Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Senior Citizens Personal Loan : ज्येष्ठ नागरिक वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकतात का?

Sinior Citizens can apply for personal loan

Senior Citizens can apply for personal loan: ज्येष्ठ नागरिकांना अनेकवेळी उतारवयात अर्थिक अडचणी येत असतात. यामुळे त्यांना वैयक्तिक कर्जाची (Personal loan) गरज असते. आपण जर पेन्शनधारक असाल तर कर्जासाठी अर्ज करतांना कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरतील ते जाणून घ्या.

ज्येष्ठ नागरिक व पेंशनधारकांना वाढता वैद्यकीय व इतर खर्च  इतर कारणांमुळे बँकेत कर्जासाठी अर्ज करू शकतात. पेन्शन किंवा तारण सुरक्षितता म्हणून बँक ज्येष्ठ कर्जदारांना कर्ज देते. मात्र स्थिर उत्पन्न नसल्यामुळे अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना कर्ज देणे बँकेला धोक्याचे वाटते. या कठिण परिस्थितीमुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी कर्ज काढणे अडचणीचे ठरते.

वैयक्तिक कर्ज घेताना महत्वाच्या गोष्टी (Important things to consider while taking a personal loan)

तुम्ही वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर हे महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा.

  • उत्पन्नाचे साधन

जर एखाद्या व्यक्तीला केंद्र, राज्य किंवा कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त संस्थेकडून पेन्शन मिळते, तर तो/ती कर्जासाठी अर्ज करू शकतो. पूर्वी नोकरीत असलेल्या खाजगी कंपनीद्वारे पेमेंटच्या स्वरूपात मिळालेली रक्कम बँकेव्दारे सुरक्षा म्हणून स्विकारण्यात येते. वैयक्तिक कर्जाचे व्याजदर इतर कर्ज स्रोतांच्या तुलनेत कमी आहे.

  • परतफेड कालावधी

अशा कर्जाची मुद्दल आणि व्याजाची रक्कम परतफेड करण्यासाठी लागणारा वेळ नियमित कर्जासारखा असतो, जो 12 ते 60 महिन्यांचा असू शकतो. तसेच वास्तविक परतफेडीचा कालावधी कर्जदार बँकेची मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरणांनूसार बदलतो.

अर्जदाराची इक्विटी आणि क्रेडिट हिस्ट्री देखील परतफेडीचा कालावधी निश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बाजवते. ऑनलाइन पर्सनल लोन ईएमआय कॅल्क्युलेटर वापरून तुम्ही तुमच्या कार्यकाळासह तुमच्या ईएमआयची अचूक गणना करू शकता .

  • व्याजदर

ज्येष्ठ नागरिकांसाठी वैयक्तिक कर्जाचे व्याजदर निश्चित नाहीत. ते अर्जदाराचे वय, सिबिल स्कोअर, कर्ज देणार्‍या संस्थेद्वारे लागू होणार्‍या धोरणांद्वारे निर्धारित केले जातात.

पेन्शन लोन (Pension loan)

पेन्शन लोन अमाउंट ला व्यक्तीच्या वयाप्रमाणे तीन भागात विभागले जाते

  • अर्जदार व्यक्तीचे वय 72 वर्षाच्या आत असेल तर ती 14 लाख रुपये इतक्या कर्जासाठी पात्र असते. यावेळी 5 लाख रुपयांचे कौटुंबिक लोन मिळू शकते.
  • अर्जदार व्यक्ती 72-74 या वयोमर्यादेतील असेल तर ती 12 लाख रुपयांच्या कर्जसाठी पात्र असते व कौटुंबिक कर्जासाठी 4.5 लाख रुपये मिळतात.
  • अर्जदाराचे वय 74 ते 76 इतके असल्यास व्यक्ती 7.5 लाख रूपये इतक्या कर्जासाठी पात्र असते. या व्यक्तीला 2.5 लाखांपर्यंत कौटुंबिक लोन मिळते.

(वरील सर्व अटी या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या धोरणानूसार आहेत)

Source: https://youtu.be/XZo_ELUW1_4