केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील SJVN मधील 5% हिश्शाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ऑफर फॉर सेलमध्ये SJVN ची किंमत सध्याच्या मार्केट व्हॅल्यूपेक्षा 15% डिस्काउंट रेट असल्याने शेअरमध्ये पडझड झाली. आज गुरुवारी 21 सप्टेंबर 2023 रोजी SJVN चा 13% घसरला. केंद्र सरकारने या ऑफरसाठी 69 रुपये प्रती शेअर असा दर निश्चित करण्यात आला आहे.
SJVN ही मिनी रत्न दर्जाची कंपनी आहे. केंद्र सरकारची या कंपनीमध्ये 59.92% हिस्सेदारी आहे. हिमाचल प्रदेश सरकारची SJVN मध्ये 26.85% हिस्सेदारी आहे.
केंद्र सरकार या कंपनीतील 4.92% हिस्सा विक्री करणार आहे. यातून केंद्र सरकारला 1335 कोटींचा महसूल मिळेल. SJVN मधील ऑफर फॉर सेल आज गुरुवार 21 सप्टेंबर 2023 पासून सुरु झाली. दोन दिवस ही ऑफर सुरु राहणार आहे.SJVN ऑफर फॉर सेलला नॉन रिटेल इन्व्हेस्टर्सनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. या श्रेणीतील राखीव हिस्सा 139% सबस्क्राईब झाला.
दरम्यान, SJVN मधील ऑफर फॉर सेल जाहीर झाल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली होती. बुधवारी 21 सप्टेंबर 2023 रोजी SJVN चा शेअर 6.78% तेजीसह 81.75 रुपयांवर बंद झाला होता.मात्र आज त्यात मोठी घसरण पाहायला मिळाली.किरकोळ गुंतवणूकदारांनी आज शेअरमध्ये विक्री करुन नफा वसुली केली.