काम करता येईल अशा स्वरुपाची जाहिरात तिच्या वाचण्यात आली. जर तुम्हांला यात सहभागी व्हायचे असेल तर 9899183689 या व्हॉट्सॲप क्रमांकावर ‘I am Interested’ असे लिहून पाठवण्यास सांगण्यात आले होते.

सदर महिलेने वर दिलेल्या या व्हॉट्सॲप क्रमांकावर संदेश पाठवल्यानंतर तिला @khannika9912 टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यास सांगण्यात आले. या महिलेने कुठलीही शंका न घेता, शहानिशा न करता हा टेलिग्राम चॅनल जॉईन केला.

अधिक पैशाचा हव्यास नडला 

या महिलेने टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यानंतर तिला सायबर चोरांनी काही पैसे गुंतवण्यास सांगितले. जितके पैसे गुंतवाल त्यावर 30% पेक्षा अधिक परतावा दिला जाईल असे आमिष दाखवले गेले. सदर महिलेने सायबर चोरणावर विश्वास ठेऊन त्यांच्या यूपीआय आयडीवर 7,000 रुपये ट्रान्सफर केले. महिलेशा विश्वास संपादन करण्यासाठी चोरांनी या महिलेच्या खात्यावर 9,100 रुपये पाठवले.

आपल्याला घरबसल्या अधिक परतावा मिळतो आहे असा समाज होऊन या महिलेने पुन्हा त्याच UPI आयडीवर 20,000 रुपये ट्रान्सफर केले. यावेळी मात्र तुमचे बँक खाते ब्लॉक करण्यात आले असल्याने आम्हांला तुमचे पैसे मिळू शकले नाहीत असे तिला सांगण्यात आले. त्यानंतर तिला परत पैसे पाठवायला लावले. या महिलेने अनेकदा त्या  UPI आयडीवर पैसे पाठवण्याचा प्रयत्न केला मात्र पैसे पोहोच झाल्याचा तिला मेसेजच येत नव्हता.

थोड्या वेळाने तिच्या बँक खात्यातून एकूण 10,50,525 रुपये ट्रान्सफर केल्याचे तिच्या लक्षात आले, तोवर सायबर चोरांनी आपला मोबाईल फोन बंद करून पोबारा केला होता. आपली फसवणूक झाली आहे असे समजताच या महिलेने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दखल केला आहे.

मित्रांनो, अशा प्रकारच्या कुठल्याही अमिषाला बळी पडू नका. अनोळखी व्यक्तींशी कुठलाही आर्थिक व्यवहार करू नका, झटपट पैसे कमावण्याचा कुठलाही सरळमार्ग जगात उपलब्ध नाहीये. मेहनतीला पर्याय नाही हे कायम लक्षात ठेवा.