Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Smart Phone Under 4000: अ‍ॅमेझॉनवर 2 ते 4 हजारांत स्मार्टफोन उपलब्ध, जाणून घ्या कंपनी आणि फीचर्स

Smart Phone Under 4000

Image Source : www.gizbot.com/

Smart Phone Under 4000: अ‍ॅमेझॉन आपल्या प्रत्येक ग्राहकाचा खूप काळजीपूर्वक विचार करते आणि परवडेल अशा किमतीत ती वस्तू त्याला उपलब्ध करून देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. अशाचप्रकारे अ‍ॅमेझॉनने अवघ्या 4 हजार रुपये किमतीचे स्मार्टफोन ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.

अ‍ॅमेझॉनवर भारतीय सणांनिमित्त नेहमीच वेगवेगळ्या ऑफर जाहीर केल्या जातात. या ऑफरद्वारे अ‍ॅमेझॉन अनेक वस्तुंवर, गॅझेटवर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंवर भरघोस सूट देत असते. पण आपल्या समाजातील काही घटकांतील लोकांना हे भरमसाठ सूट दिलेले मोबाईलही परवडत नाहीत. अशा ग्राहकांचाही अ‍ॅमेझॉनने विचार करून त्यांना परवडेल अशा किमतीचे स्मार्टफोन उपलब्ध करून दिले आहेत.

अ‍ॅमेझॉन आपल्या प्रत्येक ग्राहकाचा खूप काळजीपूर्वक विचार करते आणि त्याला परवडेल अशा किमतीत उपलब्ध करून देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. अ‍ॅमेझॉनच्या या वैशिष्ट्यामुळेच त्याला अलिबाबाची गुहा म्हणत असतील. तर अ‍ॅमेझॉनने अवघ्या 4 हजार रुपये किमतीचे स्मार्टफोन ही ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. या यादीतील काही स्मार्टफोनची किंमत तर अगदी 2250 रुपये इतकी आहे आणि या फोनमध्ये 1GB RAM आणि 8 GB ROM देण्यात आले आहे. तर असेच फीचर्स असलेला 8GB ROM च्या मोबाईलची किंमत अवघी 3,450 रुपये आहे.

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या मोठमोठ्या ब्रॅण्डेड कंपन्या ही महागड्या फोनपासून अगदी कमी किमतीचे फोन तयार करतात. पण या प्रसिद्ध असलेल्या कंपन्यांचे स्वस्तातले फोनही काही जणांना परवडत नाहीत. पण मोबाईलमध्ये अशा काही कंपन्या आहेत. ज्यांचे नाव कदाचित आपल्याला माहित नाही. पण त्या कंपन्या अगदी 3 ते 4 हजार रुपयांमध्ये स्मार्टफोन विकत आहेत आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे असे फोन अ‍ॅमेझॉनवर ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. एकीकडे अ‍ॅमेझॉन लाखो रुपयांचे स्मार्टफोन विकते तर दुसरीकडे अगदी अडीच हजारांना मिळणाऱ्या स्मार्टफोनचीही विक्री करते. 

गुगलवर 2 to 4 Thousand rupees mobile on Amazon असे टाकले तर अगदी काही सेकंदात गुगल या किमतीशी जुळणारी लाखो पेजेस आपल्यासमोर सादर करते. यात प्रामुख्याने अ‍ॅमेझॉनची पेजेस बरीच आहेत. आणि या पेजेसवर अगदी 2 हजारांपासून ते 4 हजारांना मिळणारे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. यामध्ये काही नोकिआसारख्या नामांकित कंपन्यांचे फोनही उपलब्ध आहेत.