Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बजाज इलेक्ट्रिकल, महानगर गॅस, एचडीएफसी बॅंक या कंपन्यांचे शेअर्स आज तेजीत राहण्याची शक्यता

Today's Share Market

Todays Share Market: आज शेअर मार्केट चांगल्या अंकांनी ओपन होईल, असे एसजीएक्स (SGX) निफ्टीच्या निर्देशांकावरून दिसून येते. यामध्ये अदानी पोर्ट, महानगर गॅस, अदानी टोटल गॅस या कंपन्या फोकसमध्ये राहण्याची शक्यता आहे.

Today Share Market: वाढत्या महागाईचा ताण सर्वसामान्यांबरोबर व्यापारी आणि शेअर मार्केटवरही आहे. पण शेअर मार्केट हे फक्त वर्तमानकाळातील स्थिती अवलंबून राहत नाही. भविष्यात होणाऱ्या बदलांचा अंदाजही शेअर मार्केटसाठी खूप काही देऊन जाणारे असते. त्याचाच भाग म्हणजे सध्या ज्या काही सकारात्मक गोष्टी मार्केटमध्ये होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शेअर मार्केट रिअॅक्ट होते. त्याचाच भाग म्हणून भारतीय शेअर मार्केट सोमवारी (दि. 6 मार्च) चांगल्या अंकांनी ओपन होण्याची शक्यता असल्याचे एसजीएक्सच्या निर्देशांकातून दिसून येते. सिंगापूर शेअर मार्केटमधील निफ्टी फ्युचर्स निर्देशांक 17,700 अंकांवर सकारात्मक दृष्ट्या ट्रेडिंग करत होता.

शुक्रवारी (दि. 4 मार्च) इंडियन शेअर मार्केटमधील निफ्टी 50 हा 250 अंकांनी वाढून 17,594 अंकांवर बंद झाला होता. तर सेन्सेक्समध्ये मोठी अशी 900 अंकांची वाढ होऊन तो 59,808 वर बंद झाला होता.

आज मार्केटमध्ये कोणत्या कंपन्यांचे शेअर्स तेजीमध्ये राहू शकतात. हे आपण पाहणार आहोत.

एचडीएफसी बॅंक (HDFC Bank)

एचडीएफसी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालकपद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून शशिधर जगदीशन यांना आणखी 3 वर्षांची मुदत देण्यात आली. जगदीशन यांनी 2020 मध्ये कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यापूर्वी ते मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून कार्यरत होते.

निओजेन केमिकल्स (Neogen Chemicals)

निओजेन केमिकल्स कंपनीने बुली केमिकल्स इंडियामधील हिस्सा खरेदी करण्याचा करार केला. निओजेन त्या कंपनीतील 100 टक्के हिस्सा विकत घेणार असून यासाठी कंपनीने 25 कोटी रुपयांचा करार केला आहे. निओजेम केमिकल्स कंपनी बुटली लिथिअम आणि लिथिअमचा वापर असलेली वेगवेगळ्या प्रकारची केमिकल्स बनवते.

बजाज इलेक्ट्रिकल (Bajaj Electrical)

बजाज इलेक्ट्रिकल कंपनीला बिहारमधील विजेच्या पायाभूत सोयसुविधा पुरवण्याच्या कामाचे कंत्राट मिळाले आहे. या कामासाठी बजाज इलेक्ट्रिकल कंपनीला 645 कोटी रुपये मिळणार असून, हा प्रोजेक्ट 30 महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे.

समवर्धना मदरसन (Samvardhana Motherson)

समवर्धना मदरसन कंपनीने आपली उपकंपनी मदरसन टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसमधील भांडवली हिस्सा वाढवला आहे. कंपनीचा पूर्वी मदरसन टेक्नॉलॉजीमध्ये  62.9 टक्के हिस्सा होता. त्यात कंपनीने वाढ करून तो 90.4 टक्के केला आहे. कंपनीने हा हिस्सा सर्व शेअर होल्डरसाठी लागू असलेल्या किमतीनुसारच वाढवला आहे.

महानगर गॅस (Mahanagar Gas)

युनिसॉन इनव्हायरो ही अशोका बिल्डकॉन कंपनीची उपकंपनी आहे. या कंपनीच्या विक्रीसाठी अशोक बिल्डकॉन आणि मॉर्गन स्टॅनले इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने महानगर गॅससोबत करार केला आहे. हा करार 531 कोटी रुपयांचा आहे. युनिसॉन इनव्हायरो कंपनीला  रत्नागिरी, उस्मानाबाद, लातूर, चित्रदूर्ग आदी जिल्ह्यांमध्ये गॅस वितरित करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाकडून ही परवानगी देण्यात आली आहे. 

(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)