आरोग्य विमा पॉलिसी (Health Insurance Policy ) काढणे हे आपण आणि आपल्या कुटुंबियांसाठी आर्थिक हिताचे पाऊल आहे. तसेच भविष्यात आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य आर्थिक खर्चाचा फटका टाळण्यासाठी प्रत्येकाने आरोग्य विमा पॉलिसी काढण्यास प्राधान्य दिले पाहिजे. मात्र, विमा पॉलिसी काढणे म्हणजे पॉलिसीवर जास्त पैसे खर्च हे व्यवहार्य होणार नाही. त्यामुळे कमी खर्चात सर्वसमावेशक विमा पॉलिसी कशा प्रकारे खरेदी करता येईल, विमा पॉलिसीवर होणारा खर्च कसा कमी करता येईल याबाबतची माहिती आपण जाणून घेऊयात..
Table of contents [Show]
विमा कंपन्यांच्या ऑफर्स तपासा-
विमा कंपन्याकडून अनेक प्रकारच्या विमा योजना राबवल्या जातात. विविध प्रकारच्या कव्हरेजनुसार विमा पॉलिसीच्या किमतीमध्ये बदल होत जातो. त्याच प्रमाणे विमा कंपन्याकडून काही ऑफर्सही दिल्या जातात. या शिवाय पॉलिसी घेताना तुम्ही देखील तुम्हाला नको असलेले कव्हरेज पॉलिसीमधून टाळण्याचे पर्यायही काही विमा कंपन्यांकडून खुले असतात. या माध्यमातून तुम्ही तुम्ही तुमच्या आरोग्य विमा पॉलिसीची (Health Insurance policy) रक्कम निश्चित करू शकता. पुढे विमा पॉलिसीच्या खर्चामध्ये बचत करण्यात मदत करणाऱ्या टीप्स आपण जाणून घेऊ.
ऑनलाईन सेवांचा लाभ
इंटरनेटच्या वापरामुळे बहुतांश विमा कंपन्या आपल्या प्रोडक्टची माहिती ऑनलाईन देत आहेत. तसेच पॉलिसी खरेदी, रिन्यू करणे, क्लेम करणे, केवायसी तपासणे, विमा हप्ते भरणे या सर्व गोष्टी आता ऑनलाईनच होत आहेत. त्यामुळे स्वस्त आरोग्य विमा पॉलिसीचा ऑनलाइन शोध घेणे फायद्याचे ठरू शकते. तसेच काही विमा कंपन्यांकडून ग्राहकांसाठी ऑनलाइन सवलती उपलब्ध करून दिल्या जातात. जसे की अनेक विमा कंपन्या ऑनलाइन विमा खरेदीवर विमा पॉलिसीच्या प्रीमियमवर 5-10 टक्के सूट देतात. याचाही तुम्हाला पॉलिसीच्या खर्चात बचतीसाठी फायदा होऊ शकतो.
विमा पॉलिसींची पडताळणी-
बाजारात अनेक विमा सेवा देणाऱ्या कंपन्या उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही या विमा कंपन्यांकडून आरोग्य विम्यासाठी कोणकोणत्या सुविधा दिल्या आहेत. वेगवेगळ्या विमा पॉलिसीच्या किमतीमध्ये फरक किती आहे? विमा पॉलिसीमध्ये कोणकोणते कव्हरेज समाविष्ट करण्यात आले आहेत. याशिवाय तुम्हाला कोणकोणत्या विमा संरक्षणाची आवश्यकता आहे आणि ज्या कव्हरजची तुम्हाला गरजच नाही असे कव्हरेज शक्यतो टाळा, अशा विमा सुविधा कोणती कंपनी देते, त्यांचे दावे मंजूरीचे टक्केवारी किती आहे, यासर्व गोष्टी पडताळणी केल्यास तुम्ही तुमच्या बजेटमध्ये विमा पॉलिसी खरेदी करू शकता. जर तुम्ही पडताळणी न करता विमा पॉलिसी घेतल्यास कदाचित काही पॉलिसी स्वस्तात उपलब्ध असतानाही तुम्हाला जास्त प्रिमियम द्यावा लागू शकतो.
बाजारात काही कंपन्याकडून सातत्याने वेगवेगळ्या पॉलिसी योजना लॉन्च केल्या जातात. या योजनांचे मार्केटिंग करण्यासाठी देखील काही कंपन्यांकडून सुरुवातीच्या काळात ग्राहकांना सवलती देतात. तसेच काही योजना या खास ग्राहकांच्या मागणीनुसार कव्हरेजचा पुरवठा करणाऱ्या असतात. त्यामुळे विमा खरेदी करण्यापूर्वी तुम्ही अशा योजनांची माहिती घेतल्यास तुमच्या खर्चात बचत होऊ शकते.
क्रेडिट स्कोअरला प्राधान्य
बाजार विमा कंपन्याची स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे काही विमा कंपन्यांकडून आता क्रेडिट स्कोअरच्या आधारावर ग्राहकांना विमा प्रिमियममध्ये सवलती देत आहेत. जसे की रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी त्यांच्या रिलायन्स हेल्थ इन्फिनिटी पॉलिसीवर क्रेडिट स्कोअरच्या आधारे ग्राहकांना 7.5% पर्यंत प्रीमियममध्ये सूट देते. अशा प्रकारे तुम्ही देखील तुमचा प्रिमियमचा खर्च वाचवू शकता.
निरोगी राहण्याचा लाभ-
अनेक विमा कंपन्याकडून विमा धारकास निरोगी असल्याचे बक्षीस म्हणून विम्याच्या प्रमियममध्ये सवलत देतात. ही सवलत 100% पर्यंत मिळू शकते.मात्र , विमा कंपन्या या पुढील विमा पॉलिसाठी अशा प्रकारे निरोगी व्यक्तीला 100 टक्केपर्यंतची सवलत देऊ करतात. यासाठी विमा पॉलिसीधारकाने निरोगी राहणे आवश्यक आहे. अशा प्रकारे निरोगी राहून तुम्ही देखील तुमच्या आरोग्य विम्याचा खर्चात बचत करू शकता.
नो क्लेम बोनस-
यासह तुम्ही नियमित विमा काढत असाल, आणि तु्म्ही विमा मुदतीमध्ये एकदाही दावा केला नसेल तर तुम्हाला नो क्लेम बोनसचा फायदा देखील आरोग्य विमा पॉलिसी नुतनीकरण करताना होऊ शकतो.
आरोग्य विमा प्रत्येकासाठी गरजेचा आहे. त्यामध्ये सर्वसमावेशक विमा आणि खर्चाची बचत शोधणे थोडी किचकीट प्रक्रिया आहे. कारण, सध्या आरोग्यावर होणाऱ्या उपचारांच्या खर्चात भरमसाठ वाढ होत आहे. परिणामी विम्याच्या किमतीमध्ये देखील वाढ होताना दिसून येत आहे. मात्र, विम्याच्या मार्केटमधील स्पर्धा पाहता आपण स्वस्तातील विमा पॉलिसी खरेदी करू शकतो.